सध्या देशभरामध्ये विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चर्चा आहे. ‘द काश्मीर फाइल्स’वरुन दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे. एकीकडे हा चित्रपट खरोखरच फार उत्तम असून मागील ३२ वर्षांपासून खदखदत असणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या वेदना उत्तमपणे मोठ्या पडद्यावर साकारल्याचं कौतुक केलं जातंय. तर दुसरीकडे ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल, निवडक मुद्द्यावर हा चित्रपट बनवण्यात आल्याची टीका केली जातेय. असं असताना काश्मीरमध्ये राहणाऱ्या पंडितांना या चित्रपटाबद्दल नेमकं काय वाटतंय यासंदर्भात बीबीसी हिंदीने केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

नक्की पाहा >> Photos: ‘द कश्मीर फाइल्स’चे समर्थक-विरोधक रितेशवर संतापले; कोणी ‘नेत्याचा मुलगा’ म्हटलं तर कोणी ‘झुंड’वरुन सुनावलं

थोडक्यात या मुलाखतींमध्ये काय आहे?
या मुलाखतींमधून काश्मिरी पंडितांनी केवळ चित्रपट बनवल्याने आम्हाला आमच्या मूळ घरी परत जाता येणार नाही, हा चित्रपट म्हणजे एकतर्फी आहे, या चित्रपटामुळे दोन समाजांमधील दरी वाढेल अशी वक्तव्य केली आहेत. या व्हिडीओत पाच प्रातिनिधिक प्रतिक्रिया दाखवण्यात आल्या असून सर्वांनीच या चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आल्याचं मान्य केलं असलं तरी चित्रपट एकतर्फी असल्याचं सांगत येथे मुस्लिमांच्याही हत्या झाल्या होत्या, शीखही मारले गेले होते, जे चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं नाही असं म्हटलं आहे. याशिवाय सर्वांनीच आमचा आतापर्यंत राजकीय हेतून वापर केला पण सध्या केंद्रात असणाऱ्या सरकारनेही आमची मागील आठ वर्षांपासून दखल घेतलेली नाही असंही या काश्मिरी पंडितांनी म्हटलं आहे. हा चित्रपटमध्ये २०२४ च्या निवडणुकीची तयारी असल्याची टीकाही एकाने यावेळी केलीय.

vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…
kangana ranaut on rahul gandhi and sonia gandhi
‘राहुल गांधी आईच्या महत्त्वाकांक्षेला बळी पडलेला मुलगा’, ३ इडियट्स चित्रपटाचं उदाहरण देत कंगना रणौत म्हणाली…
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

नक्की वाचा >> The Kashmir Files वरुन संतापल्या मेहबूबा मुफ्ती; मोदी सरकारवर टीका करत म्हणाल्या, “ज्या पद्धतीने…”

कुठे घेण्यात आल्या या मुलाखती?
बीबीसी हिंदीने जम्मूमधील जगती टाउनशिप येथे राहणाऱ्या काश्मिरी पंडितांसोबत ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटासंदर्भात चर्चा केली. या ठिकाणी सध्या चार हजार स्थलांतरित काश्मिरी पंडित कुटुंब राहतात. केवळ एक चित्रपट बनवल्याने आम्हाला आमच्या घरी जाता येणार नाही असं इथल्या बहुसंख्य काश्मिरी पंडितांचं मत आहे. नेमकं कोण काय म्हणालंय पाहूयात…

इलेक्शनसाठीचा स्टंट वाटतोय हा चित्रपट…
“हा चित्रपट म्हणजे २०२४ साठीचा इलेक्शन स्टंट वाटतोय. हे जगभरात जातील आणि म्हणतील की पाहा काश्मिरी पंडितांवर अत्याचार झालेत. पाकिस्तानने आम्हाला उद्धवस्त केलं. त्यांनी दहशतवादी घुसवले. त्यावेळी सामान्य मुस्लीम यामध्ये नव्हता. मुस्लिमांना पण मारण्यात आलंय,” असं रोकठोक मत शादीलाल पंडित यांनी व्यक्त केलंय.

