News Flash

IPL 2020 : माझ्या आयुष्यात पाहिलेली सर्वोत्तम फिल्डींग ! पूरनच्या कसरतीवर सचिन फिदा

सोशल मीडियावर पूरनच्या फिल्डींगची चर्चा

शारजाच्या मैदानात राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन संघांमध्ये सुरु असलेला सामना चांगलाच रंगला आहे. पंजाबने पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानसमोर २२४ धावांचं आव्हान उभं केलं. मयांक अग्रवालचं शतक आणि लोकेश राहुलचं अर्धशतक हे पंजाबच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या संघानेही आक्रमक सुरुवात केली.

जोस बटलर माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन आणि स्टिव्ह स्मिथ यांनी फटकेबाजी करत राजस्थानच्या डावाला आकार दिला. संजू सॅमसनने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान एक उंच फटका लगावला. सर्वांना हा फटका षटकार जाणार असं वाटत असतानाच सीमारेषेवर उभ्या असलेल्या निकोलस पूरनने हवेत उडी मारत सुंदर कसरत करत तो षटकार अडवला. निकोलस पूरनची ही फिल्डींग पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही चांगलाच भारावला. आतापर्यंत मी पाहिलेली ही सर्वोत्तम फिल्डींग असल्याचं सचिनने म्हटलं आहे.

सचिनव्यतिरीक्त सोशल मीडियावर इतर सेलिब्रेटींनीही पूरनचं कौतुक केलं आहे.

बटलर माघारी परतल्यानंतर स्टिव्ह स्मिथ आणि संजू सॅमसनने दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. २७ चेंडूत ५० धावा करत स्मिथ निशमच्या गोलंदाजीवर बाद झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 10:46 pm

Web Title: ipl 2020 nicholas pooran stunning effort on boundry line to save six sachin like it psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 VIDEO: अविश्वसनीय! हवेत झेप घेत सीमारेषेबाहेरून अडवला सिक्सर…
2 IPL 2020 : शेरास सव्वाशेर ! पॉवरप्लेमध्ये राजस्थान रॉयल्सची फटकेबाजी
3 IPL 2020 : मयांकचं शतक, पण केवळ ७ चेंडूंनी हुकला महत्वाचा विक्रम
Just Now!
X