Raja Raghuvanshi Murder Case : इंदोरमधील नवविवाहित दाम्पत्य सोनम व राजा रघुवंशी सध्या चांगलेच चर्चेत आहे. या पैकी राजा याची मेघालय येथे हत्या झाल्याचे उघड झाली आहे. २ जून रोजी त्याचा मृतदेह सापडल्यानंतर बेपत्ता असलेली सोनम ही आता उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथे सापडली आहे. महत्त्वाचे म्हणजे सोनमनेच तिचा पती राजा याची हत्या केल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान या प्रकरणात आता नवीन माहिती समोर येत आहे.

आता हत्या झालेल्या राजा रघुवंशीच्या आईने सोमवारी सोनमबद्दल काही धक्कादायक बाबींचा घुलासा केला आहे. मेघालयला हनिमून ट्रिपवर जात असताना सोनमने प्रवास तसेच तिथे राहण्याच्या बुकिंग्स स्वतः केल्या होत्या, विशेष म्हणजे तिने परतीचे तिकीट बुक केले नव्हते.

उमा रघुवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमनेच त्यांची ट्रिप ही शिलाँगपर्यंत वाढवली असू शकते, तसेच सोनमने दोन्ही परिवारांना त्यांच्या ट्रिपबद्दल कसलीही माहिती दिली नव्हती. एनडीटीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, हे जोडपे त्यांचे सर्व सोन्याचे दागिने घालून मेघालयमधील ट्रिपसाठी निघाले होते. सोनम तिच्या पालकांच्या घरातून थेट विमानतळावर गेली होती, तर राजा १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे दागिने घालून घराबाहेर पडला होता, ज्यामध्ये हिऱ्याची अंगठी, एक चेन आणि एक ब्रेसलेट यांचा समावेश होता. जेव्हा राज्याच्या आईने याबद्दल विचारले तर त्याने सांगितले की सोनमची इच्छा आहे की त्याने दागिने घालावेत.

“जर सोनमचा हत्येत सहभाग असेल तर तिला फाशी झाली पाहिजे. सकाळी पोलिसींनी सोनम सापडल्याबद्दल सांगितले नाही. सीबीआय चौकशी झाली पाहिजे. जर सोनम जर काहीही केले नसेल तर तिच्यावर आरोप का केला जाईल? सोनमची वागणूक चांगली होती, ती मला मिठी मारत असे,” असेही उमा यांनी सांगितले.

जर सोनम त्यांच्या मुलावर प्रेम करत असती तर ती त्याला मरण्यासाठी का सोडून गेली असती असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. “ती सुरक्षित कशी राहिली? याच्या पाठीमागे असलेल्या सर्वांना कठोर शिक्षा झाली पाहिजे,” असेही त्या म्हणाल्या.

नेमकं काय झालं?

राजा आणि सोनम यांचे ११ मे रोजी लग्न झाले आणि ते चेरापुंजी येथे त्यांच्या हनिमूनसाठी आले होते, पण २३ मे रोजी दोघेही बेपत्ता झाले. २२ मे रोजी हे जोडपे नोंग्रीयट येथे बालाजी होमस्टेमधून बाहेर पडताना आढळून आले होते. हे दोघे बेपत्ता झाल्यानंतर सोहरारिम येथे त्यांनी भाड्याने घेतलेले स्कूरट बेवारस अवस्थेत आढळून आले होते. १० दिवसांनंतर राजा याचा मृतदेह एका दरीत सापडला होता. त्याची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार देखील सापडले होते.

शनिवारी रात्री सोनम ही उत्तर प्रदेशच्या गाझिपूर येथे एका ढाब्यात सापडली होती. त्यानंतर तिला गाझिपूर येथील मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी घेऊन जाण्यात आले, जेथे तिल पोलिसांनी अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दावा केला आहे की मृत राजाच्या पत्नीचे एका तरूणाबरोबर संबंध होते आणि तिने कथितरित्या पतीच्या हत्तेसाठी सुपारी दिली. राज कुशवाह या बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीची हत्या घडवून आणली. प्राथमिक तपासात असेही समोर आले आहे की सोनम आणि राज कुशवाहा हे एकमेकांशी अनेकदा बोलत असत.