दक्षिण आफ्रिकेच्या पीटरमारिट्जबर्ग येथे महात्मा गांधींना धक्का देऊन ट्रेनमधून खाली उतरवले होते. या घटनेला १२८ वर्ष पुर्ण झाले आहेत. या निमित्ताने जगातील विविध विद्वानांनी राष्ट्रपिताच्या संदेशांबद्दल चर्चा केली जे आजही जगासाठी उपयुक्त आहेत. महात्मा गांधींना सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर जाण्याची प्रेरणा देणारी घटना ७ जून १८९३ ला घडली होती. ज्यामध्ये त्यांना वांशिक भेदाचा सामना करावा लागला होता.

पीटरमारिट्जबर्ग गांधी स्मारकाचे अध्यक्ष डेविड गेनगान म्हणाले, समितीने काही वर्षांपूर्वी निर्णय घेतला होता की, ७ जून, १८९३ ची घटना आणि त्याचा तरुण गांधींवर झालेला परिणाम यावर दरवर्षी चर्चा सत्र घेतले जाईल. डेविड म्हणाले की, गांधी चळवळीचे मुख्य शस्त्र सत्याग्रहाचे बीज ७ जून १८९३ च्या रात्री पिटरमारिट्जबर्ग येथे पेरण्यात आले होते.

हेही वाचा- लोकसत्ता विश्लेषण : ‘गोडसे’ उदात्तीकरण की अभिव्यक्ती स्वातंत्र्य?

महात्मा गांधी सुमारे २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत राहिले. यावेळी त्यांच्या तात्विक कल्पना विकसित केल्या. अहिंसा व सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. दरवर्षी ही घटना ज्या ठिकाणी घडली त्याच ठिकाणी ही चर्चा आयोजित केली जाते. परंतु करोना साथीच्या आजारामुळे चर्चा ऑनलाईन माध्यमातून आयोजित केली जात आहे.

चर्चेत भाग घेत महात्मा गांधींची नात आणि गांधी डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रमुख इला गांधी म्हणाल्या की, आपल्या गांधींनी त्यांच्या जीवनात अनेक सत्य शोधले. ते म्हणाले, “मला विश्वास आहे की अशा वेळी जेव्हा आपण कोविड -१९ साथीच्या सारख्या मोठ्या आव्हानाला सामोरे जात आहोत, यावेळी गांधींच्या विचारांचे महत्त्व आणखीनच वाढते.”

हेही वाचा- महात्मा गांधींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेल्सन मंडेला फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सेलो हटांग म्हणाले की, गांधींची दृष्टी आणि विचार करण्याची पद्धत ही सर्व मानवांनी साध्य केली जाऊ शकते. विशेष म्हणजे ७ जून १९८३ च्या या घटनेने महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत व नंतरच्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील वांशिक भेदभावाविरुद्ध लढा देण्याच्या निर्णयावर चांगलाच परिणाम केला.