विजय मल्ल्या कर्नाटकचा सुपूत्र; तो पळून गेलेला नाही- देवेगौडा

ल्ल्या यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या उद्योगपतीला लक्ष्य करण्यात काहीच अर्थ नसल्याचे देवेगौडा यांनी म्हटले

Vijay Mallya issue, Opposition slams govt , parilamemt, arun jaitley, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
Vijay Mallya : बँकांची तब्बल ९००० कोटींची कर्जे डोक्यावर असलेले मल्ल्या २ मार्चला परदेशात निघून गेले होते.

विजय मल्ल्या कर्नाटकचा सुपूत्र असून तो देशातून पळून गेलेला नाही, असे विधान माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी शनिवारी केले. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना देवेगौडा यांनी मल्ल्यांचे समर्थन केले. यावेळी त्यांनी किंगफिशर एअलाईन्ससंदर्भात बोलताना सांगितले की, सध्याच्या काळात अनेक विमान कंपन्या तोट्यात व्यवसाय करत आहेत. त्यामुळे मल्ल्या यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या उद्योगपतीला लक्ष्य करण्यात काहीच अर्थ नसल्याचे देवेगौडा यांनी म्हटले.
मी फरारी नाही, कायदा पाळणार – मल्या

बँकांची तब्बल ९००० कोटींची कर्जे डोक्यावर असलेले मल्ल्या २ मार्चला परदेशात निघून गेले होते. मल्ल्या सध्या लंडनच्या उत्तरेला एका खेडय़ात राहत असल्याची माहिती आहे. विजय मल्या यांना येत्या आठवडय़ात होणाऱ्या सुनावणीसाठी हजर राहण्याबाबतचे समन्स सक्तवसुली संचालनालयाने शुक्रवारी बजाविले. यासाठी मल्या यांना आता मुंबईत हजर राहावे लागेल.
सक्तवसुली संचालनालयाचे ‘पसार’ मल्यांना समन्स

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vijay mallya a son of karnataka soil he is not running away says former pm deve gowda