दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या व्होडाफोनच्या सर्व्हिसमुळे ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. व्होडाफोन ग्राहकांना रविवारी अचानक कॉलिंगसह इंटरनेटसेवा वापरण्यात अडचणी येण्यास सुरूवात झाली. ग्राहकांनी ट्विटरवरून व्होडाफोन नेटवर्कबद्दल #Vodafonedown हॅशटॅग वापरून तक्रारी करण्यास सुरूवात केली.
#Vodafonedown #VodafoneFailed My above mentioned issues yet not resolved. Such a pathetic service from @VodafoneIN Will you really hear your customers?
— Dr. Atul Tripathi (@Atulpati) September 29, 2019
व्होडाफोनची सर्व्हिस डाऊन झाल्याने कंपनीचे अनेक ग्राहक त्रस्त झाले. रविवारी सकाळपासून ग्राहकांना ही समस्या जाणवू लागल्या. त्यानंतर ग्राहकांनी ट्विटरवरून #Vodafonedown या हॅशटॅगसह तक्रारी केल्या आहेत.
#Vodafonedown i did msg bht no reply on DM it seems you are nearing your end as service provider, most useless service provider in India now
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Mayur Sharma (@mayur22sharma) September 29, 2019
अनेक ग्राहकांना नेटवर्कची समस्या भेडसावत आहेत. तर कॉलिंगसह डाटाही वापरता येत नसल्याच्या तक्रारी काही ग्राहकांनी केल्या आहेत. विशेष म्हणजे देशातील काही शहरात ही समस्या जाणवू लागली आहे. त्यावर आता मिम्सही व्हायरल होऊ लागले आहेत.
RIP #Vodafone #Vodafonedown pic.twitter.com/cmjEpzLnf0
— Deependra S Chauhan (@dpendra_chauhan) September 29, 2019
व्होडाफोनच्या सर्व्हिसबद्दल अनेक तक्रारी केल्या जात आहे. लखनऊ, अहमदाबाद, गुजरातमधूनही ट्विटरवर तक्रारी केल्या जात आहे.