Moti Mahal vs Daryaganj: बटर चिकन आणि दाल मखनी या दोन पदार्थांचा शोध नक्की कोणी लावला, याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालय देणार आहे. मोती महल आणि दर्यागंज ही दोन्ही दिल्लीतील नामांकित (साखळी) उपहारगृहे आहेत. या दोन्ही उपहारगृहांकडून बटर चिकन आणि दाल मखनी हे दोन पदार्थ आपणच शोधल्याचा दावा केला गेला आहे. मोती महलकडून त्यांच्या स्थापकांनी म्हणजे कुंडल लाल गुजराल (१९०२-९७) यांनी बटर चिकन आणि डाल मखनीचा शोध लावला असा दावा करण्यात आला. मूलतः भारत आणि पाकिस्तान फाळणी झाल्यावर कुंदन लाल गुजराल हे पेशावरवरून दिल्लीत येऊन स्थायिक झाले, त्यावेळेस ते या पदार्थांची पाककृती आपल्या बरोबर घेऊन आले, असा त्यांचा दावा आहे. अलीकडेच दर्यागंज नामक (शार्क टँक फेम) उपहारगृहाने दाल मखनी आणि बटर चिकन हे पदार्थ त्यांचे संस्थापक कुंदन लाल जग्गी (१९२४-२०१८) यांनी शोधले असे प्रसिद्ध केले. किंबहुना त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर पेशावरच्या मोती महलचा फोटो प्रदर्शित केला आहे. परिणामी मोती महल कडून न्यायालयीन खटला दाखल करण्यात आला, आणि दर्यागंज हे मोती महलचा शोध आपलाच आहे हे दर्शवत असल्याचा आरोपही करण्यात आला.

अधिक वाचा: बीर बिरसा ने बाग मारा… बिरसा मुंडा कोण होते?

shikhar bank fraud
शिखऱ बँक गैरव्यवहार प्रकरण बंद करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अहवालाविरोधात ११ निषेध याचिका
Supreme Court to hear petitions related to election bonds today
देणग्या ताब्यात घेण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात निवडणूक रोख्यांसंबंधीच्या याचिकांवर आज सुनावणी
Bhavesh bhinde Ghatkopar hoarding accident
घाटकोपरमधील महाकाय फलक दुर्घटना : जामिनासाठी अजब दावा करणाऱ्या भावेश भिंडेच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश
vishwambhar chaudhary and lawyer asim sarode
‘संविधान हत्या दिवसा’च्या विरोधात; थेट सरन्यायाधीशांना पत्र… काय आहेत मागण्या?
high court, punishment due to non payment of fine
ही तर न्यायाची थट्टा! दंडाची रक्कम न भरल्याने अतिरिक्त शिक्षा भोगणाऱ्या आरोपीची तात्काळ सुटका करा, उच्च न्यायालयाचे आदेश
google location for bail
जामीन मिळवायचा असल्यास पोलिसांना गुगल लोकेशन द्यावं लागणार का? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय?
Petition, Rahul Gandhi,
राहुल गांधी, उद्धव ठाकरे, राऊत यांच्या विरोधात याचिका; मतदान यंत्राबाबत खोट्या, दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा दावा
Vijay Mallya, Indian Overseas Bank,
इंडियन ओव्हरसीज बँकेशी संबंधित कर्ज बुडवल्याचे प्रकरण : सीबीआय न्यायालयाचे मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मोती महलने नक्की काय आरोप केले आहेत?, ट्रेडमार्क कसे कार्य करतात? हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

मोती महलचा आरोप आणि दर्यागंजची प्रतिक्रिया

मोती महलकडून ‘ट्रेडमार्क उल्लंघन’ आणि ‘पासिंग ऑफ’चा आरोप करण्यात आलेला आहे, तसेच हंगामी स्थगितीचा आदेश देण्याची विनंतीही न्यायालयाकडे करण्यात आली आहे, या आदेशांतर्गत न्यायालयाचा पुढील आदेश किंवा निर्णय येईपर्यंत कोणतीही कृती टाळणे आवश्यक असते. मोती महलच्या आरोपानुसार सार्वजनिक पातळीवर दर्यागंज यांनी बटर चिकन पाककृती त्यांनी शोधली इतकेच सांगितले नाही, तर पेशावरच्या मोती महलचा फोटो संकेत स्थळावर वापरला. मोती महलच्या पूर्वजांनी शोध लावलेल्या दोन पदार्थांच्या उत्क्रांतीचे श्रेय घेण्यापासून दर्यागंजला रोखण्याचा प्रयत्न त्यांच्या याचिकेत करण्यात आला आहे. मोती महलने केलेल्या याचिकेनुसार त्यांनी दर्यागंजचा त्यांच्याशी असलेला कुठल्याही प्रकारचा संबंध नाकारला आहे. मोती महलची सर्वात जुनी शाखा दर्यागंजच्या परिसरात सुरु करण्यात आली होती. मोती महलच्या याचिकेत त्यांनी १९२० पासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या रेस्टॉरंट्ससाठी वापरल्या जाणाऱ्या इतर संबंधित चिन्हांसह “मोती महल” हा ट्रेडमार्क त्यांच्या मालकीचा असल्याचे म्हटले आहे.

