एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्याला कधी गोळ्या तर कधी इंजेक्शन्सच्या रुपात औषधी दिली जाते. काही आजारांमध्ये मलम लावला जातो. गोळ्या, इंजेक्शन तसेच मलम यांच्या रुपात औषधी घेताच रुग्णास आराम मिळतो. मात्र हे नेमके कसे होते? ज्या ठिकाणी इजा झालेली आहे किंवा त्रास आहे, अशाच ठिकाणी औषध कसे काम करते? हेही वाचा >>> विश्लेषण : भाजपाला १३४ मते कशी मिळाली? शिवसेना, काँग्रेसची किती मते फुटली? औषधं विशिष्ट भागांवरच परिणाम का करतात? डोकेदुखी किंवा पाठदुखी थांबावी म्हणून घेतलेली औषधं याच भागावर आपला परिणाम दाखवतात. कालांतराने रुग्णाला बरेदेखील वाटायला लागते. त्रास होत असलेल्या ठिकाणीच गोळ्या किंवा औषधांनी परिणाम करावा म्हणून त्यांच्यात विशेष रसायनांचा समावेश केला जातो. याच कारणामुळे औषधी शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागावरच परिणाम करतात. हेही वाचा >>> विश्लेषण : अग्निवीरांचा हुद्दा व प्रतीक चिन्ह कसे असणार? औषधांमध्ये आजार कमी करण्यासाठीच्या घटकांव्यतिरिक्त अन्य घटकदेखील असतात. औषधांचा रंग, चव, औषधांचे शरीरामध्ये शोषण व्हावे म्हणून अन्य निष्क्रिय तत्वदेखील औषधांमध्ये टाकले जातात. या कारणांमुळे औषधी आणखी प्रभावीपणे काम करण्यास मदत होते. हेही वाचा >>> विश्लेषण : कोकण रेल्वेचे विद्युतीकरण… आता प्रदूषणुक्त, वेगवान प्रवास? शरीरात गेल्यानंतर औषधाचे काय होते? जेव्हा आपण एखादे औषध गोळ्या किंवा इंजेक्शनच्या रुपात घेतो तेव्हा ते थेट पोटात जाते. त्यानंतर हे औषध आतड्यांमध्ये शोषून घेतले जाते. त्यानंतर औषध रक्तात मिसळते. शेवटी शरीरात ज्या ठिकाणी त्रास होत असेल त्या ठिकाणी हे औषध पोहोचते आणि आपले काम सुरु करते. जेथे त्रास होत आहे, तेथील जखमी पेशींवर हे औषध परिणाम करते. ज्यामुळे आपल्याला आराम मिळतो. हेही वाचा >>> विश्लेषण: चार वर्षांनी अग्निवीरांच्या शिक्षण आणि नोकरीचं काय? नेमके काय पर्याय? औषधांचे दुष्परिणाम शरीरातील खास रिसेप्टर्सना लक्षात घेऊनच औषधांना तयार करण्यात येते. मात्र औषधांमुळे आपल्याल काही अनावश्यक परिणामदेखील भोगावे लागू शकतात. औषधी रक्तप्रवाहाच्या माध्यमातून शरीरातील इतर भागातही जातात. याच कारणामुळे आपल्याला औषधाचे दुष्परिणाम पाहायला मिळतात. वेळेनुसार औषधाचा प्रभाव कमी होतो त्यानंतर ही औषधं लघवीच्या माध्यमातून शरीराच्या बाहेर टाकली जातात. याच कारणामुळे औषध घेतल्यानंतर लघवीला दुर्गंधी सुटते. काही औषधे घेतल्यानंतर लघवीचा रंगदेखील याच कारणामुळे अधिक पिवळा होतो.