युक्रेनमधून परतलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याने केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. जर तुम्ही वेळेत युद्धग्रस्त भागातून मुलांना मायदेशात परत आणू शकत नसाल तर मुलं भारतात आल्यानंतर त्यांना गुलाबाची फुलं देण्यासारख्या गोष्टींना फारसं महत्व राहत नाही, अशी टीका या विद्यार्थाने केलीय.

नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिहारमधील मोतीहार येथे राहणाऱ्या दिव्यांशू सिंह युक्रेनमधून हंगेरीमार्गे बाहेर पडला. (युद्धाच्या लाइव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा) आज दुपारी दिव्यांशू विशेष विमानाने दिल्ली विमानतळावर दाखल झालेल्या भारतीय मुलांपैकी एक आहे. या मुलांचं गुलाबाची फुलं देऊन स्वागत करण्यात आलं. पण यामुळे दिव्यांशू फारचा प्रभावित झालेलं दिसलं नाही. एनडीटीव्हीशी बोलताना त्याने युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून मदत न मिळाल्याचा आरोप केलाय. “आम्ही सीमा ओलांडून हंगेरीमध्ये दाखल झाल्यानंतर आम्हाला मदत मिळाली. त्यापूर्वी आम्हाला काहीच मदत मिळाली नाही. आम्ही जे काही केलं ते स्वत:च्या जोरावर केला. आम्ही दहा जणांचा एक गट केला आणि ट्रेनने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असतानाही आम्ही प्रवास केला,” असं दिव्यांशू म्हणाला.

नक्की वाचा >> Ukraine War: रशियन उद्योजकाने दिली पुतिन यांची साडेसात कोटींची सुपारी; म्हणाला, “जिवंत किंवा मृत पकडून…”

एका देशाची सीमा ओलांडून दुसऱ्या देशात जाण्याचा प्रयत्नात असणाऱ्या, ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच दिव्यांशूने मात्र वेगळा अनुभव आल्याचं सांगितलं. “स्थानिकांनी आम्हाला मदत केली. कोणीच आम्हाला चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली नाही. पण काही मुलांना पोलंडच्या सीमेजवळ वाईट वागणूक नक्की मिळाली, मात्र या साऱ्यासाठी आपलं सरकार जबाबदार आहे. त्यांनी वेळेत पावलं उचललं असती तर आम्हाला एवढ्या अडचणींचा सामाना करावा लागला नसता. अमेरिकने त्यांच्या नागरिकांना कधीच देश सोडण्यास सांगितलं होतं,” असं दिव्यांशी म्हणाला.

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांचा मोदींना कॉल, रशियाने केला धक्कादायक दावा; म्हणाले, “युक्रेननेच भारतीय…”

दिल्लीमध्ये उतरल्यानंतर दिव्यांशूला देण्यात आलेलं गुलाबाचं फुल हातात पकडून, “आता आम्ही इथे आलो आहोत तर आम्हाला हे दिलं आहे. याला काय अर्थ आहे? आम्ही याचं काय करणार? आम्हाला तिथं काही झालं असतं तर आमच्या कुटुंबांनी काय केलं असतं?,” असे रोकठोक प्रश्न दिव्यांशूने विचारलेत.

नक्की वाचा >> Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…

दिव्यांशूने आमच्या गटाने वेळेत निघण्याचा निर्णय घेतल्याने आमच्या मागून येणाऱ्यांना त्याचा फायदा झाल्याचं सांगितलं. सरकारने आधीच काम केलं असतं तर आता ही अशी फुलं वाटण्याची गरज सरकारला पडली नसतील. “वेळीच पावलं उचलली असती तर हे सारं करण्याची गरज पडली नसती. आमच्या कुटुंबांना आमची फार काळजी वाटत होती,” असं दिव्यांशू म्हणाला. मागील काही दिवसांपासून ऑपरेशन गंगाअंतर्गत युक्रेनच्या शेजारी देशांमधून भारतात परतणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री गुलाबाची फुलं देऊन ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत स्वागत करताना दिसत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What to do with this rose back from ukraine student slams centre scsg
First published on: 03-03-2022 at 16:39 IST