भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसात तेजी पाहायला मिळत आहे. शेअर मार्केटने पुन्हा एका इतिहास रचत ५८ हजारांचा पल्ला गाठला आहे. सेन्सेक्स पहिल्यांदाच ५८ हजारांच्या पार गेला आहे. आज सकाळच्या सत्रात मार्केट सुरु होताच २१७ अंकांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे सेन्सेक्स ५८,०६९ वर पोहोचला. तर निफ्टीत ६६.२० अंकांची वाढ पाहायला मिळाली. यामुळे निफ्टी १७,३०० अंकांवर पोहोचला होता.

जागतिक बाजारातील सकारात्मक परिणार शेअर बाजारावर दिसत आहेत. आशियाई बाजारातही तेजी बघायला मिळत आहे. SGX NIFTY आणि DOW FUTURES सध्या उलाढालही योग्य प्रमाणात सुरु आहे. दुसरीकडे अमेरिकेतही एलअँडपी ५०० आणि एनएएसडीक्यू विक्रमी अंकांवर बंद झाले होते. अमेरिकेच्या बाजारातून सकारात्मक संकेत, देशातील करोना रुग्णांमध्ये झालेली घट आणि वेगाने वाढणारी लसीकरण मोहीम याचे सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आले. आज रिलायन्स, जस्ट डायल, आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल, व्होडाफोन आयडिया, अदाणी ग्रीन, पीएनबी आणि कोल इंडिया या शेअर्सकडे गुंतवणूकदारांचा कल दिसत आहे. आज बीएसईवर लिस्टेड असलेल्या एशियन वेगप्रो इंटस्ट्रीज, प्राईम फोकस आणि राजश्री शुगर्स अँड केमिकल्सचे आर्थिक परिणाम येतील.

कठीण समय येता सोने कामास आले; भारतीयांचं ६२ हजार कोटींचं सोनं बँकांकडे गहाण

गुरुवारी शेअर बाजारात दिवसभराच्या उलाढालीनंतर तेजी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स ५१४.३३ अंकासह ५७,८५२.५४ अंकांवर बंद झाला होता. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी १५७.९० अंकांसह १७.२३४.१५ अंकांवर बंद झाला होता.