Why Your pet dog always plays in the trash : तु्म्ही अनेकदा पाहिले असेल की, कुत्रे अनेकदा कचऱ्याबरोबर खेळतात. पण, ते असे का करतात याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? कचऱ्याशी खेळून कुत्र्यांना काय मिळते? हे कितीही विचित्र वाटत असले तरी ही गोष्ट त्यांना प्रेरणा देते. पशुवैद्य नॅन्सी ड्रेसेल सांगतात, कुत्र्यांना कचऱ्याचा वास आणि त्याची चव आवडते.”
नॅन्सी सांगतात, “कुत्र्यांना वास घेण्याची एक अद्भुत भावना असते. त्यांच्या नाकात वास घेण्यासाठी ३०० दशलक्ष रिसेप्टर्स असतात; तर मानवामध्ये फक्त ६० दशलक्ष रिसेप्टर्स असतात. लोक कुत्र्यांच्या वास घेण्याच्या क्षमतेचा वापर करून घेतात. त्यांना बेकायदा औषधे, स्फोटके व धोक्यात असलेल्या प्रजाती शोधणे आणि जंगलात हरवलेल्या लोकांना शोधण्यात मदत करणे यांसाठी प्रशिक्षण दिले जाते.”
तुमच्या कचऱ्याचा वास तुम्हाला आवडणार नाही; परंतु सफरचंद वा केळीच्या साली, मांसाचे तुकडे व शिळा ब्रेड ही तुमच्या कुत्र्यासाठी जणू आकर्षक मेजवानी ठरते. आदल्या दिवशीच्या जेवणाच्या वासाने मळलेले व वापरलेले नॅपकिन्स आणि पेपर टॉवेलदेखील कुत्र्यांना आकर्षित करतात.
जर कुत्रे हिमस्खलनानंतर स्फोटकांचे प्रमाण किंवा सहा फूट (१.८ मीटर) बर्फाखाली गाडलेली व्यक्ती शोधू शकतात, तर ते स्वयंपाकघरातील कचऱ्याच्या डब्यात आदल्या रात्रीचे पिझ्झा क्रस्ट व चिकनची हाडे शोधण्यात नक्कीच सक्षम आहेत.
कुत्र्याला कचऱ्यात खेळायला का आवडते?
कधी कधी हे आकर्षण काय आहे हे समजणे कठीण असते. रिकाम्या डब्यांचा वासही कुत्र्यांना आकर्षित करतो. स्वयंपाकघर आणि बाथरूममधील कचऱ्याचे डबे बहुतेकदा त्यांच्या नाकाच्या उंचीपर्यंत असतात ज्यामुळे त्यापर्यंत ते सहज पोहोचू शकतात. जर कुत्रा एकदा कचऱ्यात गेला आणि त्याला काहीतरी चविष्ट सापडले असेल, तर तिथे पुन्हा त्यात आणखी काहीतरी चविष्ट सापडेल या आशेने तो पुन्हा पुन्हा कचरा शोधत राहतो.
शिकारीचा थरार अनुभवतात (Thrill of the hunt)
जरी कुत्र्याने नुकतेच अन्न खाल्ले असेल किंवा त्यांना भूक लागली नसली तरीही ते अन्न शोधतात आणि जमीन खोदतात. हे नैसर्गिक आहे. कारण- ही सवय त्यांना काहीसा शिकारीचा थरार अनुभवण्याची संधी देते.
सर्वांत यशस्वी प्रागैतिहासिक कुत्रे (prehistoric dogs) १०,००० वर्षांपूर्वी मानवांनी मागे सोडलेली हाडे आणि कचरा खात असत. मानवाभोवती आणि त्यांच्या कचऱ्याभोवती फिरणे हा त्यांचा भरपूर अन्न मिळवण्याचा मार्ग होता.
