26 February 2021

News Flash

Lok Sabha Voting LIVE : संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५५.७८ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांत आज मतदान होत आहे

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांत मतदान पूर्ण झाले आहे. विदर्भातील १० पैकी ७ मतदारसंघात मतदान झाले आहे. त्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सगळी तयारी झालेली आहे.  नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि, वर्धा मतदारसंघात गुरुवारी सकाळी ७ पासून मदानाला सुरुवात झाली होती.

संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विदर्भातल्या सात जिल्ह्यांमध्ये ५५. ७८ टक्के मतदान झाले.  वर्ध्यात ५५.३६ टक्के, रामटेकमध्ये ५१.७२ टक्के, नागपुरात ५३.१३ टक्के, भंडारा गोंदियात ६०.५० टक्के, गडचिरोली चिमूरमध्ये ६१.३३ टक्के, चंद्रपुरात ५५.९७, यवतमाळ वाशिममध्ये ५३.९७ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

एकूण ११६ उमेदवार रिंगणात आहेत. १ कोटी ३० लाख मतदार आहेत. त्याच्यासाठी एकूण १५ हजारपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. एकूण ११ हजारांवर सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्य़ातील ५०० हून अधिक अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली. नक्षलग्रस्त गडचिरोली-चिमूर मतदारसंघासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून तीन हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली होती.

प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (नागपूर), केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर (चंद्रपूर-वणी), काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस (वर्धा) यांचा समावेश आहे. सर्वसाधारणपणे भाजप-सेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत आहे. काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी व बसपा रिंगणात आहेत. मतदान होत असलेल्या सातपैकी सध्या चार मतदारसंघांत भाजप, दोन ठिकाणी सेना व भंडाऱ्यात राष्ट्रवादीचा खासदार आहे. भंडाऱ्यात राष्ट्रवादीने विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांना उमेदवारी नाकारली असून त्यांच्याऐवजी नाना पंचबुद्धे यांना रिंगणात उतरवले आहे.

Live Blog

Highlights

  • 15:46 (IST)

    गडचिरोली : ट्रॉली पलटी होऊन ३ मतदारांचा मृत्यू, ९ जखमी

    गडचिरोली येथील शंकरपूर गावातील ग्रामस्थ एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते. दरम्यान, मतदान पार पडल्यानंतर पुन्हा घरी परतत असताना त्यांच्या ट्रॅक्टरला अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की ग्रामस्थांनी भरलेली ट्रॉली रस्त्याच्या बाजूला खड्यात उलटली. यामध्ये ३ मतदारांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले आहेत.

15:59 (IST)11 Apr 2019
उत्तर प्रदेशात बनावट मतपत्राच्या आधारे मतदान करण्याचा प्रयत्न केला असता बीएसएफ जवानांचा हवेत गोळीबार

#WATCH Security personnel fired shots in air after some ppl tried to cast vote without voter ID at a polling station in Shamli. District Magistrate says,“BSF personnel, fired in air for security reasons after some ppl without voter ID tried to cast vote. Voting has resumed now." pic.twitter.com/iXRkS6xFaD

15:54 (IST)11 Apr 2019
नागपूर : दुपारी ३ वाजेपर्यंत ३८.३५ टक्के मतदान

नागपूर लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ३८.३५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. येथे तापमान चाळीशी पार गेल्याने त्याचा परिणामही मतदानावर झाल्याचे दिसून येत आहे. कदाचित दुपारनंतर मतदार घराबाहेर पडल्यानंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ होऊ शकते.

15:54 (IST)11 Apr 2019
महाराष्ट्रात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी 30.19 टक्के मतदान

महाराष्ट्रात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी 30.19 टक्के मतदान झाल्याची मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती

15:52 (IST)11 Apr 2019
लक्षद्वीप : दुपारी ३ वाजेपर्यंत ५१.२५ टक्के मतदान

लक्षद्वीप येथे दुपारी ३ वाजेपर्यंत ५१.२५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. उत्तराखंडमध्ये ४६.५९ तर मणिपूरमध्ये ६८.९० टक्के मतदान झाले आहे.

15:48 (IST)11 Apr 2019
नागपुरात दुपारी तीन वाजेपर्यंत 38.35 टक्के मतदान

नागपुरात दुपारी तीन वाजेपर्यंत 38.35 टक्के मतदान

15:46 (IST)11 Apr 2019
गडचिरोली : ट्रॉली पलटी होऊन ३ मतदारांचा मृत्यू, ९ जखमी

गडचिरोली येथील शंकरपूर गावातील ग्रामस्थ एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते. दरम्यान, मतदान पार पडल्यानंतर पुन्हा घरी परतत असताना त्यांच्या ट्रॅक्टरला अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की ग्रामस्थांनी भरलेली ट्रॉली रस्त्याच्या बाजूला खड्यात उलटली. यामध्ये ३ मतदारांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले आहेत.

