Green Railway In India : भारतीय रेल्वेने त्यांच्या रेल्वे लाईनच्या इलेक्ट्रिफिकेशन मध्ये एक महत्वाचं आणि मोठं यश प्राप्त केलं आहे. उत्तर-पूर्व रेल्वेच्या सुभागपूर-पछपेरवा ब्रॉडगेज रुटचं इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण झालं असून उत्तर प्रदेश राज्यात भारतीय रेल्वेचा १०० टक्के ब्रॉडगेज नेटवर्कचं विद्युतीकरण झालं आहे. रेल्वे मंत्रालयाने नुकतचं याबाबत माहिती सादर केली आहे. रेल्वे रुटच्या विद्युतीकरणामुळे उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेसेवा अधिक चांगल्या होण्याबरोबरच ट्रेनच्या वेगातही सुधारणा होईल. यामुळे प्रवासी वेळेआधीच त्यांच्या थांब्यापर्यंत पोहचू शकतील, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलीय.

भारतीय रेल्वेच्या ६ झोनचे झाले विद्युतीकरण

सध्याच्या घडीला भारतीय रेल्वेत १८ झोन आहेत. ज्यामध्ये उत्तर पूर्व रेल्वेच्या सुभागपूर-पछपेरवा रेल्वे सेक्शनवर विद्युतीकरणाचे काम पूर्ण होण्यापासून ६ रेल्वे झोन, उत्तर पूर्व रेल्वे, इस्ट कोस्ट रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे, पूर्व रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे आणि पश्चिम मध्य रेल्वेचंही पूर्णत: विद्युतीकरण झालं आहे. यामध्ये उत्तर पूर्व रेल्वे सर्वात नवीन आहे. याशिवाय, झांसी-मुजफ्फरपूर-कटनी रेल्वे सेक्शनचंही पूर्णपणे विद्युतीकरण करण्यात आलं आहे.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Mega block on Sunday on Western Railway
मुंबई : पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
iral Video Shows Woman Police Officer Dancing On Railway Station
रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गणवेशात नाचणाऱ्या तरुणीचा Video Viral! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

नक्की वाचा – सुसाट धावते अन् झुकझुक आवाजही येत नाही, वंदे भारत एक्स्प्रेसची खासीयत माहितेय का?

२०३० पर्यंत ग्रीन रेल्वेचे काम होईल पूर्ण

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकप्ल २०२३ मध्ये घोषणा करताना म्हटलं होतं की, रेल्वेला २.४ लाख कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यांनी भाषणादरम्यान ग्रीन रेल्वेचाही उल्लेख केला होता. इथे ग्रीनचा अर्थ हरीत उर्जा म्हणजे ग्रीन एनर्जी असा होतो. ग्रीन रेल्वेत हायड्रोजन ट्रेनचा समावेश असेल. भारतीय रेल्वे जगातील १०० टक्के ग्रीन रेल्वे लवकरच बनेल, असा विश्वासही सीतारमण यांनी व्यक्त केला होता. २०३० पर्यंत भारतीय रेल्वे नेट जीरो कार्बन उत्सर्जनच्या टार्गेटला पूर्ण करून जगातील नंबर वन ग्रीन रेल्वे बनेल.

ग्रीन रेल्वे किंवा हायड्रोजन ट्रेन म्हणजे काय?

हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनला हायड्रोजन ट्रेन किंवा ग्रीन रेल्वे म्हणतात. या ट्रेनमध्ये वीज आणि डिझेलची बचत होते. हायड्रोजन ट्रेनमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सीजन यांच्या माध्यमातून बनवलेल्या उर्जेचा समावेश केला जातो. या उर्जेचा वापर करुन ट्रेन चालवली जाते. दूरच्या प्रवासासाठी या ट्रेनचा उपयोग केला जाऊ शकतो. या ट्रेनमुळं प्रदुषण होत नाही. १५ मिनिटांपेक्षाही कमी वेळात ही ट्रेन १४० किमी/तास इतका वेग पकडू शकते. या ट्रेनमध्ये आवाज होत नाही. तसंच ही ट्रेन खूप आरामदायकही असते.