PM Narendra Modi Oath Ceremony Updates, 9 June 2024: लोकसभा निवडणुकांनंतर आता देशभरात चर्चा आहे ती नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या शपथविधीची आणि त्यांच्या संभाव्य मंत्रीमंडळाची. पहिल्या दोन टर्ममध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत असल्यामुळे मोदींना इतर कोणत्याही घटकपक्षावर सत्तास्थापनेसाठी अवलंबून राहावं लागलं नव्हतं. यंदा मात्र भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल, इतकं संख्याबळ मिळालेलं नाही. त्यामुळे मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर यंदा मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे मित्रपक्षांमध्ये मंत्रीपदांची कशी वाटणी होते, हे महत्त्वाचं ठरणार असून महाराष्ट्रातील अजित पवार गटाला एकही मंत्रीपद मिळणार नसल्याचं सांगितलं जात आहे. देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार अजित पवार गटाचा पुढच्या मंत्रीमंडळ विस्तारात विचार करण्यात येणार आहे.

काय घडलं दिल्लीत?

एकीकडे आज नरेंद्र मोदींसह संभाव्य मंत्र्यांची यादी तयार होत असून त्या त्या खासदारांना फोनही जात असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या एकाही खासदाराला मंत्रीपदासंदर्भात फोन आलेला नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांना किमान पहिल्या शपथविधीमध्ये मंत्रीपद मिळणार नसल्याचं सकाळीच स्पष्ट झालं. नंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना त्यावर शिक्कामोर्तब केलं. अजित पवार गटानं कॅबिनेट मंत्रीपदाचा आग्रह धरला होता, मात्र सरकारकडून त्यांना राज्यमंत्रीपद स्वतंत्र प्रभार अशी ऑफर देण्यात आली होती. ती अजित पवार गटानं अमान्य केल्यामुळे त्यांना पहिल्या मंत्रीमंडळ शपथविधीमध्ये स्थान मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

Deputy Chief Minister Fadnavis hard hitting performance at the Grand Alliance meeting
तडजोड केली, तरच युती टिकते; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे महायुतीच्या मेळाव्यात परखड मतप्रदर्शन
Narendra Modi 'Hindu Card' Comment Video
नरेंद्र मोदींनी ‘हिंदुत्वाचे कार्ड’ राजकारणात खेळल्याची कबुली दिली? Video मध्ये म्हणाले, “हा निवडणुकीचा अजेंडा नाही तर.. “
Criticism of Prime Minister Narendra Modi Injustice to the underprivileged by Congress
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका; काँग्रेसकडून वंचितांवर अन्याय
eknath shinde devdendra fadnavis
“कपटी लोकांनी आम्हाला छळलं”, शिंदेंच्या नेत्याची भाजपाच्या माजी केंद्रीय मंत्र्यावर टीका? महायुतीत जुंपली?
Sharad Pawar, Sharad Pawar latest news,
कोणत्याही खासदाराला पुन्हा निवडणुका नको वाटतात – शरद पवार
mamta banerjee on tista river water
भारत-बांगलादेशच्या पाणीवाटप चर्चेवरून भडकलेल्या ममतादीदींचे पंतप्रधानांना पत्र; नेमके प्रकरण काय?
suryakanta patil
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपाला धक्का; माजी मंत्री सूर्यकांता पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार?
Chandrakant Patil
“मी पालकमंत्री असताना अशा चिंताजनक घटना घडल्या नाहीत”, चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा रोख कुणाकडे?

सुनील तटकरेंच्या घरी बैठक, फडणवीस हजर!

शपथविधी काही तासांवर आलेला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत सुनील तटकरेंच्या घरी दाखल झाल्याचं दिसून आलं. यावेळी सुनील तटकरेंच्या घरी खुद्द अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ व वरीष्ठ नेते उपस्थित होते. तटकरेंच्या घरी झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर आधी देवेंद्र फडणवीस घरातून बाहेर पडले. त्यापाठोपाठ अजित पवार, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे एकाच कारमधून बंगल्यातून बाहेर पडले.

PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates : नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या संभाव्य मंत्र्यांची संपूर्ण यादी

दरम्यान, यासंदर्भात प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले, तेव्हा त्यांना माध्यमांनी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी “आत्तापर्यंत मला कोणताही निरोप आलेला नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीसही तटकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले.

अजित पवार गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न?

अजित पवार गटाला पहिल्या शपथविधी सोहळ्यात एकही मंत्रीपद देण्यात येणार नसून त्यासाठीच अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सुनील तटकरेंच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडून चार जागांवर निवडणूक लढवण्यात आली. मात्र, त्यापैकी फक्त एकच जागा पक्षाला जिंकता आली. खुद्द बारामतीमध्येही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याकडून १ लाख ६७ हजारांहून अधिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

संभाव्य मंत्रिपदासाठी ज्या ज्या खासदारांना नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बोलाविण्यात आले आहे. त्यांची यादी खालीलप्रमाणे.

भाजपाचे खासदार

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान (ओडिशा)

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी (धारवाड, कर्नाटक)

बंदी संजय कुमार (करीमनगर, तेलंगणा)

हर्ष मल्होत्रा (पूर्व दिल्ली)

श्रीपाद नाईक (उत्तर गोवा)

अजय टम्टा (उत्तराखंड)

अर्जुन राम मेघवाल (राजस्थान)

सुरेश गोपी (केरळ)

माजी मंत्री हरदीप सिंग पुरी

रवनीत सिंग बिट्टू (पंजाब)

नितीन गडकरी (महाराष्ट्र)

पियुष गोयल (महाराष्ट्र)

रक्षा खडसे (महाराष्ट्र)

रामदास आठवले (महाराष्ट्र)

एनडीए मधील घटक पक्ष

एचडी कुमारस्वामी (जेडीएस, कर्नाटक)

रामनाथ ठाकूर (जेडीयू, बिहार)

राम मोहन नायडू (टीडीपी, आंध्र प्रदेश)

चंद्र शेखर पेम्मसनी (टीडीपी, आंध्र प्रदेश)

जीतन राम मांझी (हिंअमो, बिहार)

प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट, महाराष्ट्र)