Spam phone calls: सध्या स्मार्टफोन्सचा जमाना आहे. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या हातामध्ये फोन पाहायला मिळतो. डिजिटल क्रांतीनंतर यांच्या वापरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. स्मार्टफोन्स आजच्या काळाची गरज आहे. करोना काळामध्ये फोनमुळे लोक एकेमकांशी जोडले गेले. शिक्षणापासून ते मनोरंजनापर्यंत प्रत्येक बाबतीमध्ये या उपकरणाची आपल्याला साथ मिळाली.

गेल्या काही वर्षांमध्ये बॅंकासह अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती झाली आहे. आता बॅंका देखील ऑनलाइन झाल्या आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून पैश्यांचे व्यवहार केले जातात. स्मार्टफोन्सचा वाढत्या वापरामुळे फसवणूकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खोट्या नावाने कॉल करुन लोकांना फसवले जाते. जेष्ठ नागरिक अशा प्रकारांना सहज बळी पडतात. हे होऊ नये यासाठी बनावटी स्पॅम कॉल्सना (Spam calls) रोखणे आवश्यक असते. स्मार्टफोनमध्ये काही सेटिंग्स बदलून स्पॅम कॉल्स ब्लॉक करता येतात.

IOS वापरकर्त्यांसाठी –

आयफोनमध्ये स्पॅम कॉल्स ब्लॉक करण्यासाठी ट्रू कॉलर हे अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. ट्रू कॉलर इन्स्टॉल केल्यानंतर फोन सेटिंग्समध्ये जावे. त्यात कॉल ब्लॉकिंग अ‍ॅन्ड आयडेन्टिफिकेशन या ऑप्शनवर क्लिक करावे. तेथील सर्व चार पर्याय टॉगल करा. आता ट्रू कॉलर सुरु करुन त्यावरील अनएबल स्पॅम डिटेशन हा पर्याय दिसल्यावर त्यावर क्लिक करा. यामुळे स्पॅम कॉल्स ब्लॉक होत नसले, तरी ते एकूण डाटाबेसमधील फोन नंबर्सची तुलना करुन आलेला कॉल बनावटी तर नाही ना याची माहिती देईल.
(go to settings > phone > call blocking and identification > toggle all four options > open true caller > enable spam detection)

आणखी वाचा – Meta Layoff: ‘मेटा’ पुन्हा एकदा करणार कर्मचाऱ्यांची कपात, सात हजार कर्मचाऱ्यांना दिले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Android वापरकर्त्यांसाठी –

तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये गुगल डायलर आहे का हे चेक करा. जर असेल तर ते ओपन करा. त्याच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तीन डॉट्स दिसतील. त्यावर क्लिक करुन सेटिंग्स ऑप्शन निवडा. पुढे कॉलर आयडी अँड स्पॅम यावर क्लिक करा आणि अनएबल फिल्डर स्पॅम कॉल्स हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला येणारे स्पॅम कॉल आपोआप ब्लॉक होतील.
(google dialer > > settings > caller ID and spam > and enable filter spam calls)