मध्य प्रदेशातील आगर मलवा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एक महिला तिच्या अल्पवयीन मुलीचं लग्न लावून देत होती. परंतु त्याचवेळी मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केली. मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की त्यांची पत्नी त्यांच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न लावत आहे.

मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस थेट लग्न मंडपात पोहोचले. परंतु त्यावेळी मुलीची आई पोलिसांसमोर नवरी बनून समोर आली. महिला म्हणाली तिच्या मुलीचं नव्हे तर तिचंच लग्न आहे. पोलिसांना या महिलेची चालाखी लक्षात आली. त्यानंतर पोलिसांनी महिलेला, तिचा भाऊ आणि तिच्या वडिलांना (मुलीचे आजोबा) ताब्यात घेतलं आणि त्यांना घेऊन थेट पोलीस ठाण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार आगर मलवा जिल्ह्यातील सुमनेर पोलीस ठाणे क्षेत्रातील मेहंदी गावातील एका महिलेने तिचा भाऊ आणि वडिलांच्या मदतीने आपल्या अल्पवयीन मुलीचं लग्न ठरवलं होतं. हे लग्न जबरदस्तीने लावलं जात होतं. परंतु त्या महिलेच्या पतीने पोलिसात जाऊन या प्रकरणाची तक्रार केली.

तक्रारीनंतर सुमनेर पोलीस ठाण्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पल्लवी शुक्ला, नायब तहसीलदार राजेश श्रीमाल, पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय सागरिया आणि महिला बाल विकास विभागाच्या पर्यवेक्षिका काजल गुनावदिया थेट मेहंदी गावात दाखल झाले.

हे ही वाचा >> शिक्षणासाठी शहरात जायची इच्छा, घरची परिस्थिती हलाखीची, तरुणाने तोंडात सुतळी बॉम्ब फोडला अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस लग्न मंडपात येत असल्याची माहिती मिळाल्यावर मुलीच्या आईने लगेच नव्या नवरीसारखा शृंगार केला. नवरीच्या पोषाखात मुलीची आई बोहल्यावर चढली. त्याचवेळी महिलेच्या पतीने तिची पोलखोल केली. पोलीस चौकशी करत असताना ही महिला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं देत होती. परंतु सर्व प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं, तसेच लग्न थांबवलं.