scorecardresearch

Premium

आत्महत्यांचा इतिहास आणि आजचे गंभीर स्वरूप

शाळेत जाणाऱ्या मुलापासून ते वयस्क गृहस्थापर्यंत आणि सामान्य, बेरोजगार व्यक्तीपासून ते उच्चभ्रू व्यक्तीपर्यंत अनेक लोक आत्महत्या करताना दिसतात. मग आत्महत्या या २०-२१व्या शतकापासून वाढलेल्या दिसतात का? की आत्महत्या ही संकल्पना आधीही होती. याची कारणमीमांसा करणे उद्बोधक ठरेल.

history of suicide_Loksatta
(ग्राफिक्स : प्राजक्ता राणे आणि धनश्री रावणंग )

लावणीसम्राट आणि कलेच्या विश्वात स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या आशीष पाटील यांनी केलेल्या स्वतःच्याआत्महत्येच्या प्रयत्नाबाबत खुलासा केला. चकाकणाऱ्या जगात वावरणारी आणि स्वतःच्या क्षेत्रात यशाची शिखरे गाठणारी अनेक मंडळी आज आत्महत्या करताना किंवा प्रयत्न करताना दिसतात. शाळेत जाणाऱ्या मुलापासून ते वयस्क गृहस्थापर्यंत आणि सामान्य, बेरोजगार व्यक्तीपासून ते उच्चभ्रू व्यक्तीपर्यंत अनेक लोक आत्महत्या करताना दिसतात. मग आत्महत्या या २०-२१व्या शतकापासून वाढलेल्या दिसतात, याची कारणमीमांसा करणे उद्बोधक ठरेल.

Chatgpt
विश्लेषण : रिअल टाइम अपडेट, संवाद आणि बरेच काही… अद्ययावत चॅटजीपीटी किती उपयुक्त?
Fernando Botero
व्यक्तिवेध: फर्नादो बोतेरो
Champaran
UPSC-MPSC : चंपारण सत्याग्रह नेमका काय होता? त्याची वैशिष्ट्ये अन् परिणाम
pankaj tripathi in loksatta gappa event,
करुणेची मात्रा वाढायला हवी! ‘लोकसत्ता गप्पा’मध्ये पंकज त्रिपाठींचे प्रतिपादन

आत्महत्या म्हणजे काय ?
आत्महत्या म्हणजे स्वतःचे आयुष्य स्वतः संपवून घेणे. पण काही सामाजिक संदर्भ बघितले तर, सरसकट स्वतःचे जीवन स्वतः संपवण्याच्या सर्वच घटना या आत्महत्या सदरात येत नाहीत.

हेही वाचा : महाराष्ट्राची ‘कामगार कथा’!

आत्महत्या या इसवी सनाच्या आधीच्या काळातही झालेल्या दिसून येतात. ग्रीक काळात इसवी सनपूर्व ४३४ च्या दरम्यान आत्महत्या केलेली पहिली व्यक्ती म्हणजे एम्पेडोकल्स. त्यांनी माऊंट एटना ज्वालामुखीमध्ये उडी मारून आत्महत्या केली होती. मृत्यू हे परिवर्तनाचे मुख्य कारण असते, असे त्यांचे ठाम मत होते. नॅशनल रोमन म्युझियम पॅलेझो अल्टेम्प्समध्ये आढळणारे लुडोविसी गॉल हे संगमरवरी शिल्प एका आत्महत्येचे प्रतिनिधित्व करताना दिसते. एक गॅलिक पुरुष स्वतःच्या हाताने आपल्या छातीत सुरा खुपसत असून पत्नीचे मृत शरीर त्याच्या दुसऱ्या हातात आहे. ‘दि हिस्ट्री ऑफ रोम’च्या पहिल्या खंडात रोम संस्कृतीतील मृत्यू संकल्पनेवर विवेचन केलेले आहे. तसेच ‘अॅटिट्यूड टूवर्डस सुसाईड इन एन्शंट ग्रीस’ या एलिस गॅरिसन यांच्या पुस्तकात आत्महत्यांची विविध उदाहरणे आणि त्यासंदर्भातील दृष्टिकोन दिलेले आहेत. अलेक्सझांडर दि ग्रेट यानेदेखील आत्महत्या केल्याचे उदाहरण इतिहासात दिसते.