शिकार आणि अन्न गोळा करण्याच्या काळापासून कचऱ्याचे स्वरूप बदलले असले तरी आपण टाकून दिलेले कागदी नॅपकिन्स, प्लास्टिकचे रॅपर आणि अन्नाचा कचरा यातून कुत्र्यांना अजूनही अन्नासारखा वास येतो आणि मग या कचऱ्याला खाणे समजून, तसे खाण्याचे वर्तन करणे हे या पाळीव प्राण्यामध्ये अजूनही कायम आहे. जरी कुत्रे कचऱ्याशी खेळत असल्यासारखे वाटत असले तरी कुत्रे कचऱ्यातून वस्तू बाहेर काढतात, फाडतात आणि त्यांना फेकतात. अशा वेळी त्यांच्या पूर्वजांनी जे केले होते, त्याची नक्कल ते नकळतपणे करतात.
बरेच लोक या प्रवृत्तीचा फायदा घेतात आणि त्यांच्या पिल्लांचे मन सक्रिय ठेवण्यासाठी ‘स्नफल मॅट्स’ वापरतात. स्नफल मॅट्स हे कापड किंवा कागद जिथे अन्न लपवले जाते किंवा खायला देणारी खेळणी वापरतात. शिकार करून अन्न शोधण्याची प्रवृत्ती त्यांना त्यांच्या नाकांचा वापर करण्यास मदत करते आणि त्यांची कौशल्ये तीक्ष्ण करते.
त्रासदायक किंवा धोकादायकही (Annoying or even dangerous)
कुत्र्यांनी घरात कचरा पसरवणे स्वाभाविक असू शकते; परंतु त्यांच्याबरोबर राहणार्या लोकांसाठी त्यांचे ते कृत्य अजिबात मजेशीर नसते. जर तुमचा कुत्रा कचऱ्याच्या डब्यात नाक खुपसताना दिसला, तर त्यामुळे त्याचा जीव धोक्यातही येऊ शकतो. प्लास्टिकच्या पिशव्या, दोरी, कोंबडीची हाडे, रसायने किंवा कुजलेले अन्न खाल्ल्याने त्रास होणे, अतिसार आणि विषबाधा होऊ शकते. सामान्यतः Garbage Gut म्हणून ओळखली जाणारी ही कचऱ्याची विषबाधा जीवघेणी असू शकते.
“कुत्र्यांवर उपचार करताना कॅन किंवा तुटलेल्या काचेत अडकलेल्या जीभ वा तोंडामुळे ते कापावे लागले होते. एकदा एक महिन्यापूर्वी खाल्लेला कॉर्नकोब काढण्यासाठी कुत्र्याच्या आतड्यांची शस्त्रक्रिया करावी लागली आणि जागा झाल्यावर त्याला नक्कीच आराम मिळाला”, असे नॅन्सी यांनी सांगितले.
तुम्ही तुमच्या कुत्र्यांना कचऱ्यापासून कसे दूर ठेवू शकता? (How can you keep your dogs away from the trash?)
कुत्र्याला कचऱ्यापासून दूर राहण्यास शिकवणे कठीण असू शकते; विशेषतः जर त्यांनी पूर्वी कचरापेटीतील एक किंवा दोन चविष्ट गोष्टींवर ताव मारला असेल तर. तुम्ही अशी कचरापेटी खरेदी करा जिचे झाकण कुंडी लावून बंद करता येते आणि ती कुत्रा सहज उघडू शकणार नाही. जर हा प्रयत्न अयशस्वी झाला, तर तुम्ही कचरा, विशेषतः अन्नाचे तुकडे हे दार बंद असलेल्या अशा ठिकाणी ठेवा, जिथे श्नान पोहोचू शकणार नाही. तसेच बाथरूमचे दरवाजे नेहमीच बंद ठेवा.
कुत्र्यांच्या मनात नेमके काय चालले आहे हे कोणालाही माहीत नाही आणि तरीही तुमच्या कुत्र्यांना काय प्रेरणा देते आणि कुत्र्यांच्या वर्तनात कसा विकास झाला आहे हे पाहिल्यास हे प्राणी ते करत असलेल्या गोष्टी का करतात हे स्पष्ट होण्यास मदत होऊ शकते.