Change Your Name, Journey Date On Train Ticket: भारतीय रेल्वे ही जगातील सर्वांत मोठ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांपैकी एक आहे. भारतीय रेल्वे दररोज सुमारे १२,००० गाड्या चालवते आणि दररोज लाखो प्रवाशांना वाहतूक सेवा पुरवते. भारतीय रेल्वेचे तिकीट IRCTC वेबसाइट (irctc.co.in)वरून ऑनलाइन किंवा रेल्वेस्थानकांवरील भारतीय रेल्वे तिकीट खिडकीवरून आरक्षित करता येते. त्याशिवाय तुम्ही मोबाइल ॲप्ससह थर्ड पार्टी विक्रेत्यांकडूनही तिकीट आरक्षित करू शकता.

नाव किंवा तारखेत बदल

काही कारणास्तव तुम्हाला प्रवासाची तारीख आणि कन्फर्म ट्रेन तिकिटावरील प्रवाशाचे नाव बदलण्याची आवश्यकता असेल, तर भारतीय रेल्वेकडे बदल करण्याच्या तरतुदी आहेत; ज्यासाठी विशिष्ट प्रक्रियांचे पालन करावे लागते.

Sleeper Vande Bharat Express test run successful on Western Railway
पश्चिम रेल्वेवर शयनयान वंदे भारतची चाचणी यशस्वी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Traffic changes in Yerwada area on the occasion of Army Day procession
सेना दिन संचलनानिमित्त येरवडा भागात वाहतूक बदल
badlapur khopoli trains news
बदलापूर – खोपोली लोकल बंद, कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक
Heavy Vehicles Ban on Ghodbunder Road for metro work
घोडबंदर मार्गावर मेट्रोच्या कामासाठी अवजड वाहतूकीला बंदी; ठाणे वाहतूक पोलिसांनी काढली अधिसुचना
mmrda planning to build a creek bridge from kasarvadavali to kharbav in bhiwandi
ठाणे आणि भिवंडी शहरातील अंतर कमी होणार; कासारवडवली ते खारबाव खाडीपुलासह जोडरस्ता प्रकल्पाची आखणी
Online railway ticket purchases facility unavailable for disabled
अपंगांना ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग सुविधा केंव्हा मिळणार?
Problems faced by disabled passengers due to lack of online railway ticket purchase facility
ऑनलाइन रेल्वे तिकीट खरेदीची सुविधा नसल्याने अडचणी; अपंग प्रवाशांची रांगेत परवड

ट्रेन तिकिटातील नावात बदल : ही सेवा रेल्वे तिकीट खिडकीवरून आरक्षित केलेल्या ऑफलाइन ट्रेन तिकिटांपुरतीच मर्यादित आहे. विशेष म्हणजे ही सुविधा केवळ कुटुंबातील जवळच्या सदस्याला हस्तांतरित करण्याइतकीच मर्यादित आहे. गट आरक्षणातील तिकिटे गटामध्येच हस्तांतरित करता येतात.

हेही वाचा… ‘GPS’चा फूल फॉर्म तुम्हाला माहितीये का? ते कसे काम करते व त्याचा वापर काय, जाणून घ्या

रेल्वे आरक्षण खिडकी

रेल्वे तिकिटाचे आगाऊ आरक्षण करण्यासाठी तुम्हाला ट्रेन सुटण्याच्या किमान २४ तास आधी जवळच्या रेल्वे आरक्षण खिडकीला भेट द्यावी लागेल. मूळ तिकीटधारक आणि नवीन प्रवासी या दोघांसाठी नाव बदलण्याचा आणि ओळखपत्र पुराव्याची विनंती करणारा लेखी अर्ज करावा लागेल.

ट्रेन तिकिटातील तारीख बदल : प्रवासाच्या तारखेतील बदल ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही तिकिटांसाठी उपलब्ध आहे; परंतु दोन्ही प्रकारच्या तिकिटांसाठी प्रक्रिया भिन्न आहे.

ऑफलाइन ट्रेन तिकीट

ऑफलाइन ट्रेन तिकिटांसाठी ट्रेन सुटण्याच्या किमान ४८ तास आधी जवळच्या रेल्वे आरक्षण कार्यालयात जाऊन प्रवाशाला मूळ तिकीट आणि तारीख बदलण्याची विनंती करणारा अर्ज दाखवावा लागेल. तारखेतील हा बदल त्या ट्रेनमध्ये त्या दिवशी उपलब्ध असलेल्या आसन वा शायिकांवर अवलंबून असतो.

हेही वाचा… इ़डलीला इंग्रजीत काय म्हणतात हे माहित आहे का? जाणून घ्या

ऑनलाइन ट्रेन तिकीट

ऑनलाइन आरक्षित केलेल्या तिकिटांसाठी (IRCTC मार्फत) तारीख बदलण्याची सुविधा थेट उपलब्ध नाही. परंतु, तुम्ही विद्यमान तिकीट रद्द करून, इच्छित तारखेवर नवीन तिकीट बुक करू शकता. त्यासाठी सामान्य रद्दीकरण शुल्क आकारले जाईल.

Story img Loader