आत्महत्यांची कारणमीमांसा

आत्महत्यांची कारणमीमांसा व्यक्तिगत पातळीवर आणि सामाजिक पातळीवर करण्यात येते. काही आत्महत्यांमध्ये या दोहोंचाही एकत्रित संबंध असतो. व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक मूल्ये यांचा विसंवाद झाल्यास व्यक्ती आणि समाज यांत संघर्ष होतो. अशा वेळी व्यक्ती एकाकी पडू शकते. तिचे एकाकी पडणे हे आत्महत्येचे मुख्य कारण ठरते. आत्महत्यांच्या कारणांबाबत अनेक मानसशास्त्रज्ञांनी ऊहापोह केला आहे. समाजशील असणारा मनुष्य जेव्हा वैयक्तिक कारणांनी स्वतःसोबत हरतो, त्याची संघर्ष करण्याची उमेद संपून जाते आणि समाजातील कोणताही घटक आपल्यासोबत नाही, असे वाटते, तेव्हा आत्महत्या करण्याचे विचार बळावतात. व्यक्ती स्वकेंद्री म्हणजेच स्वतःपुरताच विचार करणारी होते. व्यक्तीमध्ये नैराश्य, पराजयाची तीव्र भावना निर्माण होते आणि व्यक्ती आत्महत्या करते.
आज आपण बेरोजगारीमुळे, आर्थिक चणचणीमुळे, कर्जबारीपणामुळे लोक आत्महत्या करताना पाहतो. ‘कोविड’च्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तसेच उद्योग-व्यवसाय बंद पडले. याची परिणती आत्महत्यांमध्ये झाल्याचे आपण पाहिले आहे. या आत्महत्यांमागील मुख्य कारण अगतिकता हे होते. कोणतीही व्यक्ती मनात आले की, लगेच दुसऱ्या सेकंदाला आत्महत्या करत नाही. आत्महत्येचा विचार प्रबळ होणे ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. मानसशास्त्रज्ञ फ्रॉइड याच्या मते, आत्महत्या करण्यासारखे धाडसी कार्य दुसरे कोणतेही नाही. कारण, आपलाच जीव आपणच संपविण्याकरिता प्रचंड मानसिक ताकद लागते.

काही मानसशास्त्रज्ञांच्या मते, काही मानसिक वृत्ती या आत्महत्यांना कारणीभूत ठरतात. तर एखाद्या व्यक्तीबद्दलचे किंवा वस्तूबद्दलचे अतीव प्रेम असफल झाल्यास प्रेमाचे रूपांतर राग व द्वेष यांत होऊन या भावना प्रेम करणाऱ्या व्यक्तीवरच उलटतात. त्यामुळे व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होते, असे मानसशास्त्रज्ञ फ्रॉइड याचे म्हणणे आहे. द्वेष किंवा सूड या भावनांसह आत्मघृणा, न्यूनगंड, भीती इ. भावनाही आत्महत्येस कारणीभूत होतात. तसेच भौगोलिक आणि आनुवंशिक इतिहासही आत्महत्येस कारणीभूत ठरत असतो.

हेही वाचा : कथा सीतेची…

आत्महत्यांची आकडेवारी

डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, जगभरात जवळजवळ आठ लाख लोक आत्महत्या करतात. २०२१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एनसीआरबीच्या अहवालानुसार भारतामध्ये १,६३,०३३ लोकांनी २०२०-२०२१ मध्ये आत्महत्या केली आहे. एक लाख लोकांमागे १२ लोक आत्महत्या करतात. आत्महत्येचा १९६७ नंतरचा हा सर्वात उच्च दर आहे. गेल्या पाच दशकांपासून भारतातील आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. २०२०च्या तुलनेत २०२१ मध्ये आत्महत्या ७.२ टक्क्यांनी वाढल्या आणि जगात सर्वाधिक आत्महत्या भारतात झाल्या. १९९० मध्ये आत्महत्या करून झालेल्या मृत्यूंमध्ये भारताची संपूर्ण टक्केवारी २५.३ होती. २०१६ मध्ये महिलांमध्ये ३६.६ टक्के आणि पुरुषांमध्ये २४.३ टक्के एवढे प्रमाण वाढलेले दिसते. २०१६ मध्ये १५ ते ३९ वर्षे वयोगटातील मृत्यूंचे अधिकांश कारण आत्महत्या ठरले होते. भारताच्या दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे, या संदर्भातील वृत्त ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने प्रसिद्ध केले होते. २०२१ मध्ये ४२,००४ रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांनी आत्महत्या केल्या आणि त्याचे मुख्य कारण ‘कोविड’ हे ठरले होते. एनसीआरबी २०२१ च्या अहवालानुसार २०२०-२१ या वर्षात महाराष्ट्रात २२,२०७ म्हणजेच भारतातील सर्वाधिक आत्महत्या झालेल्या आहेत. तामिळनाडूमध्ये १८,९२५, मध्य प्रदेश १४,९६५, पश्चिम बंगालमध्ये १३,५०० आणि कर्नाटकमध्ये १३,०५६ लोकांनी आत्महत्या केल्या. म्हणजेच भारतातील निम्म्या आत्महत्या या पाच राज्यांमध्ये झाल्या आहेत.

आज वाढत जाणाऱ्या आत्महत्या या नक्कीच चिंतेचे कारण आहे. त्यासाठी अनेक समाजसेवी संस्था कार्यरतदेखील आहे. शासनाकडूनही काही प्रमाणात आत्महत्या थांबविण्यासाठी प्रयत्न होताना दिसतात. या सर्व प्रयत्नांना सकारात्मक यश येईल, अशी अपेक्षा आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: History of suicide and current scenario vvk

First published on: 02-05-2023 at 11:13 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×