पीटीआय, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी पाच दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले. त्यांचा हा दौरा पाच आठवड्यांचा असून ते सर्वात आधी घाना या देशाला पोहचले. त्यानंतर ते त्रिनिदाद अँड टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबियाचा दौरा करणार आहेत. ब्राझीलच्या रियो द जानेरो येथे ६ आणि ७ जुलैला होणाऱ्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेलाही पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.

दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मोदी घानामध्ये २ आणि ३ जुलैला असतील. तेथे ते घानाच्या पार्लमेंटमध्ये भाषण करणार आहेत. घानाचे अध्यक्ष जॉन द्रामिनी महामा यांच्या आमंत्रणावरून मोदी त्या देशाचा दौरा करत आहेत. घाना हा ‘ग्लोबल साउथ’मधील महत्त्वाचा देश आहे आणि आफ्रिकी महासंघामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे असे मोदी यांनी दौऱ्यावर निघताना नमूद केले. भारत आणि घानामधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. या ऐतिहासिक भेटीतून गुंतवणूक, ऊर्जा, आरोग्य, सुरक्षा, क्षमता उभारणी आणि विकास भागीदारी यासह विविध क्षेत्रात सहकार्याच्या संधी निर्माण होतील असे पंतप्रधान म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घानानंतर मोदी त्रिनिदाद अँड टोबॅगो या देशाला भेट देणार आहेत. तेथे भारतीय वंशाचे अनेक जण काही पिढ्यांपासून वास्तव्याला असून या देशाचे भारताबरोबर जुने ऐतिहासिक, सांस्कृतिक संबंध आहेत. त्रिनिदाद अँड टोबॅगोमध्ये १८० वर्षांपूर्वी पहिल्यांदा भारतीयांचे आगमन झाले याचे स्मरण पंतप्रधान मोदी यांनी केले. ते त्रिनिदाद अँड टोबॅगोचे अध्यक्ष कार्ला कांगालू आणि पंतप्रधान कमला प्रसाद-विशेश्वर यांची भेट घेणार आहेत. कांगालू हे या वर्षाच्या प्रवासी भारतीय दिवस या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. त्रिनिदाद अँड टोबॅगोनंतर ४ आणि ५ जुलैला मोदी अर्जेंटिनाला जातील. ती भेट आटोपल्यानंतर ते ब्रक्सि शिखर परिषदेला उपस्थित राहतील.