लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सर्वपक्षीय नेत्यांचा सभांचा धडाका सुरु असून वंचित बहुजन आघाडीचाही प्रचार जोमात सुरु आहे. मात्र, पुण्यात शनिवारी सकाळी प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला अल्पप्रतिसाद मिळाला. यासभेला फारशी गर्दी झाली नव्हती. मैदानातील खुर्च्या रिकाम्याच होत्या. संध्याकाळी याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी सभा होणार असून या सभेला तरी पुणेकर येतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात चार टप्प्यांपैकी दोन टप्प्यांमधील मतदान झाले आहे. शेवटच्या दोन टप्प्यातील मतदानासाठी सध्या राजकीय पक्षांनीही कंबर कसली असून भाजपा, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची नेते प्रचारसभा घेत आहेत. शनिवारी पुण्यातील वडगाव धायरी येथे बारामती लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे नवनाथ पडळकर यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.

bjp candidate first list for lok sabha election likely to announce today
भाजपची पहिली यादी आज? केंद्रीय निवडणूक समितीच्या मेगाबैठकीत विचारमंथन सुरूच
मोहिते-पाटीलविरोधक उत्तम जानकर सोलापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये
Basavaraj Patil
बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा काँग्रेसला फटका किती ?
manoj jarange patil protest for maratha reservation create big challenge for bjp in marathwada ahead of polls
विश्लेषण : जरांगे आंदोलनाने मराठवाड्यात महायुतीची कोंडी? जागा राखण्यासाठी भाजपची शर्थ…

वंचित आघाडीच्या सभांना राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला होता. लाखोंचा समुदाय सभेसाठी गर्दी करताना दिसत होता. मात्र, पुण्यात वंचित आघाडीच्या सभेबाबत निरुत्साह दिसून आला. सभेला मिळालेला अल्प प्रतिसाद पाहता वंचित आघाडीच्या उमेदवाराचे काय होणार, याबाबत चर्चा रंगली होती.