रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज (११ ऑक्टोबर) इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची भेट घेणार आहेत. १८ व्या शतकातील कवीच्या जन्माच्या ३०० व्या वर्धापन दिनानिमित्त तुर्कमेनिस्तानमध्ये दोघांची पहिली बैठक होईल. इराण-समर्थित हिजबुलला लक्ष्य करण्यासाठी इस्रायलचे लेबनॉनवर लष्करी हल्ले सुरू असताना पुतिन आणि पेझेश्कियान यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्टिन यांनी गेल्या आठवड्यात इराणमध्ये पेझेश्कियान आणि प्रथम उपराष्ट्रपती मोहम्मद रेझा आरेफ यांची भेट घेतली होती. आता पुतिनही स्वतः त्यांची भेट घेणार आहेत. पश्चिम आशियातील युद्धात रशिया इराणची बाजू का घेत आहे? कधी काळी शत्रुत्वाचे संबंध असणाऱ्या इराणशी आता मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यावर रशिया का भर देत आहे? व्लादिमीर पुतिन यांच्या या भेटीचा अर्थ काय? त्याविषयी जाणून घेऊ.

रशिया-इराण संबंध

रशिया-इराण संबंधांचे थोडक्यात परीक्षण करूया. ‘Lawfaremedia.org’मधील एका लेखात असे नमूद केले होते की, हे देश जवळपास २०० वर्षांपासून प्रतिस्पर्धी आहेत. इराणचे माजी सर्वोच्च नेते रुहोल्ला खोमेनी यांनी सोविएत युनियनला जवळजवळ अमेरिकेइतकेच तुच्छ लेखले होते. नवी दिल्लीतील सेंटर फॉर द एअर पॉवर स्टडीज येथील रिसर्च असोसिएट अनु शर्मा यांनी याविषयी लिहिले होते. त्यांनी लिहिल्यानुसार अविश्वास आणि धोरणात्मक भागीदारी यांमुळे दोन्ही देशांच्या संबंधात अधिक चढ-उतार आले आहेत. कार्नेगी एंडोमेंटनुसार, दोन राष्ट्रे अधिकृतपणे मित्र नाहीत. त्यांची भागीदारी पश्चिमेविरुद्ध धोरणात्मक आणि भू-राजकीय हितसंबंधांवर आधारित आहे.

Navri Mile Hitlarla
Video : लीलाच्या नव्या अवताराने सुनांना आश्चर्याचा धक्का; ‘नवरी मिळे हिटलरला’च्या प्रोमोवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव, म्हणाले, “आता येणार खरी मजा…”
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
jnu seminars cancelled
इराण, पॅलेस्टाईन व लेबेनॉनच्या दूतांचे JNU मधील व्याख्यान रद्द
What Kiran Pavasakar Said About Uddhav Thackeray?
Shivsena Vs MNS : “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबरोबरचं नातं जपायला हवं होतं आणि…”, ‘या’ नेत्याची बोचरी टीका!
NATO's Response to the CRINK
CRINK:’क्रिंक’ हुकूमशाहाचा नवा अवतार; नाटो विरुद्ध क्रिंक जागतिक राजकारण कोणते वळण घेणार?
PM Modi Russia Visit : '
PM Modi Russia Visit : Video : ‘आमचे संबंध एवढे घनिष्ठ आहेत की कोणत्याही अनुवादकाची गरज नाही’, पुतिन यांची मिश्किल टिप्पणी ऐकून मोदीही हसले
Bilateral meeting between PM Modi-Xi Jinping
पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे शी जिनपिंग यांच्यात आज चर्चा; रशियातील बैठकीकडे जगाचे लक्ष
MK Stalin joined Chandrababu Naidu in promoting larger families
स्टॅलिन यांचेही मोठ्या कुटुंबांसाठी आवाहन; लोकसभा मतदारासंघांच्या परिसीमनाच्या परिणामाविषयी चिंता
इराण-समर्थित हिजबुलला लक्ष्य करण्यासाठी इस्रायलचे लेबनॉनवर लष्करी हल्ले सुरू असताना पुतिन आणि पेझेश्कियान यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : जीएसटी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले गुजरातमधील पत्रकार महेश लांगा कोण आहेत?