15:41 (IST)11 Apr 2019
गुंटूर : टीडीपी नेत्यावर मतदान केंद्रावर हल्ला

तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) नेते कोडेला शिवप्रसाद राव यांच्यावर सत्तेनापल्ली येथील मतदान केंद्रावर हल्ला करण्यात आल्याने केंद्रावर एकच खळबळ उडाली.

15:38 (IST)11 Apr 2019
अमेठी : केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी भरला उमेदवारी अर्ज

केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी आज अमेठी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. इराणी या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

15:36 (IST)11 Apr 2019
जम्मू-काश्मीर : दुपारी १ वाजेपर्यंत ३५.५२ टक्के मतदान

जम्मू-काश्मीर : येथील जम्मू आणि बारामुल्ला येथील लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३५.५२ टक्के मतदानाची नोंद झाली. तसेच सिक्कीम मतदारसंघात ३९.०८, मिझोराममध्ये ४६.५० टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे.

15:33 (IST)11 Apr 2019
हैदराबाद : माजी क्रिकेटपटू, तेलंगणा काँग्रसेच अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीनने केले मतदान

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि तेलंगणा काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन यांनी हैदराबादमधील मतदान केंद्र क्रमांक ७१ येथे जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

15:30 (IST)11 Apr 2019
महाराष्ट्र : जगातल्या सर्वात बुटक्या महिलेने बजावला मतदानाचा हक्क

जगातील सर्वात बुटकी महिला असलेल्या ज्योती अमगे यांनी नागपूरमधील मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

14:31 (IST)11 Apr 2019
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.७१ टक्के मतदान

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.७१ टक्के मतदान

14:30 (IST)11 Apr 2019
नागपूर लोकसभा मतदारसंघात १ वाजेपर्यंत २७.४७ टक्के मतदान

पुरूष- ३,२०,६०७महिला- २,७२,८३७इतर- २एकूण मतदान- ५,९३,४४६

टक्केवारीपुरूष- २९.२४ टक्केमहिला- २५.६५ टक्केइतर- २.६० टक्केएकूण- २७.४७ टक्के

14:28 (IST)11 Apr 2019
यवतमाळमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 26.09 टक्के मतदान

यवतमाळमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 26.09 टक्के मतदान

14:16 (IST)11 Apr 2019
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी बजावला मतदानाचा हक्क

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी बजावला मतदानाचा हक्क

13:44 (IST)11 Apr 2019
सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १३.७५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून शांततेत मतदानास सुरूवात झाली. सकाळी ७ ते ११ या कालावधीत सरासरी १३.७५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात पुढीलप्रमाणे मतदान झाले आहे. वर्धा १५.७६%, रामटेक (अ.जा.) ९.८२%, नागपूर १७.५६%, भंडारा-गोंदिया १२.२%, गडचिरोली-चिमूर (अ.ज.) १८.०१%, चंद्रपूर १०.८६% आणि यवतमाळ-वाशिम 12.06% असे मतदान झाले.

13:29 (IST)11 Apr 2019
काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघात सुरु असलेल्या मतदानावेळी अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम बिघाडाबाबत 39 तक्रारी, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

12:49 (IST)11 Apr 2019
गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून भूसुरुंग स्फोट

गडचिरोलीमधील कसनसून पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाघेझरी मतदान केंद्राजवळ नक्षलवाद्यांकडून भूसुरुंग स्फोट, कोणतेही नुकसान झाले नाही.

12:39 (IST)11 Apr 2019
देशात एक मजबूत सरकार आणण्यासाठी मतदान करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. यामध्ये निवडणूक एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. पुढील पाच वर्षांकरिता सरकार कोणत्या सक्षम हातात द्यायचं याचा लोक निर्णय घेतात. आपण सगळ्यांनी मतदान करावं असं आवाहन. देशात एक मजबूत सरकार आणण्यासाठी मतदान करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:36 (IST)11 Apr 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब केलं मतदान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी आणि आईसोबत धरमपेठे येथील मतदान केंद्रावर मतदान केलं

12:03 (IST)11 Apr 2019
विदर्भातील सात जागांवर सकाळी ११ वाजेपर्यंत १३.७ टक्के मतदान
11:50 (IST)11 Apr 2019
नागपुरात सकाळी ११ वाजेपर्यंत २० टक्के मतदान

नागपुरात सकाळी ११ वाजेपर्यंत २० टक्के मतदान

11:31 (IST)11 Apr 2019
ईव्हीएममध्ये बिघाड झालेल्या मतदान केंद्रावर नव्याने मतदान घेण्यात यावे - चंद्राबाबू नायडू

N Chandrababu Naidu in letter to CEC: Likely that many voters who returned may not come back for voting even if polling is resumed after replacement / repair of existing EVMs.Therefore repolling needed in all polling stations where polling had not commenced upto 9.30am

11:07 (IST)11 Apr 2019
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात 'प्रहार' पक्षाच्या उमेदवार वैशाली येडे यांनी मतदानाचा हक्क बजावला

11:05 (IST)11 Apr 2019
नागपूरमधील मतदार केंद्रावरील आढावा

10:54 (IST)11 Apr 2019
छत्तीसगडमधील दंतेवाडात मतदारांचा मोठा प्रतिसाद

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथील मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी हजेरी लावली आहे. याच ठिकाणी ९ एप्रिल रोजी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजपा आमदार भीमा मांडवी यांचा मृत्यू झाला होता.

