चंद्रावर कायमची वस्ती वा अवकाश संशोधन केंद्र उभारण्याची मानवाची महत्त्वाकांक्षा प्रत्यक्षात पूर्ण होईल, असे काहीसे संकेत ‘नासा’च्या संशोधकांनी दिले आहेत. या अवकाश संशोधकांना चंद्रावरील एका महाकाय विवरात मोठी गुहा सापडली असून या गुहेत जाण्याचा सहज मार्ग चंद्राच्या पृष्ठभागावरून मिळाला आहे.

गुहा नेमकी कोठे आढळली?

सुमारे ५० वर्षांपूर्वी नील आर्मस्ट्राँग व बझ ऑल्ड्रीन हे अमेरिकेचे अंतराळवीर अपोलो-११ या यानाद्वारे चंद्रावर उतरले होते. हे अपोलो-११ यान चंद्रावरच्या ज्या प्रदेशात उतरले होते, त्याला ‘मेअर ट्रँक्वीलिटी’ (सी ऑफ ट्रँक्वीलिटी) असे म्हटले जाते. या प्रदेशात ‘नासा’च्या संशोधकांना एक मोठे विवर सापडले असून या विवरात भलीमोठी गुहा आढळून आली आहे.

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Uddhav Thackeray statement at Boisar that why Gujarat inspectors are helpless
गुजरातच्या निरीक्षकांची लाचारी का पत्करतात? उद्धव ठाकरे यांचा बोईसर येथे सवाल
Assembly Election 2024 Extra Rounds of Best Bus on Polling Day Low floor deck buses will run for disabled elderly voters
मतदानाच्या दिवशी बेस्ट बसच्या जादा फेऱ्या; दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी ‘लो फ्लोअर डेक’ बस धावणार
Shah Rukh Khan Rejected Karan Arjun
‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…
Ketu Gochar 2024
Ketu Gochar 2024 : केतु ग्रहाने केला सूर्याच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ तीन राशींना मिळणार अचानक पैसाच पैसा!
**Why does the Earth appear flat despite being round?**
Why Earth Looks Flat:पृथ्वी गोल असूनही ती सपाट कशामुळे दिसते?

हेही वाचा…विश्लेषण : अपंगत्व प्रमाणपत्र मिळते कसे? पूजा खेडकरप्रकरणी काय घडले?

गुहेचा आकार किती मोठा?

चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी नासाच्या ‘ल्युनार रेकनेसन्स ऑर्बिटर’ या यानाकडून माहिती पाठवली जाते. या यानाने चंद्रावरील सर्वात खोल समजले जाणाऱ्या ‘मेअर ट्रँक्वीलिटी’ या विवराची माहिती पाठवली असून त्यानुसार या विवरात सुमारे ४५ मीटर रुंद व ८० मीटर लांबीची साधारण १४ टेनिस कोर्ट क्षेत्रफळाच्या आकाराएवढी गुहा आढळून आली आहे. ही गुहा चंद्राच्या पृष्ठभागापासून १५० मीटर खोल एवढ्या अंतरावर आढळली असून या गुहेत लाव्हारसाचा मार्ग असू शकतो असे इटालीतील ट्रेन्टो विद्यापीठातील अवकाश संशोधक लॉरेंन्झो ब्रुझोन यांचे मत आहे. ही गुहा भविष्यात चंद्रावरच्या मानवी वस्तीला फायदेशीर ठरू शकते, असे ब्रुझोन यांचे म्हणणे आहे. चंद्रावरचे वातावरण मानवी जीवनाला उपयुक्त नाही पण या गुहेत मानवी वस्ती केल्याने त्याचा फायदा होऊ शकतो असे ब्रुझोन यांचे मत आहे. नेचर अस्ट्रोनॉमी या नियतकालिकात ‘ल्युनार रेकनेसन्स ऑर्बिटर’ने पाठवलेली माहिती व कॉम्प्युटर सिम्युलेशनने मिळवलेली माहिती या संदर्भात एक लेख आला आहे. या लेखात सरळ उभे व खोल अशा सुमारे १०० मीटर रुंद विवरात अनेक मीटर लांबीची गुहा सापडल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मानवी तळासाठी गुहेचा उपयोग?