‘वॉर ऑफ द रॉक्स’मध्ये असे नमूद करण्यात आलेय की, इराणला शस्त्रास्त्रे पुरवू शकेल अशा शक्तिशाली मित्राची गरज आहे. काकेशस आणि मध्य आशियातील अनेक सुन्नी कट्टरपंथी गटांवर नजर ठेवण्यासाठी दोन्ही देशांच्या गुप्तचर संस्थांनी एकमेकांशी सहकार्य केल्यावर दोन्ही देशांतील संबंध अधिक घट्ट झाले. पश्चिम आशियामध्ये त्यांना पश्चिमविरोधी शक्तींना सत्तेत ठेवण्याची आणि स्वत:च्या शक्तीचा पाया वाढवण्याची काळजी आहे. ‘वॉर ऑन द रॉक्स’नुसार १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासून रशियाने इराणला लष्करी उपकरणे पुरवली. त्यामध्ये टाक्या, चिलखती वाहने, रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर व जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे यांचा समावेश होता. ‘कॅप्स’मध्ये असे नमूद केले आहे की, पुतिन यांनी १९९९ मध्ये सत्ता हाती घेतली तेव्हा त्यांनी इराणशी संबंध सुधारले. काही वर्षांनंतर इराण रशियाच्या शस्त्रास्त्रांचा तिसरा सर्वांत मोठा खरेदीदार झाला होता.

२००५ मध्ये इराणला शस्त्रे पुरविण्यासाठी अब्जो डॉलर्सचा करार करण्यात आला. रशियाने इराणच्या ऊर्जा प्रकल्पांमध्ये ७५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली. २०१२ मध्ये पुतिन राष्ट्राध्यक्ष म्हणून परतल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध आणखी दृढ झाले. रशियाने इराणवर लादलेल्या निर्बंधांबाबतची आपली भूमिका बदलली आणि इराणला शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ)मध्ये निरीक्षक होण्याकरिता आमंत्रित केले. परराष्ट्र धोरणानुसार २०१५ मध्ये रशिया आणि इराणने संयुक्तपणे बशर अल-असाद यांना सीरियामध्ये सत्ता राखण्यास मदत केली. २०१६ मध्ये रशियाने इराणी तळांचा वापर करून सीरियातील बंडखोर लक्ष्यांवर हल्ला केला. इराणला शस्त्रास्त्रे आणि हार्डवेअर पुरविण्याबाबतच्या १० अब्ज डॉलर्सच्या करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

युक्रेनियन युद्धाने दोन्ही देशांचे संबंध आणखी घट्ट कसे झाले?

‘वॉर ऑन द रॉक्स’नुसार, इराण रशियाच्या हवाई आणि जमिनीवरील क्षमतांमध्ये प्रमुख योगदानकर्ता राहिला आहे. २०२२ च्या उत्तरार्धात परराष्ट्र धोरणानुसार, दोन्ही राष्ट्रांनी रशियाला शेकडो ड्रोन पुरविण्यासाठी एक करार केला. इराणने रशियाच्या सैन्याला ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी सल्लागार पाठविल्याचेही सांगण्यात येते. २०२३ च्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये युक्रेनियन शहरांवर डझनभर इराणनिर्मित ड्रोन डागण्यात आले. मे २०२४ पर्यंत रशियाने युक्रेनविरुद्ध सुमारे चार हजार इराणी शाहेद ड्रोन डागले. त्यामुळे दोन्ही देशांतील संरक्षण संबंधही घट्ट झाले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, युद्ध, अंतराळ व सायबर या क्षेत्रांत रशिया आणि इराण आपापसांतील सहकार्य वाढवीत आहेत.

