अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख जवळ आली आहे. त्यामुळे हा सोहळा कसा होईल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. आता राम मंदिराचा संपूर्ण मॅपच समोर आला आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सचिव चंपत राय यांनी याबाबत माहिती दिली.

चंपत राय यांनी यावेळी श्री रामजन्मभूमी मंदिराच्या नकाशाचे वर्णन केले. ते म्हणाले, “हे मंदिर उत्तरेकडील ७० एकर जागेवर बांधले जात आहे. येथे तीन मजली मंदिर बांधले जात आहे. मंदिराच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले असून, पहिल्या मजल्याचे काम सुरू आहे.”

माहिती देताना चंपत राय म्हणाले की, “तीर्थक्षेत्र सुविधा केंद्र (PFC) मध्ये २५ हजार यात्रेकरूंसाठी लॉकरची सुविधा करण्यात आली आहे. पीएफसीजवळ एक छोटे रुग्णालयही बांधले जाणार आहे. चंपत राय पुढे म्हणाले की, यात्रेकरूंसाठी शौचालय आणि इतर सुविधांसाठी एक मोठे कॉम्प्लेक्सही बांधण्यात आले आहे. या संकुलातून बाहेर पडणारा कचरा या ठिकाणी दोन गटार प्रक्रिया प्रकल्पही उभारले जाणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जर आपल्याला पाण्याची गरज भासली तर शरयू नदीतून घेतलं जाईल. २० एकर जागेवर बांधकाम सुरू आहे. तर, ५० एकर जागेवर हिरवळ पसरली आहे. ही झाडे शंभर वर्षे जुनी आहेत.अशी घनदाट जंगले आहेत जिथे सूर्यकिरण जमिनीवर पोचत नाहीत.त्यामुळे जमिनीची पाण्याची पातळी कधीही खाली जाणार नाही. पाणी शरयूमध्ये जाणार नाही, आम्ही झिरो डिस्चार्ज पॉलिसीवर काम करत आहोत”, असंही ते म्हणाले.