येत्या काही महिन्यांमध्ये अनेक महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यापूर्वी मतदार यादीत नाव नोंदवण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. अद्याप आपले नाव मतदार यादीत समाविष्ट झालेले नसेल तर ती प्रक्रिया पूर्ण करता येईल. १८ वर्ष पूर्ण झालेल्या भारतीय तरुण नागरिकांना मतदानाचा हक्क मिळतो. अशा १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदान करू इच्छिणाऱ्या सर्व युवक, युवतींना पहिल्यांदा मतदान करण्यापूर्वी मतदार यादीत नाव नोंदणी करणे आवश्यक असते. एका बाजूस नवीन मतदारांची नावे यादीत समाविष्ट केली जात असतानाच दुसरीकडे मतदार यादी अद्ययावत करण्याचे कामही सुरू असते.

दोन निवडणुकांच्या दरम्यानच्या काळात काहींचा मतदार संघ बदलेला असतो. वास्तव्याचे ठिकाण बदलले की, आधीच्या मतदार संघातून मतदार यादीतून नाव कमी (डिलीट) करावे लागते. ते केल्यानंतरच दुसऱ्या म्हणजेच नवीन वास्तव्यास गेलेल्या ठिकाणी तुमचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाऊ शकते. त्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागते जाणून घ्या.

आणखी वाचा : मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याची ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धत कोणती? जाणून घ्या

मतदार यादीतून नाव काढून टाकण्यासाठी या सोप्या स्टेप्स वापरा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • मतदाराचे स्थलांतर झालेले असेल किंवा त्यांच्या माहितीमध्ये चूक असेल अथवा मतदाराचा मृत्यू झालेला असेल तर या परिस्थितींमध्ये मतदार यादीतून नाव काढून टाकणे आवश्यक असते.
  • यासाठी ‘फॉर्म ७’ चा वापर केला जातो.
  • तुम्ही ‘फॉर्म ७’ भरून मतदार यादीतून नाव काढून टाकण्यासाठी अर्ज करू शकता.
  • हा फॉर्म निवडणूक नोंदणी विभागाच्या अधिकृत वेबसाईटर उपलब्ध आहे. अशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही मतदार यादीतून नाव काढण्यासाठी अर्ज करू शकता.

या प्रक्रियेबाबत काही शंका असेल तर तुम्ही १९५० या क्रमांकावर फोन करु शकता. (या नंबरपुर्वी तुमचा एसटीडी कोड टाका).