१६ जानेवारी रोजी दिल्ली उच्च न्यायालयात दर्यागंजच्या वकिलांनी मोती महलच्या दाव्यांना विरोध केला तसेच संपूर्ण खटला हा “गैरसमज, निराधार आणि बिनबुडाचा असल्याचे नमूद केले, पेशावरच्या रेस्टॉरंटच्या छायाचित्राबाबत, प्रतिवादींच्या वकिलांनी रेस्टॉरंटची स्थापना दोन्ही पक्षांच्या “पूर्ववर्तींनी”- मोती महलच्या गुजराल आणि दर्यागंजच्या जग्गी यांनी संयुक्तपणे केली होती; त्यामुळे या छायाचित्रावर कोणा एकाचा अधिकार नाही, हे नमूद केले. दर्यागंजच्या वकिलांनी संकेतस्थळावर वापरलेले छायाचित्र कापूनछाटून वापरण्यात आल्याचे सांगितले, त्यामुळे मोती महल हे नाव त्यात दिसत नाहीये, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या ट्रेडमार्कचे उल्लंघन होत नाही. तरीही प्रतिवाद्यांचे कोणतेही दावे मान्य न करता, पुढील एका आठवड्यात मोती महलचे छायाचित्र हटवण्यास त्यांनी सहमती दर्शवली. दर्यागंजने मात्र मोती महलच्या दाव्याला अद्याप पूर्ण प्रतिसाद दिलेला नाही. १६ जानेवारीच्या सुनावणीत न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी दर्यागंजच्या मालकांना ३० दिवसांत त्यांचे उत्तर सादर करण्यास सांगितले आणि या प्रकरणाची सुनावणी २९ मे रोजी होणार आहे.

ट्रेडमार्क कसे कार्य करतात?

ट्रेडमार्क म्हणजे एखादे चिन्ह, डिझाईन, शब्द किंवा वाक्य असते ज्यामुळे एखादा व्यापार ओळखला जातो. ज्या वेळेस हा ट्रेडमार्क नोंदणीकृत असतो, त्यावेळेस त्याचा मालक त्याच्या विशेष वापरासाठी दावा करू शकतो. ट्रेडमार्क कायदा १९९९, हा ट्रेडमार्क आणि त्याची नोंदणी नियंत्रित करतो. हा कायदा नोंदणीकृत ट्रेडमार्कला संरक्षण प्रदान करतो. कायद्याच्या कलम २५ नुसार, एकदा नोंदणी केल्यानंतर, ट्रेडमार्क १० वर्षांसाठी वैध असतो आणि मालकाकडून वेळोवेळी त्याचे नूतनीकरण केले जाऊ शकते. एखाद्याचा नोंदणीकृत ट्रेडमार्क त्यांच्या अधिकृततेशिवाय वापरणे हे ट्रेडमार्कचे उल्लंघन आहे. समान वस्तू किंवा सेवांसाठी बर्‍याच प्रमाणात समान चिन्ह वापरणे देखील उल्लंघन ठरू शकते. न्यायालयांनी ठरवल्याप्रमाणे एखादे चिन्ह दुसऱ्या चिन्हासारखे दिसत असल्यास ती ग्राहकांची फसवणूक होते. याशिवाय, ट्रेडमार्कचे उल्लंघन करण्याचा दुसरा मार्ग आहे तो म्हणजे पासिंग ऑफचा.

अधिक वाचा: भारतीय कला-साहित्यातील देवी लक्ष्मीची बदलती प्रतिमा!

‘पासिंग ऑफ’

कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड विरुद्ध कॅडिला फार्मास्युटिकल्स लिमिटेड (२००१) या प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की पास-ऑफ ही “अयोग्य व्यापार स्पर्धेची किंवा कारवाई करण्यायोग्य अयोग्य व्यापाराची प्रजाती आहे, ज्याद्वारे एखादी व्यक्ती, फसवणूक करून, आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न करते. विशिष्ट व्यापार किंवा व्यवसायात इतरांनी स्वतःसाठी स्थापित केलेल्या प्रतिष्ठेचा फायदा मिळविण्याचा प्रयत्न त्यात केला जातो. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर निर्णय देताना म्हटले की, उल्लंघन करणारी उत्पादने एकसारखी असणे आवश्यक नाही, परंतु प्रतिस्पर्धी व्यापाऱ्यांच्या मालाचे स्वरूप, गुण आणि कार्यप्रदर्शन यातील समानता ‘पासिंग ऑफ’ झाल्याचा दावा सिद्ध करते. उदाहरणार्थ लोगोंमधील फेरफार ग्राहकांची दिशाभूल करणारी असते, ‘Adidas’ आणि ‘Adibas’ हे उदाहरण यासाठी उत्तम ठरू शकते. सध्याच्या प्रकरणात, मोती महल दर्यागंजवर बटर चिकनच्या उत्पत्तीचे श्रेय चोरण्याचा आणि पेशावर येथील मोती महलचा फोटो वापरण्याचा आरोप करत आहे. हा ट्रेडमार्कशी खेळण्याचाच प्रकार असल्याचा आरोप आहे. एकूणात, आता या न्यायालयीन लढाईमुळे संपूर्ण उद्योग जगताचे लक्ष या वादावरील निकालाकडे लागून राहिले आहे.