India Budget 2023-24 Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा आज सलग पाचवा अर्थसंकल्प आहे. आर्थिक पाहणी अहवालातून पुढील आर्थिक वर्षाचा म्हणजेच २०२३-२४ चा आर्थिक विकासाचा वेग ६ ते ६.८ टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे बाजारात काहीसं चिंतेचं वातावरण पसरलं आहे. दुसरीकडे जागतिक पटलावर या वर्षी आर्थिक मंदीची जोरदार चर्चा असताना गेल्या काही दिवसांपासून देशाच्या आर्थिक आणि राजकीय वर्तुळात आजचा अर्थसंकल्प चर्चेचा विषय ठरला होता.

या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने करदात्यांसाठी करपात्र रकमेत सूट देण्याची मोठी घोषणा केली आहे.

Live Updates

Budget 2023 Updates, Nirmala Sitharaman Speech: केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ साठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणाचे प्रत्येक अपडेट

12:09 (IST) 1 Feb 2023

कस्टम ड्युटी दर २१ पासून १३ पर्यंत खाली आणण्याचा प्रस्ताव.

कम्प्रेस्ड बायोगॅसवर चुकवण्यात आलेल्या जीएसटीवरील कस्टम ड्युटी रद्द करण्याचा प्रस्ताव.

12:08 (IST) 1 Feb 2023
२०२५-२६ आधी वित्तीय तूट जीडीपीच्या ४.५ टक्क्यांच्या खाली आणण्याचा मानस

२०२५-२६ आधी वित्तीय तूट जीडीपीच्या ४.५ टक्क्यांच्या खाली आणण्याचा मानस – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

12:06 (IST) 1 Feb 2023
ज्येष्ठ नागरिकांसाठी कमाल बचत मर्यादा वाढवली

ज्येष्ठ नागरिकांना बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा १५ लाखांवरून ३० लाखांवर वाढवण्याची घोषणा. – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

12:05 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेटची घोषणा

महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट उपलब्ध करून दिलं जाणार. दोन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र मार्च २०२५ पर्यंत उपलब्ध करून दिलं जाईल. २ लाख रुपये एखादी महिला किंवा मुलीच्या नावे दोन वर्षांसाठी ७.५ टक्के व्याजदरावर गुंतवण्याची सुविधा उपलब्ध असेल. काही प्रमाणात ही रक्कम काढण्याचीही परवानगी असेल – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:59 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: पंतप्रधान आवास योजनेच्या निधीमध्ये ६६ टक्क्यांनी वाढ

पंतप्रधान आवास योजनेच्या निधीमध्ये ६६ टक्क्यांनी वाढ

11:58 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: क्रेडिट रिव्हॅम्प स्कीमसाठी ९ हजार कोटींची तरतूद!

छोट्या व मध्यम उद्योगांसाठी जाहीर करण्यात आलेली क्रेडिट रिव्हॅम्प स्कीम १ एप्रिलपासून अंमलात येणार असून त्यासाठी ९ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा २ लाख कोटींच्या मोफत क्रेडिट गॅरंटी मिळण्यात फायदा होईल – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:57 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: ‘सुनो काँग्रेसवालों’..रामदास आठवलेंच्या कॉमेंटमुळे सभागृहात हशा!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पीय भाषण वाचताना मध्येच थांबल्या असता त्यांच्या मागे बसलेल्या रामदास आठवलेंनी मध्येच 'सुनो काँग्रेसवालों' असं म्हणताच सभागृहात हास्याची लकेर उमटली!