नक्की वाचा >> “मी ‘गुजरात फाइल्स’ बनवायला तयार, सत्य मांडणार पण तुम्ही आश्वासन द्या की…”; दिग्दर्शकाची मोदींकडे मागणी

मुस्लिमांनाही मारण्यात आलं जे चित्रपटात दाखवलेलं नाही
“हा जो चित्रपट आहे तो योग्य आहे. काश्मिरी पंडितांवर अत्याचार झालाय. आम्हाला मारलं, खेचून नेण्यात आलं. तुम्ही काश्मीर सोडा अशा घोषणा दिल्या जायच्या. मात्र त्यात (चित्रपटात) हे सुद्धा हवं होतं की काश्मिरी मुस्लमांनांचीही हत्या करण्यात आली. ते या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं नाही,” असंही शादीलाल पंडित म्हणालेत. “या काळामध्ये तिथे (काश्मीरमध्ये) ज्या शीख समुदायामधील लोकांच्या हत्या झाल्या दहशतवादामुळे त्या या चित्रपटामध्ये दाखवण्यात आल्या नाहीत,” याकडे शादीलाल पंडित यांनी लक्ष वेधलंय.

नक्की वाचा >> ‘द कश्मीर फाइल’ पाहण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना ‘या’ दोन अटींवर मिळणार ‘हाफ डे’; मुख्यमंत्र्यांची घोषणा

आठ वर्षांमध्ये भाजपा सरकारनेही आमची दखल घेतली नाही
“आठ वर्षांपासून त्याचं (भाजपाचं) सरकार आहे. ते इतर सराकारांना आरोप करायचे की त्यांनी काहीच केलं नाही, त्यांनी काश्मिरी पंडितांना उद्धवस्त केलं. मात्र या सरकारनेही आजपर्यंत आमची दखल घेतलेली नाही. काश्मिरी पंडितांचं आजही शोषण केलं जात आहे. केवळ काश्मिरी पंडितांना काश्मीरमधून काढलं, काढलं सांगितलं पण आमचं एकही काम केलं नाही,” असंही शादीलाल पंडित म्हणालेत.

नक्की वाचा >> विश्लेषण : चित्रपट टॅक्स फ्री होतो म्हणजे काय होतं? तिकिटांचे दर कमी होतात का?; फायदा कोणाला होतो?

तेव्हाच्या सरकारने आमचं म्हणणं समोर येऊ दिलं नाही
“या भावना म्हणजे ३२ वर्षांपासून साठून राहिलेला दारुगोळा आहे. या दारुगोळ्यासारख्या भावना शांत होत नाही तेवढा वेळ तर लागणार,” असं अंजली रैना यांनी म्हटलं आहे. “तेव्हाच्या सरकारने आमचं म्हणणंच समोर येऊ दिलं नाही,” असंही अंजली रैना म्हणाल्यात.

परत जायला भीती वाटते…
“अशी काय चूक केली होती आम्ही की आम्हाला असं जीवन जगावं लागत आहे?,” असा उद्विग्न प्रश्नही अंजली रैना यांनी विचारलाय. “कदाचित आता काहीतरी होईल अशी अपेक्षा आहे,” असंही अंजली रैना म्हणाल्यात. घरी परत जाण्याची आस आहे का?, असं विचारलं असता “होय इच्छा तर आहे पण मी तिथे जाणार नाही. मला फार भीती वाटते. आठवण तर येते घराची कारण जी जन्मभूमी आहे,” असं अंजली रैना यांनी सांगितलं.

राजकीय टिश्यू पेपरसारखा आमचा वापर केला
“१९९० पासून आजपर्यंत आमच्या नावाने केवळ चित्रपट बनवण्यात आले, बाकी काही झालं नाही. आजही हा चित्रपट तयार केल्याने ना माझी घरवापसी होणार, ना माझ्या देशातील लोकांचं काही समाधान होणार. ना माझ्या जम्मू-काश्मीरचं काही समाधान होणार. १९९० पासून आजपर्यंत आम्हाला एखाद्या पॉलिटिकल टिश्यू पेपरप्रमाणे वापरण्यात आलंय, आजही तेच होतंय,” असं सुनील पंडित यांनी म्हटलं.

