News Flash

IPL 2020 : प्रत्येक गोष्टीसाठी धोनीला दोष देता येणार नाही !

CSK च्या पराभवानंतर माजी भारतीय खेळाडूने केली धोनीची पाठराखण

छायाचित्र सौजन्य - IPL/BCCI

आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जला पुन्हा एकदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. अबु धाबीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईवर १० धावांनी मात केली. मोक्याच्या क्षणी KKR च्या गोलंदाजांनी केलेलं पुनरागमन आणि अखेरच्या षटकांत सुनिल नारायण व वरुण चक्रवर्तीचा खुबीने वापर करत कोलकाताने सामन्याचं चित्र बदलून टाकलं. चेन्नईकडून शेन वॉटसनने ५० धावांची खेळी केली, मात्र मोक्याच्या क्षणी मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेली निराशाजनक कामगिरी चेन्नईला चांगलीच महागात पडली. चेन्नईचा संघ १५७ धावांपर्यंतच मजल मारु शकला.

शेन वॉटसन आणि अंबाती रायुडू हे फलंदाज मैदानावर असताना चेन्नईचा संघ सामन्याच वरचढ दिसत होता. परंतू मोक्याच्या क्षणी हे दोन्ही फलंदाज माघारी परतले आणि चेन्नईने सामना गमावला. १० धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर सोशल मीडियावर CSK चे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. अनेकांनी धोनी, केदार जाधव यांना कोलकात्याविरुद्ध पराभवासाठी दोष दिला आहे. भारतीय संघाचा माजी गोलंदाज प्रग्यान ओझाने मात्र धोनीची पाठराखण केली आहे. “इथे गोष्ट फक्त कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्याची नाहीये, गेल्या काही दिवसांपासून CSK चं काहीतरी बिनसलंय. प्रत्येक सामन्यात चेन्नईचा संघ असं काहीतरी करतोय की ज्यामुळे चाहते नाराज होतायत. मग यानंतर धोनीला दोष दिला जातो. मात्र प्रत्येक गोष्टीसाठी धोनीला दोष देता येणार नाही. केदार जाधवकडून धावा होत नाहीयेत. तो ज्या पद्धतीच्या खेळीसाठी ओळखला जातो तसा खेळ त्याच्याकडून होत नाहीये.” Sports Today शी बोलत असताना ओझाने आपलं मत मांडलं.

रैनाची अनुपस्थितीत आणि केदार जाधवचं फॉर्मात नसणं या दोन गोष्टी सध्या चेन्नईला चांगल्याच सतवत आहेत. धोनी आपल्याकडून या गोष्टी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय पण त्यात अद्याप यश येताना दिसत नसल्याचंही ओझा म्हणाला. दरम्यान, अबु धाबीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात मोक्याच्या क्षणी कोलकाताच्या गोलंदाजांनी विकेट घेतल्यामुळे चेन्नईचा संघ काहीसा बॅकफूटवर गेला. दिनेश कार्तिकने सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांचा सुरेख वापर करत चेन्नईच्या फलंदाजांवर दबाव आणला. महेंद्रसिंह धोनीने हा दबाव झुगारत फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण यात त्याला अपयश आलं. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना तो ११ धावा काढून माघारी परतला. त्याच्या सोबत असलेला सॅम करनही आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना माघारी परतला. यानंतर चेन्नईचे फलंदाज सामन्यात पुनरागमन करु शकले नाहीत. कोलकात्याकडून शिवम मवी, वरुण चक्रवर्ती, नागरकोटी, नारायण आणि रसेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

अवश्य वाचा – Video : धोनीची दांडी गुल करणारा वरुण चक्रवर्ती म्हणतो…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 7:15 pm

Web Title: ipl 2020 ms dhoni cannot fix everything wrong with chennai super kings says pragyan ojha psd 91
Next Stories
1 IPL Mid Season Transfer : हे ३ खेळाडू ठरू शकतात CSK साठी फायदेशीर
2 IPL 2020 : दुखापतीमुळे अमित मिश्राची स्पर्धेतून माघार, सहकाऱ्यांनी दिला भावपूर्ण निरोप
3 “हा तर माझ्यासाठी सोशल मीडियावरील नवा सुपरस्टार”; गांगुलीच्या पसंतीला चाहत्यांचाही पाठिंबा
Just Now!
X