28 October 2020

News Flash

मराठा आरक्षण मागणीसाठी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद

मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या परिषदेत निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

मराठा आरक्षणाला सर्वोच्य न्यायालयाने स्थगिती दिल्याचा निषेध करत आरक्षणाच्या मागणीसाठी विविध मराठा संघटनांच्या वतीने येत्या १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या परिषदेत हा निर्णय घेण्यात आला.

मराठा समाजाला देऊ केलेल्या आरक्षणाला सर्वोच्य न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली आहे. या निकालाचे पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कोल्हापुरात आज विविध संघटनांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला.

या परिषदेला राज्यातील अनेक मराठा संघटनांचे नेते आणि प्रतिनिधींची उपस्थिती होती. यावेळी १५ ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्याबरोबरच केंद्र सरकारच्या आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा लाभ समाजाला देण्यासाठी अध्यादेश काढावा. महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा नोकर भरतीला स्थगिती देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2020 12:10 am

Web Title: maharashtra closed on october 10 to demand maratha reservation abn 97
Next Stories
1 किसान संघर्ष समितीच्या ‘भारत बंद’मध्ये ‘स्वाभिमानी’ होणार सहभागी
2 ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचं निधन
3 कोल्हापूर पालिका निवडणूक मुदतीत अशक्य
Just Now!
X