नववर्षाच्या पूर्वसंध्येला रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवासाच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे नव्या वर्षात रेल्वे प्रवास महाग झाला आहे. रेल्वे प्रवासाचे दर बुधवार (१ जानेवारी) पासूनच लागू होणार आहेत. लोकल तिकिटांच्या दरांमध्ये आणि रेल्वे पासच्या दरांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब आहे.

रेल्वेच्या नॉन एसी डब्यांच्या प्रवासासाठी १ पैसा प्रति किमी तर मेल आणि एक्स्प्रेसच्या नॉन एसी डब्यांसाठी २ प्रति किमी अशी दरवाढ करण्यात आली आहे. तर एसी डब्यांसाठी ४ पैसे प्रति किमी अशी दरवाढ करण्यात आली आहे. २०१४-१५ नंतर ही वाढ करण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. रेल्वे प्रवाशांसाठी अनेक सुविधाही देण्यात आल्या आहेत. तसेच जमा-खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे.