बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी केंद्रीय मंत्री नित्यानंद राय आणि भाजपा खासदारांवर जोरदार टीका केली आहे. लालू प्रसाद यादव म्हणाले की, “नित्यानंद राय काय होते सगळ्यांना माहीत आहे. त्यांनी आधी राजदमध्ये येण्यासाठी इच्छा दर्शवली होती. आज म्हणत आहेत लालू प्रसाद यादव यांनी राबडी देवींना मुख्यमंत्री केलं. राबडीदेवी नाही तर काय त्याच्या बायकोला मुख्यमंत्री करणार होतो का? ” असा प्रश्न विचारत लालू प्रसाद यादव यांनी नित्यानंद राय यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

नित्यानंद राय लालू प्रसाद यादव यांच्याबाबत काय म्हणाले होते?

लालू प्रसाद यादव यांनी यादवांसाठी काहीही केलं नाही. चारा घोटाळ्यात जेव्हा लालू प्रसाद यादव यांना अटक झाली तेव्हा त्यांनी राबडी देवींना मुख्यमंत्री केलं. अशा वेळी यादव समाजातल्या किंवा गवळी समाजातल्या कुणाला हे पद का दिलं नाही? यादवांमधल्या एखाद्या नेत्याला हे पद का दिलं नाही? राबडी देवींपेक्षाही जास्त क्षमता असलेले लोक तेव्हा होते. त्यांना लालू प्रसाद यादव यांनी का डावललं ? असा प्रश्न नित्यानंद राय यांनी विचारला होता. त्यावर आता लालू प्रसाद यादव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Dudhganga tap water scheme,
इचलकरंजीची दूधगंगा नळपाणी योजना रखडल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर राजू शेट्टी यांचे टीकास्त्र
Ajit Pawar On Navneet Rana
“नवनीत राणा यांच्या विजयासाठी…”; उपमुख्यमंत्री अजित पवार चुकून काय म्हणाले?
cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
narayan rane On uddhav thackeray
“आम्ही मातोश्रीवर भेट द्यायचो तेव्हा प्रसाद घेऊन जावा लागायचा, मग तो काळा पैसा नव्हता का?”; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

नित्यानंद राय गायींची कत्तल करण्याच्या व्यवसायात होता

लालू प्रसाद यादव पाटण्याच्या इस्कॉन मंदिरात गोवर्धन मंदिरात सुरु असलेल्या गोवर्धन महोत्सवात पोहचले होते. तिथे नित्यानंद राय यांच्या वक्तव्याविषयी विचारलं असता लालू प्रसाद यादव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “नित्यानंद राय आधी ठेकेदारी करत होता. हाजीपूरला जाऊन गाय कापण्याचं काम करत होता, गाय कापणं हाच त्याचा व्यवसाय होता. आज तोच नित्यानंद म्हणतो राबडी देवींना मुख्यमंत्री केलं. राबडी देवींना मुख्यमंत्री करायचं नव्हतं तर काय त्याच्या (नित्यानंद राय) बायकोला मुख्यमंत्री करायचं होतं का? राबडी देवींना तेव्हा मुख्यमंत्रीपद दिलं नसतं तर नितीशकुमार आणि आमचं सरकार आज नसतं.” असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.

रामकृपाल यादव यांच्यावरही टीका

नित्यानंद राय यांच्यासह लालू प्रसाद यादव यांनी रामकृपाल यादव यांच्यावरही टीका केली. “रामकृपाल यादव बस स्टँडवर ठेके घ्यायचा, हॉटेलवर कब्जा करायचा. गोरियाटोलीचं नाव खराब केलं होतं. कृष्णाने कंसाचा नाश केला आणि राज्य केलं होतं. कृष्णाने वेळ आली तेव्हा गोवर्धन पर्वतही उचलला होता. मात्र आज धर्माच्या नावाखाली अधर्माचं राजकारण केलं जातं आहे” असं म्हणत लालू प्रसाद यादव यांनी रामकृपाल यादव यांच्यावर टीका केली.