बीड लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे या लोकसभेच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे निवडणूक लढवत आहेत. सध्या बीडमध्ये दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. रविवारी सायंकाळी पंकजा मुंडे यांची भर पावसात सभा पार पडली. यावेळी त्यांनी जोरदार भाषण केलं. ‘मला कोणीही रोखू शकत नाही’, असे सूचक विधान करत पंकजा मुंडे यांनी विरोधकांना इशारा दिला.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

“असा मतांचा पाऊस तुम्ही माझ्यावर पाडा, मी तुमच्यावर असाच विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही. देशामध्ये आणि राज्यामध्ये बीड जिल्हा एक विकासाचं नवीन समीकरण निर्माण करणार आहे, असा मला विश्वास आहे. तुम्ही उन्हात तर मी उन्हात आणि तुम्ही पावसात तर मीदेखील पावसात. आता कुणीतरी सांगितलं की, ही निवडणूक वेगळ्या दिशेने चालली आहे. मात्र, बीड जिल्ह्याची जनता विकासाच्या बाजूने आपलं मत देईल हा मला विश्वास आहे”, असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.

Umarkhed, Digras, Ralegaon, Sanjay Rathod,
उमरखेडमध्ये दोन माजी आमदारांचे नवख्यांना आव्हान; दिग्रस, राळेगावमध्ये आज-माजी मंत्र्यांची शक्ती पणाला
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
khanapur vidhan sabha
सांगली, जत, खानापूरमध्ये बंडखोरी; अन्यत्र आघाडी – महायुती लढत
Raj Thackeray kalyan Rural
Raj Thackeray Speech : “काकांनी डोळे वटारले अन् लगेच…!” सकाळच्या शपथविधीवरून राज ठाकरेंचा अजित पवारांना चिमटा
bjp leader jagannath patil
“माझे संभाषण रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न”, भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा, दीपेश म्हात्रे यांचे नाव न घेता आरोप
nana suryavanshi bjp
“त्यांना सांगा, आपली मैत्री आता २० तारखेनंतरच”, भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी भर सभेत केली शिवसैनिकांची कानउघाडणी
chhagan bhujbal on manoj jarange decision to not contest maharashtra assembly election spb 94
मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार; छगन भुजबळ म्हणाले, “हा निर्णय म्हणजे…”
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचा टोला, “उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका करणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करुन थुंकण्याचा प्रकार”

“तुम्हाला कांद्याची चिंता आहे. कापसाची चिंता आहे. मी तुम्हाला वचन देते, तुमच्या या चिंता सोडवण्यासाठीच मी संसदेत चालले आहे. मी विकास करते असे तुम्हाला वाटते का? मी कधीही जातीवाद केला नाही. कधीही धर्माचे राजकारण केले नाही. त्यामुळे आज मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही संधी दिली आहे. बीड जिल्हा मला मान खाली घालायला लावणार नाही. आता माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही”, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.

“मी निवडून आले तर सामान्य माणसांना न्याय मिळेल. या सामान्य माणसांना कोणाच्या दारात जावं लागणार नाही. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. आपले महायुतीचे साडेतीनसे खासदार होणार आहेत, पण विरोधकांचे तीनही खासदारही होणार आहेत का? मग आपलं मत कशाला वाया घालायचं?”, असा निशाणा पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर साधला.