मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात SARS CoV 2 च्या डेल्टा प्रकारांची सबलाइनर प्रकरणे आढळून आल्यानंतर भारताचा करोना जीनोमिक सर्व्हिलन्स प्रोजेक्ट हाय अलर्टवर आहे. नॅशनल सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल कडून जारी करण्यात आलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग अहवालात इंदूरमध्ये नवीन कोविड प्रकारच्या AY.४ – डेल्टा व्हेरियंटची सात प्रकरणे आढळून आली आहेत. त्यापैकी दोन महू कॅन्टोन्मेंटमध्ये तैनात असलेले लष्करी अधिकारी आहेत, असे इंदूरचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ बीएस सैत्य यांनी सांगितले आहे. सप्टेंबरमध्ये यांचे नमुने घेण्यात आले होते.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जीनोम सिक्वेंसींग रिपोर्टमध्ये इंदूरसह महाराष्ट्रात करोना चाचण्यांच्या एक टक्के नमुन्यांमध्ये नवीन डेल्टा AY.४ प्रकार आढळला आहे. नवीन प्रकार डेल्टा स्ट्रेनपेक्षा अधिक संसर्गजन्य आणि अधिक प्राणघातक असू शकतो असे शास्त्रज्ञांनी सूचित केले आहे. AY ४.२ नावाचा नवीन व्हेरिएंटला आता ब्रिटनमध्ये तपास अंतर्गत आवृत्ती म्हणून घोषित करण्यात आले आहे.

आरोग्य संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, AY.४.२ डेल्टा व्हेरिएंट सर्व प्रकरणांमध्ये सुमारे सहा टक्के आहे. डेल्टा हा व्हेरिएंट घातक आहे. AY.४.२ नावाचा डेल्टा व्हेरिएंट हा इंग्लंडमध्ये पसरला होता,” असे अहवालात म्हटले आहे.

AY.४.२, ज्याला “डेल्टा प्लस” म्हणतात आणि आता यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सी (UKHSA) द्वारे VUI-२१OCT-०१ असे नाव देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत त्याची चाचणी केली केली असता, तो मुख्य डेल्टा आवृत्तीपेक्षा अधिक वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे. एनसीडीसी अहवालात असे म्हटले आहे की या व्हेरिएंटमुळे सप्टेंबरमध्ये इंदौर जिल्ह्यात कोविड-१९ ची वाढ झाली होती. ऑगस्टमध्ये करोना संसर्ग ६४ टक्क्यांनी वाढला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

UKHSA, SARS-CoV-2 च्या प्रकाराशी संबंधित सर्व उपलब्ध माहितीचे परीक्षण करण्यात येत आहे, ज्यामुळे ब्रिटनमध्ये करोनाचा प्रसार वाढला होतो. AY.४.२ हे उत्परिवर्तनांच्या त्याच प्रकारातील आहे जो गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात प्रथम आढळला होता. नवीन डेल्टा प्रकारामुळे देशात प्रकरणांची दुसरी लाट आली होती.