News Flash

IPL 2020 : ….जेव्हा पंजाबचा संघ आपल्याच गोलंदाजांना ट्रोल करतो

हैदराबादच्या सलामीवीरांकडून पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई

आयपीएलच्या तेराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबची रुळावरुन घसरलेली गाडी अद्यापही मार्गावर येताना दिसत आहे. चेन्नईविरुद्ध सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांची भरपूर धुलाई झाली. वॉटसन-डु प्लेसिस जोडीने या सामन्यात फटकेबाजी करत संघाला १० गडी राखून सामना जिंकवला. यानंतर सनराईजर्स हैदराबादविरुद्ध सामन्यातही पंजाबच्या गोलंदाजांची कामगिरी यथातथाच झाली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या डेव्हिड वॉर्नरने चांगली सुरुवात केली. जॉनी बेअरस्टो आणि वॉर्नर जोडीने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. सामन्यात १२ षटकं टाकल्यानंतरही पंजाबच्या गोलंदाजांना एकही विकेट मिळत नसल्याचं पाहून सोशल मीडियावर पंजाबच्या संघाने आपल्याच गोलंदाजांना ट्रोल केलं आहे.

जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर जोडीने यादरम्यान चांगली फटकेबाजी करत पंजाबला बॅकफूटवर ढकललं. आयपीएलमध्ये सलामीला येताना वॉर्नर-बेअरस्टो जोडीने १ हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 8:41 pm

Web Title: ipl 2020 when kxip troll own bowlers on social media when they fails to take wicket psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : जोडी तुझी-माझी! वॉर्नर-बेअरस्टो जोडीचा नवा विक्रम
2 IPL 2020 : प्रत्येक गोष्टीसाठी धोनीला दोष देता येणार नाही !
3 IPL Mid Season Transfer : हे ३ खेळाडू ठरू शकतात CSK साठी फायदेशीर
Just Now!
X