Amit Thackeray महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २०० ते २२५ उमेदवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मनसे फॅक्टर कसं काम करतो याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान मनसेच्या दुसऱ्या यादीत अमित ठाकरे यांचं नाव आहे. अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे ( Amit Thackeray ) यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे. तसंच राजकारणात एंट्री कशी झाली तेदेखील सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे फोटोग्राफर, तर राज व्यंग्यचित्रकार; तुमच्यामध्ये अशी कोणती कला? अमित ठाकरे काय म्हणाले?

मी पूर्वी राज ठाकरे यांच्याप्रमाणे व्यंगचित्र काढत होतो. पण नंतर ते बंद झालं. राज ठाकरे अनेकदा व्यंगचित्र काढण्यासाठी माझ्या मागे लागतात, त्यांनी मला काही पुस्तकंदेखील आणून दिली होती. मी ११-१२ वीत असताना त्यांचंच एक व्यंग्यचित्र बघून तसंच्या तसं काढलं होतं. ते त्यांना खूप आवडलं होतं. पण पुढे मला शक्यच झालं नाही. आता तर तसंही राजकारण आणि कुटुंब यातून वेळ मिळत नाही, असं अमित ठाकरे ( Amit Thackeray ) म्हणाले.

हे पण वाचा- Amit Thackeray: अमित ठाकरेंमुळे ‘एकच आमदार’ हा शिक्का पुसला जाणार? उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी राज ठाकरेंची खेळी काय?

तसंच मी पियानोसुद्धा वाजवायचो. ज्यावेळी कहो ना प्यार है, हा चित्रपट आला तेव्हा आईने मला छोटा पिआनो आणून दिला होता. तेव्हा कुठेही न शिकता ते गाणं वाजवायला शिकलो होतो. नंतर ते आई आणि बाबांना ऐकवलं होतं. त्यांना ते खूप आवडलं. त्यावेळी राज ठाकरेंनी मला पियानो शिकवण्यासाठी एका शिक्षकालाही बोलवलं, पण पुढे तेही शक्य झालं नाही, हे सोडून मी फुटबॉल, बॅटमिंटन, खेळतो, असंही अमित ठाकरेंनी ( Amit Thackeray ) सांगितलं.

मी राजकारणातून बाहेर आलो तरीही आधी राज ठाकरेंचा मुलगाच

राज ठाकरेंचा मुलगा म्हणून राहणं आवडतं की मनसेचा उमदेवार म्हणूनअसं विचारलं असता, मला दोन्हीत काहीही फरक जाणवत नाही. जर मी मुख्यमंत्री झालो, तरी मी आधी राज ठाकरेंचा मुलगा असेन, राजकारणातून बाहेर असलो, तरीही मी आधी त्यांचा मुलगा असेन. यावर मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का, असं विचारलं असता, तो निर्णय राज ठाकरे घेतील, असं अमित ठाकरे ( Amit Thackeray ) म्हणाले.

राजकारण यावं असं का वाटलं? या प्रश्नाच्या उत्तर देताना अमित ठाकरे म्हणाले, मी अनेकदा बोललो आहे. मी राज ठाकरेंचा मुलगा नसतो, तर मी राजकारण आलो असतो, हे मी जाणीवपूर्वक बोलतो. त्यातही आजची राजकारणातील परिस्थिती बघता तर नक्कीच मी राजकारणात आलो असतो. मी राज ठाकरेंना काम करताना बघितलं आहे. मी खोटं बोलत नाही. आणि राज ठाकरेंबाबत मला कुणी काही विचारलं तर मला खोटं बोलावं लागणार नाही. कारण त्यांनी जे काम केलं, ते मला माहिती आहे. असं अमित ठाकरे ( Amit Thackeray ) म्हणाले, अमित ठाकरे यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.

या निवडणुकीत कोणाचे आव्हान मोठं असेल?

माझी लढाई खूप पुढची आहे. या दोघांना समोर ठेऊन मी निवडणूक लढवत नाही. ते त्यांचे राजकारण करतील, मी माझे मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचवेन. त्यानंतर जनता जो निर्मण घेईन तो मान्य असेल, त्यामुळे माझी लढाई त्यांच्या बरोबर नाहीच. यंदा दादर माहीममधून माझा विजय नक्की आहे. गेल्या वेळी मोदी लाट होती. याशिवाय मी आजारी होतो. त्यावेळी राज ठाकरेंनी ऐन १० दिवस आधी उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे तेव्हा तयारीला वेळही मिळाला नव्हता. मात्र, २०२४ ची निवडणूक वेगळी आहे. मी उगाच विजय होणार असं बोलत नाही. मी किती लोकांपर्यंत पोहोचलो आहे, हे मला माहिती आहे. माहीम मतदार संघातील विषय माझे तोंडपाठ आहेत, माहीम पोलिस कॉलनी, कोळी बांधवांची वसाहत, दादर माहीम समुद्र किनारा, मिठी नदी आणि आजच्या रस्त्यांची दुरावस्था हे माझ्यासाठी प्रमुख विषय असतील. असं अमित ठाकरेंनी ( Amit Thackeray ) स्पष्ट केलं.

भाजपाने परतफेड करावी अशी अपेक्षा होती पण..

अपेक्षा होती. पण राजकारणी कसे असतात हे मला माहिती आहे. राज ठाकरेंनी पाठिंबा दिला, तो नरेंद्र मोदींना दिला. त्याचं कारणही राज ठाकरेंनी सांगितलं. पण पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी केवळ मुरलीधर मोहोळ, नारायण राणे आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी घेतली. याचा अर्थ परतफेड करण्याची मागणी करणं हे आमच्या संस्कारात नाही. माणूस म्हणून अपेक्षा नक्कीच असते,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरेंच्या पाठिंब्याबाबत

हे लोक कसे आहेत मला माहिती आहे. याचं उदाहरण म्हणजे २०१७ मध्ये सेनेने मनसेचे ७ पैकी ६ नगरसेवक फोडले तेव्हा मी आजारी होतो. हे लोक आज जे खोके खोके बोलतात, त्यांनी तेव्हा किती खोके दिले हे मलाही माहिती आहे. त्यामुळे अशा लोकांपासून थोडं दूर राहिलेलं बरं, असं अमित म्हणाले.