गाय हा अतिशय उपयुक्त पाळीव प्राणी असल्याचे नेहमीच म्हटले जाते. गाईचे दूध, गोमूत्र आणि इतर अनेक गोष्टी मानवी शरीराला अत्यंत उपयुक्त असल्याचे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. तसेच हिंदू धर्मसंस्कृतीत गाईला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात गाईला देवाचा दर्जा दिला गेला आहे. यापलीकडे गाईंबद्दल काही गोष्टी अशा आहेत; ज्या तुम्हाला माहिती नसतील. याच काही न माहिती असलेल्या गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेऊ.

गाईंचा उगम तुर्कीमध्ये

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

पाळीव गाई; ज्यांना टॉरीन गाई म्हणूनही ओळखले जाते. या गाई ऑरोच म्हणून ओळखल्या जाणार्‍या जंगली बैलांच्या वंशज आहेत आणि त्या सुमारे १०,५०० वर्षांपूर्वी आग्नेय तुर्कीमध्ये प्रथम पाळण्यात आले होते. दुसरी उपप्रजाती; ज्यांना झेबू गुरेही म्हणतात. त्यानंतर भारतात १६२७ मध्ये जंगली ऑरोच अतिशिकार आणि नुकसानीमुळे नामशेष झाले असताना त्यांची आनुवंशिकता अनेक वंशजांमध्ये राहिली; ज्यामध्ये पाणथळ म्हशी, जंगली याक आणि अर्थातच पाळीव गाई यांचा समावेश होता.

गुरेढोरे हा शब्द कुठून आला?

गुरेढोरे हा शब्द फ्रेंच शब्द ‘चॅटेल’ यावरून आला आहे. चॅटेल म्हणजे मालमत्ता. जगाच्या अनेक भागांमध्ये गुरेढोरे आर्थिक संपत्तीचे सूचक मानले जाते.

गुराढोरांमध्ये मादी गुरे आणि नर गुरे

मादी गुरांना गाय; तर नर गुरांना बैल म्हणतात. साधारणपणे इंग्रजीमध्ये आपल्याकडे एकच शब्द असतो; जो आपण प्रजातीच्या नर किंवा मादी दोघांसाठीही वापरू शकतो. उदा. मांजर किंवा कुत्रा. पण, गाय किंवा बैलाला समान रीतीचा संदर्भ असणारी एकवचनी संज्ञा नाही. आपल्याकडे फक्त गुरेढोरे असं बोलतात; जे बहुवचन आहे.

गाई या खूप आळशी असतात

गाई या खूप आळशी असतात, त्यांना आराम करायला आवडतो. गाई दिवसातील १० ते १२ तास आडव्या पडून घालवतात; परंतु त्यापैकी बहुतेक वेळ झोपेचा नसून, त्यांचा विश्रांतीचा वेळ असतो. झोपेच्या अभावामुळे गाईंच्या आरोग्य आणि वागणुकीवर परिणाम होतो.

गाईंना खेळायला आवडते

गाई सस्तन प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या खेळांमध्ये गुंततात; ज्यात बॉल खेळणे, धावणे यासारख्या गोष्टीदेखील समाविष्ट आहेत. कुत्र्यांप्रमाणेच गाईंना डोके, मान किंवा पाठीवर गोंजारलेले आवडते.

गाईंना चांगले मित्र असतात

तुम्हाला माहितीये का गाईंना चांगले मित्र असतात. जेव्हा ते त्यांच्या आवडत्या जोडीदारापासून वेगळ्या होतात तेव्हा त्या तणावग्रस्त होतात. एका अभ्यासात क्रिस्टा मॅक्लेनन यांनी असा निष्कर्ष काढला की, गाईंना आवडते मित्र असतात आणि ते वेगळे झाल्यावर त्या तणावग्रस्त होतात. “जेव्हा पाळीव प्राणी त्यांच्या पसंतीच्या जोडीदारासोबत असतात, तेव्हा त्यांच्या हृदयाच्या गतीच्या दृष्टीने त्यांच्या तणावाची पातळी कमी होते.

हेही वाचा >> ब्लेडच्या मध्यभागी मोकळी जागा का असते? ‘हे’ आहे त्यामागील खरं कारण…

गाईंना पोहणे अवगत

गाईंना उत्तमरीत्या पोहता येते. त्या कितीही खोल पाण्यात व्यवस्थित पोहू शकतात. गाईंकडे पोहण्याचे कौशल्य असते. गाईंना वासाचीही उत्कृष्ट जाणीव असते आणि त्या सहा मैल दूरपर्यंतचा गंध ओळखू शकतात.

Story img Loader