शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तीकर हे शिवसेनेच्या शिंदे गटात तर त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटात आहेत. ठाकरे गटाने वायव्य मुंबई मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

* गजानन कीर्तीकर यांनी वयोपरत्वे निवडणुकीच्या राजकारणातून लांब राहण्याचा निर्णय घेतला. मुलगा उमेदवार असला तरी तो दुसऱ्या पक्षाचा उमेदवार असल्याने त्या विरोधात प्रचार करणार असल्याचे गजाभाऊ कीर्तीकर यांनी जाहीर केले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. तसेच महायुतीच्या मेळाव्यात उपस्थित राहून मुलाच्या विरोधात प्रचारात आघाडीवर असू, असे संकेत दिले होते.

हेही वाचा >>> भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन

* गजानन कीर्तीकर यांच्या भूमिकेमुळे वायव्य मुंबई मतदारसंघात थेट वडील विरुद्ध मुलगा अशी लढत होणार नसली, तरी वडिलांनी मुलाच्या विरोधात प्रचारात उतरणार असल्याचे जाहीर केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून ‘ईडी’ने त्यांच्या विरोधात चौकशीचा फास आवळला आहे. तेव्हा वडिलांना विरोधात असला तरी साहजिकच मुलाचा पुळका आला. मुलाने काही चुकीचे केले नाही, असा दावा गजानन कीर्तीकर यांनी केला. यावरून भाजपने गजानन कीर्तीकर यांच्यावर टीकाटिप्पणी केली.