28 September 2020

News Flash

‘मंकडिंग’वर मुरलीधरनने सुचवला भन्नाट उपाय, म्हणाला…

IPL 2019मध्ये अश्विनचं 'मंकडिंग' खूप गाजलं होतं.

IPL 2019मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार रविचंद्रन अश्विन याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात जोस बटलरला मंकडिंग करत धावचीत केलं होतं. ६९ धावांवर खेळत असलेला जोस बटलर त्यावेळी नॉन स्ट्राईकवर उभा होता. चेंडू टाकण्याआधीच तो धाव घेण्यासाठी पुढे गेला, त्यावेळी अश्विनने संधी साधत त्याला ‘मंकडिंग’ केलं. या मुद्द्यावरून नंतर बराच वादंग निर्माण झाला. आता IPL 2020मध्ये अश्विन दिल्लीच्या संघाकडून खेळणार आहे. पण दिल्लीकडून खेळताना असं काही करण्याची त्याला अजिबात परवानगी नसणार आहे. याचदरम्यान, दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीथरन याने एक भन्नाट उपाय सुचवला आहे.

अश्विनने केलेलं मंकडिंग हे नियमाला धरून असलं तरी ते खिलाडीवृत्तीला साजेसं नाही असा सूर त्यावेळी पाहायला मिळाला होता. त्यावरून मुरलीथरनने एक उपाय सांगितला. “जर गोलंदाजाने फलंदाजांला मंकडिंग पद्धतीने बाद करणं अयोग्य असेल तर फलंदाजालाही चेंडू सुटण्याआधी क्रीजबाहेर जाण्याचा फायदा मिळणं योग्य नाही. मला वाटतं की अशा परिस्थितीत फलंदाजाला ताकीद देण्यात यावी. आणि फलंदाजाला बाद न ठरवता संघाला पाच पेनल्टी धावा (पाच धावा धावसंख्येतून वजा करणं) देण्यात याव्यात”, असा उपाय मुरलीथरनने हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना सुचवला.

अश्विनने केली होती फ्री बॉलची मागणी

“गोलंदाजांसाठीदेखील फ्री बॉलचा नियम लागू करण्याच यायला हवा. जर फलंदाज त्या चेंडूवर बाद झाला तर त्या संघाचे पाच गुण वजा केले जातील असा नियम असायला हवा. फ्री हिट या नियमामुळे फलंदाजांना संधी मिळाली, तशीच गोलंदाजांनाही संधी मिळायला हवी. कारण हल्ली गोलंदाजांची कशी धुलाई केली जाते याच कारणासाठी क्रिकेटचे सामने बघितले जात आहेत”, असे ट्विट करत अश्विननेही एक बदल सुचवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 1:34 pm

Web Title: mankading r ashwin muttiah muralitharan five penalty runs changes in rule of cricket ipl 2020 vjb 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: “गेल्या वर्षी पॉन्टींग, गांगुली यांच्यामुळे…”
2 स्टोक्स संपूर्ण ‘आयपीएल’ला मुकणार?
3 IPL 2020 : यंदा एकही सामना गमवायचा नाहीये ! दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरचं स्वप्न
Just Now!
X