‘नासा’ला एका दशकापूर्वी हे विवर सापडले होते त्यावेळी हे विवर अनेक महाकाय गुहांना जोडणारा लाव्हारस मार्ग वाटत होता. नासाच्या ‘ल्युनार रिकॉन्सन्स ऑर्बिटर’ने जी छायाचित्रे पाठवली होती त्यात ‘मेअर ट्रँक्वीलिटी’ या विवराच्या तळात सुमारे १० मीटर रुंद आकाराचे खडक आढळून आले होते. पण या छायाचित्रावरून गुहेत जाण्याचा मार्ग दिसत नव्हता किंवा हा मार्ग लाव्हारसाचा मार्ग असल्याचे समजून येत नव्हते. पण आता संशोधकांना ही गुहा भविष्यात मानवाला चंद्रावरील एक तळ किंवा आपत्कालीन परिस्थितीत एक आश्रयस्थळ म्हणून उपयोगी होईल असे वाटत आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील वातावरण हे मानवासाठी योग्य नाही. कारण चंद्रावर वैश्विक किरणे, सौर उत्सर्जन व लघु उल्कांचा मारा यांचा सततचा धोका असतो. या धोक्यापासून ही गुहा अंतराळवीरांचे संरक्षण करेल, तसेच या गुहेतील तापमानही चंद्राच्या पृष्ठभागाच्या तुलनेत स्थिर असल्याने त्याचा फायदा मानवी तळासाठी होऊ शकतो असे संशोधकांना वाटते.

हेही वाचा…विश्लेषण : नक्षलग्रस्त गडचिरोलीत तरुणांचा पोलीस भरतीत टक्का का वाढतोय?

गुहा कशाने बनली?

आता ही गुहा कोणत्या खडकांनी बनलेली आहे, याचा शोध शास्त्रज्ञ घेत असून यावरून चंद्राची निर्मिती, चंद्रावरचे ज्वालामुखी यांचा अभ्यास करता येणे शक्य होणार आहे. या गुहांमध्ये पाण्याचा बर्फ असण्याची शक्यता असून असा बर्फ आढळल्यास त्याचा फायदा दीर्घकाल चालणाऱ्या चंद्रमोहीमा व मानवी वस्तींना होईल असे अवकाश संशोधक लॉरेंन्झो ब्रुझोन यांचे मत आहे. चंद्राचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना आजपर्यंत चंद्रावर सुमारे २०० विवरे सापडली असून बहुतांश विवरे ही लाव्हा भागात आढळलेली आहेत. या विवरांमधील गुहांची रचना मानवी तळासाठी योग्य असल्याने तेथे वस्त्या उभारण्यासाठी अशा गुहांमध्ये बांधकाम करण्याची फारशी गरज उरणार नाही, असे संशोधकांना वाटते. तरीही या गुहांची एकूण रचना, त्यांचे स्थैर्य, गुहांचे छत, भिंती यांचाही अभ्यास संशोधकांसाठी महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर चंद्राच्या भूगर्भीय हालचाली यांचीही माहिती आवश्यक असणार आहे.

अवकाशवीरांचे संरक्षण होईल?

चंद्रावर दिवस व रात्रीच्या तापमानात प्रचंड फरक असतो. तसेच चंद्रावर वैश्विक किरणांचे उत्सर्जनही मोठ्या प्रमाणात असते. अशी प्रतिकूल परिस्थिती असताना चंद्रावर गेलेल्या अवकाशवीरांसाठी या गुहा एक संशोधन तळ म्हणून महत्त्वाच्या ठरू शकतात. गुहांचे छत, भिंती मजबूत असतील, तसेच चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान व अन्य संकटे यामुळे अवकाशवीरांचे संरक्षण होऊ शकते, असे मँचेस्टर विद्यापीठाच्या पृथ्वीविज्ञान शास्त्राच्या संशोधक कॅथरिन जॉय यांचे मत आहे. पण या विवरांच्या तळाची आपल्याला पूर्ण माहिती नाही, असेही त्या म्हणतात.

हेही वाचा…विश्लेषण : नवे ठाणे रेल्वे स्थानक महत्त्वाचे का? ते कधी कार्यान्वित होणार?

गुहांमध्ये जायचे कसे?

अरिझोना विद्यापीठातील एक संशोधक रॉबर्ट वॅगनर म्हणतात, या गुहांमध्ये कसे जायचे हे आपल्यापुढील खरे आव्हान आहे. १२५ मीटर खोल विवरात उतरणे व उतरताना भूस्खलन झाले तरी तो धोका आपल्याला नाकारता येणार नाही, याकडे वॅगनर लक्ष वेधतात.