सोमवापासून २०२२ या वर्षातील नोबेल पुरस्कारांची घोषणा सुरू झाली आहे. सोमवारी स्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाल्यानंतर आज भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. अॅलेन अॅस्पेक्ट, जॉन एफ क्लॉजर आणि अँटोन झेलिंगर यांना एकमेकांमध्ये अडकलेल्या फोटॉन ( Entangled Photons ) संदर्भातील अभ्यासासाठी यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

हेही वाचा – स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर; कोण आहेत स्वांते पाबो? जाणून घ्या

अलेन आस्पेक्ट हे फ्रान्सचे मधील स्वेले विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आहेत. तर जॉन एफ क्लॉजर हे अमेरिकेतील शास्रज्ञ आणि अँटोन झेलिंगर हे ऑस्ट्रियातील व्हिएन्ना विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.

हेही वाचा – अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी जम्मूत इंटरनेट सेवा स्थगित, बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येनंतर निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या वर्षी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार सौकुरो मानाबे (जपान), क्लोस हेसलमन (जर्मनी) आणि जॉर्जिओ पॅरिसी (इटली) यांना देण्यात आला होता.