मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी फाशीच्या रांगेत असलेला गुन्हेगार व दाऊद इब्राहिमचा या कटातील साथीदार याकुब अब्दुल रझाक मेमन याच्या फाशीला बुधवारी सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली.
मुंबई बॉम्बस्फोटातील याकूब मेमन आता राज्यशास्त्रातही एम.ए.
सर्वोच्च न्यायालयाने याबाबत महाराष्ट्र सरकार आणि सीबीआयला नोटीस पाठवली असून पुढील सुनावणीपर्यंत मेमनच्या फाशीस स्थगितीचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी २८ जानेवारी रोजी होणार आहे. कट रचल्याच्या आरोपांमध्ये असलेल्या कायदेशीरबाबींवरून ही नोटीस जारी करण्यात आली आहे.
मृत्युदंडाची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत बंद चेंबरमध्ये हाताळली जात नाहीत तर खुल्या न्यायालयात हाताळली जातात. या मुद्द्यावरून मेमनची मृत्यूदंडाच्या शिक्षेबाबतची याचिका घटनापीठाकडे पाठविण्यात आली होती. यावर बुधवारी सुनावणी दरम्यान, ज्या कैद्यांची फाशीच्या शिक्षेविरोधातील याचिका फेटाळण्यात आली आहे पण, अजून फाशी देण्यात आली नाही. अशा कैद्यांना खुल्या न्यायालयात सुनावणी होण्यासाठी अर्ज करता येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आर.एम.लोढा यांनी बुधवारी सांगितले. यापार्श्वभूमीवर मेमनच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे मेमनच्या शिक्षेवरील सुनावणी देखील आता खुल्या न्यायालयात होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Dec 2014 रोजी प्रकाशित
याकूब मेमनच्या फाशीस स्थगिती
मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी फाशीच्या रांगेत असलेला गुन्हेगार व दाऊद इब्राहिमचा या कटातील साथीदार याकुब अब्दुल रझाक मेमन याच्या फाशीला बुधवारी सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.

First published on: 10-12-2014 at 02:41 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sc extends stay on execution of mumbai blasts convict yakub memons death sentence