नक्की वाचा >> The Kashmir Files च्या मुद्द्यावरुन नितेश राणेंना शिवसेनेच्या विनायक राऊतांचा पाठिंबा; म्हणाले, “हा चित्रपट…”

त्यासाठी भारत सरकारच जबाबदार
“१९९० मध्ये आम्ही येथून पलायन केलं. त्यालाही जबाबदार भारत सरकारच आहे. आज तुम्ही त्याला काहीही म्हणा पण मला वाटतं त्याप्रमाणे अशाप्रकारचे चित्रपट बनवले तर त्यामुळे दोन समाजात दरी निर्माण होईल,” असं सुनील पंडित म्हणालेत.

दोन समाजातील दरी चित्रपटामुळे वाढणार
“आम्हाला हेच दिसतय की जी दरी आमच्यात निर्माण झालेल्या त्या मिटवण्याचा आम्ही जो प्रयत्न केला, लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न केला त्याला यामुळे (चित्रपटामुळे) फटका बसेल आणि दरी पुन्हा वाढेल, कारण माझी (काश्मिरी पंडितांची) पाच हजार कुटुंब सध्या काश्मीरमध्ये आहेत,” असं सुनील पंडित यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> The Kashmir Files संदर्भातील ‘त्या’ पोस्टमुळे स्वरा भास्करवर अनेकजण संतापले; म्हणाले, “तुझ्या सॉफ्ट पॉर्न सिरीजला…”

एकतर्फी चित्रपट बनवण्यात आलाय…
“हा जो चित्रपट बनवण्यात आलाय तो एकतर्फी असून आमच्या समाजावर प्रकाश टाकण्यासाठी केलीय. अजून एखादा चित्रपट निर्माता पुढे यावा त्याने दुतर्फी विचार करुन चित्रपट बनवावा,” अशी मागणी प्यारेलाल पंडित यांनी केलीय.

नक्की वाचा >> Video: The Kashmir Files वरुन मोदींनी सुनावलं; म्हणाले, “ज्यांना वाटतं की हा चित्रपट योग्य नाही त्यांनी…”

दोन्ही बाजू मांडणारा चित्रपट बनवा…
“मी त्याला बोल्ड म्हणजे जो दुतर्फी भूमिका ठेऊन जे हत्याकांड झालंय त्यावर एक चित्रपट बनवले. म्हणून मी इतर चित्रपट निर्मात्यांना विनंती करतो की दोन्ही बाजू मांडून त्यांच्यावरही जे अत्याचार झालेत ते आणि आमच्या जखमांवर प्रकाश टाकणारा चित्रपट बनवावा. म्हणजे जगाला पण कळेल की येथील बहुसंख्य लोकांवर येथे जे अत्याचार झाले ते नक्की कुठून आले होते. त्यांना पाकिस्तानचा पाठिंबा होता,” असंही प्यारेलाल पंडित यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> “केंद्र सरकारने ‘द कश्मीर फाइल्स’वर बंदी घालावी, या चित्रपटामुळे…”; खासदाराने केली मागणी

आमच्यामधील मुस्लिमांनाही घाबरवलं, ते पाकिस्तानातून आलेले
“हा जो चित्रपट बनवलाय त्यात जे दाखवण्यात आलंय ते मी वयाच्या २७ व्या वर्षी पाहिलंय जेव्हा मी श्रीनगरमध्ये होतो १९९० साली. मला आठवतंय की १९ जानेवारीची रात्र होती. शनिवार होता. रात्रीचे पावणे नऊ वाजले होते. तेव्हा मशीदींमधून घोषणा झाली. निजाम-ऐ-मुस्तफा, ए काफिरांनो, जालिमो, कश्मीर हमारा छोड दो, अशा घोषणा झाल्या. ते पाकिस्तानी होते. मात्र आमच्यातही काही (मुस्लीम) होते ज्यांना त्यांनी घाबरवलं. त्यांना संरक्षण दिलं तर तुमचेही तेच हाल होतील असं त्यांना सांगण्यात आलं,” असं राकेश टिकू म्हणालेत.