सांगली : जत विधानसभा मतदारसंघातील भाजपची बंडखोरी टाळण्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रयत्न शुक्रवारी निष्फळ ठरले. त्यांनी माजी आमदार विलासराव जगताप आणि बंडखोर उमेदवार तमणगोंडा रवि पाटील यांची भेट घेऊन उमेदवारी मागे घेण्याची केलेली विनंती दोघांनीही फेटाळली.

मंत्री पाटील यांनी आज बंडखोर उमेदवार रवि पाटील व जगताप यांची भेट घेऊन यापुढील काळात तुमचा विचार पक्षाकडून केला जाईल, महामंडळावर काम करण्याची संधी अथवा विधान परिषदेवर काम करण्याची संधी दिली जाईल, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले. दोघांशी एकत्रित व स्वतंत्रपणे बोलणी केली. मात्र, आपण माघार घेणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

हेही वाचा – जयंत पाटलांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम द्या – सदाभाऊ खोत

हेही वाचा – Gopal Shetty : गोपाळ शेट्टींची बंडखोरी की माघार? फडणवीसांना भेटून आल्यानंतर भूमिका काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्री पाटील परतल्यानंतर जगताप यांनी झालेल्या चर्चेचा तपशील माध्यमांना सांगितला. ज्या वेळी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली, त्या वेळीच आम्ही चारपैकी एका भूमिपुत्राला उमेदवारीची संधी द्यावी, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो असे सांगितले होते. मात्र, पक्षाने या मागणीकडे दुर्लक्ष करून उपरा उमेदवार लादला. तो निर्णय जतची स्वाभिमानी जनता कदापि सहन करणार नाही. आता जनताच काय तो निर्णय देईल, असे त्यांनी सांगितले.