रशियाने ऑगस्ट २०२२ आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये इराणसाठी इमेजिंग उपग्रह प्रक्षेपित केले. रशियाने इराणला त्याच्या अंतराळ कार्यक्रमात मदत करण्याचेदेखील वचन दिले आहे. रशियाने इराणला आपले ‘Yak-130’ प्रशिक्षण विमानही दिले आहे. दोन्ही देशांनी रशियासाठी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे खरेदी करण्याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आणि रशियन सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पात्रुशेव्ह यांनी या करारावर स्वत: हस्ताक्षर केले आहे. इराणने गेल्या आठवड्यात रशियाला फतेह-११०, फतेह-३६० व झोल्फाघरसह अनेक शॉर्ट-रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे दिली आहेत. ती सर्व क्षेपणास्त्रे ३०० ते ७०० किलोमीटर एवढा पल्ला गाठण्याची क्षमता असणारी आहेत. या बदल्यात इराणला रशियाकडून एसयू-३५ लढाऊ विमाने आणि एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीसह प्रगत लष्करी तंत्रज्ञान मिळण्याची आशा आहे.

तज्ज्ञांचे मत काय?

युक्रेन युद्धाने दोन्ही देशांना एकत्र आणले आहे. जॉर्जियन थिंक टँक जिओकेस येथील मिडल इस्ट स्टडीजचे संचालक एमिल अवदालियानी यांनी ‘फॉरेन पॉलिसी’ला सांगितले, “युक्रेनमधील युद्धामुळे रशियाने इराणशी असलेल्या संबंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.” वॉशिंग्टन इन्स्टिट्यूट फॉर नीयर ईस्ट पॉलिसीचे वरिष्ठ फेलो अण्णा बोर्शचेव्हस्काया यांनी सांगितले, “इराणप्रमाणे रशियाला स्वेच्छेने पाठिंबा देणाऱ्या दुसऱ्या देशाचे उदाहरण समोर येणे कठीण आहे.” मॉस्को-तेहरान संबंध २०२२ पूर्वीच्या स्थितीत परत येण्याची शक्यता फारच कमी आहे हे पाश्चात्त्य देशांनी लक्षात घेणे आवश्यक आहे असे, ‘द वॉर ऑन द रॉक्स’ने नमूद केले आहे. “दोन्ही देशांनी भविष्यातील लष्करी आकस्मिक गरजा ओळखल्या आहेत; ज्याची त्यांना मदत होईल. इराण रशियाच्या प्रगत तंत्रज्ञानावर अधिक अवलंबून आहे,” असेही त्यात नमूद करण्यात आले.

हेही वाचा : जोडीदाराच्या ‘लॉयल्टी टेस्ट’चा नवा व्यवसाय; जोडीदाराविषयी साशंक लोक घेत आहेत गुप्तहेराची मदत, नेमका हा प्रकार काय?

“रशिया अडीच वर्षांपासून इराणला सहकार्य करीत आहे; परंतु केवळ लष्करी क्षेत्रात,” असे अझरबैजान येथील मध्य पूर्वेतील स्वतंत्र रशियन तज्ज्ञ रुस्लान सुलेमानोव्ह यांनी ‘अल जझिरा’ला सांगितले. ते म्हणाले, “इराणी शस्त्रांना मोठी मागणी आहे. त्यांना अशी मागणी कधीच नव्हती आणि रशिया इराणी शस्त्रांवर अवलंबून राहिला आहे. सुलेमानोव्ह पुढे असेही म्हणाले की, रशियाला युद्ध नको असले तरी पश्चिम आशियातील अराजकतेचा या देशाला फायदा होतोय.” अमेरिकन लोक आता युक्रेनमधील युद्धापासून विचलित झाले आहेत. त्यांना मध्य पूर्वेतील परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी बराच वेळ घालवावा लागेल,” असेही त्यांनी सांगितले.