scorecardresearch

Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थीला उपवास करणार आहात? शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन

उपवासादरम्यान कोणत्या पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील ऊर्जा टिकून राहील जाणून घ्या.

Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थीला उपवास करणार आहात? शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन
उपवासादरम्यान कोणत्या पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील ऊर्जा टिकून राहील जाणून घ्या.

सध्या सर्वत्र गणेश चतुर्थीची लगबग सुरू आहे. लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची भक्तगण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतात. मागची दोन वर्ष करोनामुळे अनेक नियमांच्या बंधनांमध्ये सण, उत्सव साजरे करावे लागले. पण आता सर्वकाही पुर्ववत सूरू झाले आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव अधिक जल्लोषात साजरा केला जाणार हे नक्की. गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्थी दिवशी अनेक जण उपवास करतात. जर तुम्ही देखील उपवास करणार असाल तर कोणत्या पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील ऊर्जा टिकुन राहील हे जाणून घेऊया.

Ganesh Chaturthi 2022 : गणपती बाप्पासाठी बनवा हा खास शिरा; मधुमेह असणाऱ्यांना सुद्धा चाखता येणार आस्वाद

उपवासादरम्यान या पदार्थांच्या सेवनाने मिळेल ऊर्जा

  • उपवासादरम्यान आपण दिवसभर काही खात नाही त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते आणि अशक्तपणा जाणवतो.
  • यासाठी ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचे सेवाम करावे. ज्यामुळे अशक्तपणा जाणवणार नाही आणि तुम्हाला सणाचा आनंद घेता येईल.
  • उपवासा तुम्ही फळांचा रस पिऊ शकता. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळेल आणि शरीरातील पाण्याची कमतरता देखील भरून निघेल.
  • तुम्ही वेगवेगळी फळ एकत्र करून त्याचा फ्रुट चाट बनवून खाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला उपवासादरम्यान अशक्तपणा जाणवणार नाही.
  • उपवासादरम्याम नारळ पाणी पिऊ शकता. ज्या व्यक्तींना उपवास करण्याची सवय नसते त्यांना उपवास केल्याने अशक्तपणा, चक्कर येणे असा त्रास होऊ शकतो. अशा व्यक्तींना नारळ पाणी द्यावे. त्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. तसेच त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत नाही.
  • उपवास केल्यास साबूदाण्याची खीर देखील खाऊ शकता. यात भरपूर कॅलरी आणि कार्बोहाइड्रेट्स असतात ज्यामुळे लवकर भूक लागत नाही.
  • याशिवाय दुध, दही, कच्चे पनीर असे पदार्थ देखील खाऊ शकता. यामुळे लवकर भूक लागणार नाही.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२२ ( Ganeshutsav ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ganesh chaturthi 2022 diet tips for fasting helps to maintain high energy level pns

ताज्या बातम्या