जम्मू काश्मरीच्या किश्तवाडमध्ये एक बस दरीत कोसळून ३३ प्रवासी ठार झाले आहेत. तर २२ जण जखमी झाले आहेत. केशवानहून किश्तवाड या ठिकाणी ही बस चालली होती. त्याच प्रवासादरम्यान ही बस दरीत कोसळली आणि ३३ जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.
#UPDATE Deputy Commissioner of Kishtwar, Angrez Singh Rana: 33 dead and 22 injured after a matador vehicle coming from Keshwan to Kishtwar fell into a gorge, today. #JammuAndKashmir pic.twitter.com/fki3XzNQhU
— ANI (@ANI) July 1, 2019
#UPDATE 3 people – 2 students and the bus driver – died in the incident where a school bus rolled down a hill in Lower Khalini area of Shimla this morning. #HimachalPradesh https://t.co/5nFB9Nw7Tt
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— ANI (@ANI) July 1, 2019
किश्तवाड येथील पोलीस उपायुक्त अंग्रेज सिंह राणा यांनी सांगितलेल्या आकडेवारीनुसार या अपघातात ३३ प्रवाशांचा मृत्यू झाला. जे जखमी झाले आहेत त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचंही त्यांनी म्हटलंय. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन पोहचलं असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. या अपघातात बस चालकाचाही मृत्यू झाल्याचं एएनआयने म्हटलं आहे.
Union Home Minister Amit Shah: Extremely saddened to learn about the loss of lives due to a road accident in Kishtwar, Jammu & Kashmir. My deepest condolences to the families of those who lost their loved ones. I pray of the speedy recovery of those injured. (file pic) pic.twitter.com/qv11XlFBug
— ANI (@ANI) July 1, 2019
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ही घटना कळल्यानंतर आपल्याला अतीव दुःख झाल्याचं म्हटलं आहे. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. तसंच जे जखमी झाले आहेत त्यांना लवकारत लवकर आराम मिळावा अशी प्रार्थना मी करतो असेही अमित शाह यांनी म्हटलं आहे.