How to send photos wirelessly: तुम्हालाही फोटोस एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलमध्ये कसे पाठवायचे हे कळत नाहीये? ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? ट्रिपनंतर मित्रांना फोटो पाठवण्याचा वैताग येतोय? काळजी करु नका. अनेकदा आपण व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवतो आणि त्याची क्वालिटी निघून जाते. खराब फोटो आले की कुणालाच आवडेल. चांगल्या क्वॉलिटीचे फोटो आले नाही की कुणाचाही मूड खराब होतो. कारण, आपण छान कपडे घातलेले असतात. त्यातही हे फोटो फॅमिली किंवा मित्र-मैत्रिणींना पाठवायचे असतील तर टेन्शन वाढत. पण, चिंता करू नका. एक अतिशय सोपी ट्रिक आहे. त्याने तुम्ही आयफोनमधून अँड्रॉईडमध्ये किंवा अँड्रॉईडमधून आयफोनमध्ये फोटो सहज ट्रान्सफर करु शकता.

पद्धत १ : स्नॅपड्रॉप
या पद्धतीचा वापर करून, तुम्ही Snapdrop.net ला भेट देऊ शकता, जे डिव्हाइसेस दरम्यान फाइल ट्रान्सफर करण्यासाठी एनक्रिप्टेड पीअर-टू-पीअर ट्रान्सफर वापरते. तुम्ही फायली Android वरून iOS, iOS वरून Android, Android ला लॅपटॉपवर किंवा अगदी Android वरून Mac वर ट्रान्सफर करू शकता.

Waiting again for start traffic in second tunnel of Kashidi
कशेडीच्या दुसऱ्या बोगद्यातील वाहतुकीसाठी पुन्हा प्रतिक्षा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Treatment options for Smartphone vision syndrome
Smartphone vision syndrome: तुम्हीही मोबाईलवर सतत स्क्रोल करत असता का? मग होऊ शकतो स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोम; वाचा लक्षणे आणि उपाय
A Pune driver installed an aquarium in auto rikshaw
‘पुणे तिथे काय उणे!’ रिक्षाचालकाने प्रवाशांसाठी रिक्षात काय ठेवले पाहा; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Uber driver offer different facilities
‘फ्लाइटपेक्षा उत्तम…’ कॅबमध्ये खाण्यापिण्याची सोय पाहून प्रवासी झाला खूश; PHOTO शेअर करीत म्हणाला…
Mumbai tempo driver and traffic police dispute over clicking picture of vehicle video viral
“कोणाला विचारून फोटो काढला?”, कांदिवलीत टेम्पो चालकाने वाहतूक पोलिसांना विचारला जाब, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं…
Father Disappointed After Seeing Daughters English In Whatsapp Chat Viral on social media
PHOTO: वडिलांनी मुलीला ४० हजार पाठवल्याचा मेसेज केला; यावर मुलीचा रिप्लाय पाहून वडिल झाले शॉक; व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
Man using mobile phone while road crossing police slapped him shocking video viral on social media
यात चूक कोणाची? रस्ता ओलांडताना मोबाइल बघत होता म्हणून पोलिसांनी तरुणाबरोबर काय केलं पाहा…, तो रस्त्याच्या मधोमध खालीच बसला, VIDEO एकदा पाहाच

यासाठी सर्वात आधी आपल्या डिव्हाइसच्या ब्राउझरवर Snapdrop.net उघडा आणि नंतर तीच वेबसाइट इतर डिव्हाइसच्या ब्राउझरवर उघडा. हे करण्यासाठी दोन्ही मोबाईल समान Wi-Fi नेटवर्कशी कनेक्ट केलेली असणे आवश्यक आहे. एकदा उपकरणे स्क्रीनवर दिसू लागल्यावर, तुम्ही शेअर करू इच्छित असलेल्या फाइलवर सिलेक्ट करा, ती निवडा आणि ती पाठवा. त्यानंतर ज्या मोबाईलमध्ये फाइल्स येणार आहेत त्यात एक पॉप-अप नॉटिफिकेशन येईल, जिथे तुम्ही “सेव करा” दाबू शकता. फाइल, फोटो किंवा इतर कोणतेही डॉक्युमेंट, नंतर डिव्हाइसमध्ये सेव केले जाईल.

पद्धत २ : क्लाउड स्टोरेज सेवा

क्लाउड स्टोरेज एक उत्कृष्ट पर्याय बनला आहे. Google Drive किंवा Microsoft OneDrive सारख्या क्लाउड स्टोरेज सेवा वापरून, तुम्ही पाठवणाऱ्या डिव्हाइसवरून तुमच्या फायली सहजपणे अपलोड करू शकता आणि लिंक शेअर करू शकता. नंतर फाइल डाउनलोड करू शकतो. ही पद्धत सुरक्षित, वापरण्यास सोपी आहे आणि सर्व प्लॅटफॉर्मवर कार्य करते, मग ती iOS, Android, iPadOS, Mac किंवा Windows असो.

हेही वाचा >> PHOTO: भारतातील पहिल्या सेल्फीची कहाणी; ‘या’ राजानं आपल्या राणीसोबत काढलेला पाहिला सेल्फी पाहिला का?

पद्धत ३ : व्हाट्सएप वापरून फाइल्स पाठवा

तुम्ही फायली पाठवण्यासाठी WhatsApp देखील वापरू शकता. हे करण्यासाठी, कोणत्याही चॅटमधील डॉक्युमेंट आयकॉनवर टॅप करा, “डॉक्युमेंट” पर्याय निवडा आणि तुमची इमेज फाइल किंवा तुम्हाला पाठवायची असलेली कोणतीही फाइल सिलेक्ट करा. व्हाट्सएप तुम्हाला २ GB पर्यंतच्या आकाराच्या फाइल्स पाठवण्याची परवानगी देते. फक्त फाइल निवडा आणि ती पाठवा. ही पद्धत वायरलेस पद्धतीने कार्य करते आणि कोणत्याही केबलची आवश्यकता भासत नाही.

Story img Loader