10:35 (IST)11 Apr 2019
चंद्रपुरात ९ वाजेपर्यंत चंद्रपूर ५.३५ टक्के मतदान

चंद्रपुरात ९ वाजेपर्यंत चंद्रपूर ५.३५ टक्के मतदान

10:29 (IST)11 Apr 2019
जम्मू काश्मीरमधील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावत व्यक्त केल्या भावना
10:24 (IST)11 Apr 2019
गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी विजयी होणार याची खात्री - नितीन गडकरी

भारत हा सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे. सर्व जगाचं लक्ष आपल्या निवडणुकीकडे आहे. सर्वांना मतदानाचा हक्क बजावा अशी विनंती मी करतो. मतदान केंद्राबाहेर सकाळपासून लोकांची गर्दी असून त्यांचा उत्साह कौतुकास्पद आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. पाच वर्षापूर्वी जनतेने मला निवडून दिलं होतं. यावेळी मी माझी कामं घेऊन त्यांच्यासमोर गेलो. त्यांचं मला चांगलं समर्थन मिळालं आहे. कार्यकर्त्यांनी फार परिश्रम घेतले आहेत. मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी विजयी होणार याची खात्री आहे असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे

10:20 (IST)11 Apr 2019
गडचिरोलीत सकाळी ९ वाजेपर्यंत ५.३० टक्के मतदान

गडचिरोलीत सकाळी ९ वाजेपर्यंत ५.३० टक्के मतदान

10:13 (IST)11 Apr 2019
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३१ % मतदान

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३१ % मतदान

10:12 (IST)11 Apr 2019
नितीन गडकरी यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

नितीन गडकरी यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

10:10 (IST)11 Apr 2019
असदुद्दीन ओवेसी यांनी बजावला मतदानाचा हक्क
09:52 (IST)11 Apr 2019
भंडारा-गोंदियात ९ वाजेपर्यंत ९ टक्के मतदान

भंडारा-गोंदियात ९ वाजेपर्यंत ९ टक्के मतदान

09:51 (IST)11 Apr 2019
आंध्र प्रदेशात जनसेना पक्षाच्या आमदाराची मतदान केंद्रावर तोडफोड
09:43 (IST)11 Apr 2019
09:42 (IST)11 Apr 2019

यवतमाळमधील कळंब तालुक्यातील कोठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर मशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती

09:38 (IST)11 Apr 2019

यवतमाळमध्ये काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी दारव्हा तालुक्यातील आपल्या मूळगावी हरु येथे मतदान केलं

09:33 (IST)11 Apr 2019
नागपुरात सकाळी ९ वाजेपर्यंत ११ टक्के मतदान

नागपुरात सकाळी ९ वाजेपर्यंत ११ टक्के मतदान

09:33 (IST)11 Apr 2019
नागपुरात सकाळी ९ वाजेपर्यंत ११ टक्के मतदान

नागपुरात सकाळी ९ वाजेपर्यंत ११ टक्के मतदान

09:32 (IST)11 Apr 2019

अरुणाचलमध्ये मतदान केंद्राबाहेर मतदारांची गर्दी

09:30 (IST)11 Apr 2019

नागपूर - न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये व्हीव्हीपॅट यंत्रात तांत्रिक अडचण आल्यामुळे 15 मिनिटे उशिरा मतदानाला सुरुवात

09:18 (IST)11 Apr 2019
छत्तीसगडमध्ये आईडीचा स्फोट

छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील फसरगाव येथे आईडीचा स्फोट झाला आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा होता. सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झालेली नाही. संवेदनशील भाग असल्याने दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान सुरु असणार आहे.

09:13 (IST)11 Apr 2019
जगातील सर्वात बुटकी महिला ज्योती आमगेने मतदानाचा हक्क बजावला

जगातील सर्वात बुटकी महिला ज्योती आमगेने मतदानाचा हक्क बजावला

09:08 (IST)11 Apr 2019
बुरखा घालून येणाऱ्या महिला मतदारांची तपासणी करा

बुरखा घालून येणाऱ्या महिला मतदारांची तपासणी करण्याची उत्तर प्रदेशातील भाजपा उमेदवाराची मागणी

09:06 (IST)11 Apr 2019

पश्चिम बंगालमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी केलं मतदान

09:05 (IST)11 Apr 2019

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी सहकुटुंब मतदान केले

09:05 (IST)11 Apr 2019

गोंदियात ९२ वर्षाच्या आजोबांनी आपला मुलगा आणि सुनेसोबत बजावला मतदानाचा हक्क

09:01 (IST)11 Apr 2019
Next Stories
1 ‘लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा’, नरेंद्र मोदींचं मतदान करण्याचं आवाहन
2 ‘देशाच्या विकासासाठी मतदान करा’, मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क
3 पहिल्या टप्प्यात आज मतदान
Just Now!
X