स्मार्ट दिल्लीचे भाजपचे व्हिजन!

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच भारतीय जनता पक्षाकडून मंगळवारी जाहीरनाम्याऐवजी व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध करण्यात आले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच भारतीय जनता पक्षाकडून मंगळवारी जाहीरनाम्याऐवजी व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध करण्यात आले. दिल्लीतील नागरिकांना भेडसावत असलेले वाहतूक, गृहबांधणी, पाण्याची कमतरता आणि पर्यावरण या सर्व प्रश्नांवर उपाय शोधून दिल्लीला स्मार्ट शहर बनविण्याचे आश्वासन या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये देण्यात आले आहे. दिल्लीकरांचे आदर्श शहराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचा भाजप प्रयत्न करेल, असे पक्षाचे दिल्लीचे अध्यक्ष सतीत उपाध्याय यांनी सांगितले.
दिल्लीमध्ये येत्या शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर एका औपचारिक कार्यक्रमात पक्षाच्या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी, केंद्रीय मंत्री अनंतकुमार, हर्षवर्धन आणि निर्मला सितारामन उपस्थित होते. अत्यावश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी पायाभूत सुविधांची वेगाने उभारणी करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
केंद्र सरकारसोबत वाद घालण्यापेक्षा त्यांच्या सहकार्याने दिल्ली सरकार विकास कामे करेल, असा टोला यावेळी बेदी यांनी आम आदमी पक्षाच्या केजरीवाल यांना लगावला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Will make delhi a world class city says bjp in vision document