11:54 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: युवकांना प्रशिक्षणासाठी ३३ स्किल डेव्हलपमेंट सेंटर्सची उभारणी

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४.० पुढच्या तीन वर्षांत लाँच केली जाईल. नोकरीवरच प्रशिक्षण, व्यावसायिक भागीदारी यासह नव्या व्यावसायिक गरजांनुसार युवकांचे कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात येईल. त्यासाठी विविध राज्यांमध्ये ३३ स्किल डेव्हलपमेंट सेंटर्सची उभारणी करण्यात येईल – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:52 (IST) 1 Feb 2023
१ कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार – अर्थमंत्री

पुढच्या तीन वर्षांत सरकार १ कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देईल. यासाठी १० हजार बायो इनपुट रिसोर्स सेंटर्सची स्थापना केली जाईल – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:50 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: नैसर्गिक खतांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ‘पीएम प्रणाम’ योजनेची घोषणा!

पीएम प्रोग्रॅम फॉर रेस्टोरेशन अवेअरनेस नरीशमेंट अॅण्ड अमिलियरेशन ऑफ मदर अर्थ – पीएम प्रणामची घोषणा. यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पर्यायी खते आणि रासायनिक खतांचा समतोल वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:47 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: हरित ऊर्जा क्षेत्रासाठी ३५ हजार कोटींची तरतूद!

पर्यावरणपूरक लाईफस्टाईलला प्रोत्साहन देण्यासाठी हरित विकासावर भर देण्यात आला आहे. नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनसाठी नुकतीत ९७०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कार्बनचं उत्सर्जन कमी करण्यासाठी याचा मोठा फायदा होणार. या अर्थसंकल्पात ३५००० कोटींची भांडवली तरतूद हरित ऊर्जा क्षेत्रासाठी करण्यात आली आह – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:45 (IST) 1 Feb 2023
अर्थसंकल्प सादर होताच शेअर मार्केटमध्ये तेजी; सेसेंक्समध्ये ५०० अंकाची वाढ होऊन ६० हजार

सकाळपासूनच बाजारात तेजी पाहायला मिळत होती. गेल्या काही दिवसांत ६० हजाराच्या खाली आलेला सेसेंक्स थोड्यावेळापूर्वी ६० हजारांच्या वर गेला. अर्थसंकल्पीय भाषण संपेपर्यंत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सविस्तर वृत्त वाचा

11:44 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: ५जी सेवांचा वापर करणारे अॅप्लिकेशन्स तयार करण्यासाठी १०० लॅब्जची उभारणी

5जी सेवांचा वापर करणारे अॅप्लिकेशन तयार करण्यासाठी देशभरातल्या इंजिनिअरिंग संस्थांमध्ये १०० लॅब्ज उभारण्यात येणार – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:43 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: ई-कोर्ट्सच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ७ हजार कोटींची घोषणा!

न्यायव्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ई-कोर्ट्सच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात केली जाणार. त्यासाठी ७ हजार कोटींची तरतूद – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:42 (IST) 1 Feb 2023
सरकार नॅशनल डेटा गव्हर्नन्स पॉलिसी आणणार – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

सरकार नॅशनल डेटा गव्हर्नन्स पॉलिसी आणणार – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:41 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: पॅन कार्डसंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!

पॅन कार्डचा वापर सर्व सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये कॉमन ओळखपत्र म्हणून केला जाईल. त्यासोबतच युनिफाईड फायलिंग सिस्टीम सुरू करण्यात येणार – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:39 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: हाताने मैला उचलण्याची पद्धत बंद करणार – अर्थमंत्री

हाताने मैला उचलण्याची पद्धत बंद करणार, मशीनद्वारे मैला उचलला जाण्याची नवी योजना आणली जाणार आणि युद्धपातळीवर या योजनेची अंमलबजावणी करणार – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:38 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ५० नव्या विमानतळांची केली घोषणा

देशात ५० नवीन विमानतळांची उभारणी करणार – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:36 (IST) 1 Feb 2023
मॅनहोलचं रुपांतर मशीन होलमध्ये करणार – अर्थमंत्री

सर्व शहरांमध्ये ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करणार. त्यात मॅनहोलचं रुपांतर मशीन होलमध्ये करणार – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:33 (IST) 1 Feb 2023
२.४० लाख कोटी रुपयांची रेल्वेसाठी तरतूद – अर्थमंत्री

