News Flash

कोल्हापुरात महिन्यानंतरही आर्थिक कोंडी कायम

एटीएमपुढे रोकड घेण्यासाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटा निश्चलनीकरणाच्या निर्णयाला गुरुवारी एक महिना पूर्ण झाला असताना कोल्हापूर जिल्ह्यातील आíथक कोंडी कायम आहे. दैनंदिन व्यवहारातील अडचणी अद्यापही जैसे थे असून इतक्या कालावधीनंतर त्यात लक्षणीय बदल घडल्याचे दिसत नाही. आजही  बहुतेक बँकांपुढे तसेच एटीएमपुढे रोकड घेण्यासाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत.

काळ्या पशाला आळा घालण्यासाठी, दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी मोदी यांनी ८ नोव्हेंबरला रात्री केलेल्या भाषणात ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या नोटांऐवजी २००० आणि ५०० रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणण्याचे मोदी यांनी जाहीर केले होते. याशिवाय चलनातून बाद झालेल्या नोटा बँकेत जमा करून त्याबदल्यात नवी नोटा घेण्याचं आवाहन देखील केले होते. त्याचवेळी बँकांतून आणि एटीएममधून रोख रक्कम काढण्यावर काही र्निबध घातले होते.

या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले असले, तरी त्याची अंमलबजावणी होताना काही अडचणी दिसत आहेत. काळ्या पशाला आळा घालण्यात यश आल्याची लोकभावना आहे. पण, मागणीइतकी राहू दे, किमान गरजेपुरती तरी रोकड बँकांनी पुरवावी, ही अपेक्षा पूर्ण होत नाही. बँकांकडे अजूनही हवी तितकी रोकड नाही. एटीएम मधूनही अनेकदा  दोन हजार रुपयांची नोट येत असल्याने संपूर्ण जिल्ह्यात सुट्ट्या पशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. लोकांना पगार काढण्यासाठीही तासनतास रांगेत उभे राहण्यावाचून पर्याय उरलेला नाही. अनेक बँकांमध्ये रोकड कमी असल्याने सरकारने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षाही कमी रक्कम ग्राहकांच्या हातात पडत आहे.

ग्रामीण भागातील व्यवहार जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहेत. या बँकांच्या खात्यातून पसे मिळत नसल्याने दूध-उसाच्या  देयकांची रक्कम मिळत नसल्याने आíथक कोंडी निर्माण झाली आहे. कॅशलेस व्यवहार अद्याप या भागात फारसा रुळला नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ५० दिवस कळ काढा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले असून २२ दिवस शिल्लक आहेत. यानंतर तरी अडचणी सुटणार का, याकडेच सर्वाचे लक्ष वेधले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 2:14 am

Web Title: traffic jam in kolhapur
Next Stories
1 कोल्हापूर महापौर, उपमहापौर पदांच्या आज निवडी
2 महापौर, उपमहापौर पदांच्या उद्या निवडी
3 कोल्हापुरात बँकांना सम प्रमाणात रोकड देण्याचे आश्वासन
Just Now!
X