बनावट खात्यांमुळे गेल्याच आठवड्यात लॉन्च केलेली आठ डॉलर्स सबस्क्रिप्शनची ‘ब्लू टिक’ सेवा मागे घेण्याची नामुष्की ट्विटरवर ओढवली आहे. त्यानंतर या बनावट खात्यांवर आळा घालण्यासाठी ट्विटरकडून पाऊलं उचलली जात आहेत. ट्विटर लवकरच एक नवं फीचर आणणार आहे, ज्यामुळे संस्थांना त्यांच्याशी संबंधित खात्यांची ओळख पटवता येईल. ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

Twitter Blue Tick: ‘ब्लू टिक’साठी पैसे भरावेच लागणार? ट्विटरवर एलॉन मस्क यांचे सूतोवाच, म्हणाले, ‘पुढील आठवड्यात…!’

काही देशांमध्ये ट्विटरची सेवा अत्यंत संथगतीने सुरू आहे. यासाठी मस्क यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. या देशांमधील सेवा पुर्ववत सुरू होण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गेल्या आठवड्यात ट्विटरनं अमेरिका, इंग्लंडसह इतर देशांमध्ये ट्विटर ब्लू सेवा सुरू केली. मात्र, अल्पावधीतच या सेवेला बनावट खात्यांमुळे फटका बसला.

विश्लेषण: ट्विटरवरील निळय़ा खुणेची कहाणी काय?

या प्रकारामुळे व्यवसाय आणि जाहिरातदारांचे मोठे नुकसान झाले. फार्मा कंपनी ‘एली लिली’ आणि संरक्षण क्षेत्रातील प्रमुख कंपनी ‘लॉकहीड मार्टिन’ या कंपन्यांनी बनावट खात्यांमुळे अब्जावधी डॉलर्स गमावले आहेत. एका युजरने ‘एली लिली’ कंपनीचं नाव वापरून इंन्सुलीन मोफत देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होते. या प्रकारानंतर कंपनीला दिलगिरी व्यक्त करावी लागली होती.

कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांचा मोठा इशारा, म्हणाले “कंपनी दिवाळखोरीत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्विटरकडून ‘ब्लू टिक’ पूर्वी राजकारणी, पत्रकार, प्रसिद्ध व्यक्तींच्या व्हेरिफाईड खात्यांना दिली जात होती. मात्र, आता सबस्क्रिप्शन सेवेमुळे ही टिक कोणालाही वापरता येणं सहज शक्य आहे. त्यामुळे गैरप्रकार वाढल्यानं ही सेवा तात्पुरत्या स्वरुपात मागे घेण्यात आली आहे.