२.४० लाख कोटी रुपयांची रेल्वेसाठी तरतूद – अर्थमंत्री

11:32 (IST) 1 Feb 2023
सत्ताधाऱ्यांच्या मोदी, मोदी घोषणांना विरोधकांचं भारत जोडोनं उत्तर

अर्थसंकल्पीय भाषण सुरू असताना नव्या योजनांवर सत्ताधाऱ्यांकडून 'मोदी, मोदी'च्या घोषणा केल्या जात असताना विरोधकांकडून 'भारत जोडो'च्या घोषणा देण्यात आल्या. काही विरोधकांनी विरोधकांच्या बाजूचा कॅमेरा बंद असल्याचीही तक्रार केली.

11:31 (IST) 1 Feb 2023
पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीत ३३ टक्क्यांनी वाढ – अर्थमंत्री

पायाभूत सुविधांमधील भांडवली गुंतवणुकीत ३३ टक्क्यांनी वाढ करून ती १० लाख कोटींपर्यंत नेण्यात आली आहे. ही रक्कम एकूण जीडीपीच्या ३.३ टक्के आहे. – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:28 (IST) 1 Feb 2023
पुढच्या ३ वर्षांत ३८,८०० शिक्षक-कर्मचाऱ्यांची भरती – अर्थमंत्री

पुढच्या ३ वर्षांत केंद्राकडून ३८,८०० शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी भरती करेल. साडेतीन लाख विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेतात – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:26 (IST) 1 Feb 2023
शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार प्रयत्नशील – अर्थमंत्री

शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आयुष, मत्स्य, पशुपालन, डेअरी, सहकार अशा मंत्रालयांची स्थापना केली. – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:24 (IST) 1 Feb 2023
मत्स्य विकासासाठी ६ हजार कोटींची विशेष तरतूद – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

मत्स्य विकासासाठी ६ हजार कोटींची विशेष तरतूद – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:22 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: सिकल सेल एनिमियाच्या उच्चाटनासाठी प्रयत्न करणार – अर्थमंत्री

० ते ४० वयोगटातील सिकल सेल एनिमियाचं उच्चाटन करण्यासाठी केंद्रीय मंत्रालये आणि राज्य सरकारांच्या सहकार्याने संयुक्त प्रयत्न करण्यात येतील – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:21 (IST) 1 Feb 2023
budget 2023: ६३ हजार प्राथमिक कृषी क्रेडिट सोसायट्यांचं संगणकीकरण – अर्थमंत्री

सहकारातून समृद्धी साध्य करण्यासाठी नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर ६३ हजार प्राथमिक कृषी क्रेडिट सोसायट्यांचं संगणकीकरण करण्यात आलं. राष्ट्रीय सहकार डेटाबेस तयार करण्यात आला. यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणावर विकेंद्रीत स्टोरेज सुविधा निर्माण करण्यात येतील – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:18 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: श्रीअन्न संशोधन संस्थेला केंद्र सरकारकडून विशेष आर्थिक मदत

हैदराबादमधील श्रीअन्न संशोधन संस्थेला केंद्र सरकारकडून विशेष आर्थिक मदत केली जाणार – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:15 (IST) 1 Feb 2023
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद – अर्थमंत्री

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करणार. शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार – अर्थमंत्री

11:15 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: अर्थमंत्र्यांनी सांगितले यंदाच्या अर्थसंकल्पाचे सात प्राधान्य…सप्तर्षी

सर्वसमावेशक विकास, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतांचा खऱ्या अर्थाने वापर करणे, हरित विकास, तरुणांचं सामर्थ्य आणि आर्थिक क्षेत्र – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ लाइव्ह अपडेट

Budget 2023 Live Updates, Nirmala Sitharaman Speech: केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ साठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणाचे प्रत्येक अपडेट