scorecardresearch

Premium

चौकशीस उपस्थित राहण्यासाठी चिदंबरम यांना समन्स

चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांचे यापूर्वी सक्तवसुली संचालनालयाने जाबजबाब घेतले आहेत.

पी. चिदम्बरम
पी. चिदम्बरम

एअरसेल- मॅक्सिस प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना १२ जून रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरिता पुन्हा समन्स बजावले आहे. दरम्यान  सीबीआयने बुधवारी आयएनएक्स मीडिया प्रकरणात त्यांचे  जाबजबाब घेतले असून आपल्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे अगोदरच कागदोपत्री आहेत असे चिदंबरम यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

वरिष्ठ काँग्रेस नेते असलेल्या चिदंबरम यांचे काल संचालनालयाने जाबजबाब घेतले असून अधिकृत सूत्रांनी सांगितले, की पीएमएलए कायद्यानुसार १२ जूनला त्यांचे पुन्हा जाबजबाब घेण्यात येणार आहेत. संस्था चिदंबरम यांना त्या वेळी या संशयास्पद व्यवहाराबाबत त्यांना आणखी वेगळे प्रश्न विचारणार आहे. एकूण सहा तास त्यांचे काल जाबजबाब घेण्यात आले.  सक्तवसुली संचालनालयाने याआधी परदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या अधिकाऱ्यांचे जाबजबाब घेतले असून एअरसेल मॅक्सिस व्यवहारात गुंतवणुकीला परवानगी देताना नेमकी काय प्रक्रिया केली याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली असता, त्यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे चिदंबरम यांना प्रश्न विचारण्यात येणार आहेत.

चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांचे यापूर्वी सक्तवसुली संचालनालयाने जाबजबाब घेतले आहेत. चिदंबरम यांचे बुधवारी आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआयने जाबजबाब घेतले असून जे प्रश्न मला विचारण्यात आले, त्या सर्वाची उत्तरे सरकारी कागदपत्रात नोंदलेली आहेत, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. चौकशी सुरू झाली असली तरी अजून प्राथमिक माहिती अहवाल दाखल झालेला नाही असेही त्यांनी सांगितले.

चिदंबरम यांनी अटकेपासून संरक्षणासाठी मुदतवाढ मिळण्यासाठी विशेष न्यायाधीश ओ.पी.सैनी यांच्या न्यायालयात दाद मागितली होती, त्यानंतर त्यांना १० जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: P chidambaram

First published on: 07-06-2018 at 01:10 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×