कोल्हापूर – शरद पवारांच्या कारकिर्दीत राज्यातील शंभरहून अधिक साखर कारखाने मृत्युपंथाला लागले या केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या विधानाने आजारी साखर कारखान्यांचे प्रकरण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा ऐरणीवर आले आहे. राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने भ्रष्टाचाराने आजारी, मृतवत करत पुढे त्यांची राजकीय नेत्यांनीच कवडीमोल भावाने खरेदी केली आहे. यामध्ये शरद पवार यांच्याशी संबंधित कारखानदार अधिक आहेत. मात्र यातील काही नेते सत्ताबदलानंतर आता भाजपसोबत आले आहेत. तर अजित पवार यांचा गटही सत्तेत सहभागी झालेला असल्याने याचीही साखर पट्ट्यात चर्चा सुरू झाली आहे. या गैरव्यवहाराविरोधात शेतकरी संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हानही दिलेले आहे.

राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून सहकारी साखर कारखानदारीकडे पाहिले जाते. आमदार – खासदारकी नको पण कारखाना हवा असा आग्रह ग्रामीण नेतृत्वाकडून धरण्यामागे गोड गुपित लपलेले आहे. राज्यात २०० पेक्षा अधिक सहकारी साखर कारखाने उभारले गेले. पुढे भ्रष्टाचारामुळे शंभरहून अधिक कारखान्यांना टाळे लावण्याची वेळ आली. नंतर हे बंद पडलेले कारखाने अनेक राजकीय नेत्यांनीच कवडीमोल भावाने विकत घेतले. विशेष म्हणजे यामध्ये सत्ताकाळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश मोठा होता. पुढे सत्ताबदलानंतर मात्र यातील काहींनी भाजपच्या वळचणीला जाणे पसंत केले.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Supriya sule on sunil tingre
Supriya Sule : “पोर्शेप्रकरणी शरद पवारांनी माफी मागावी”, सुप्रिया सुळेंनी ‘ती’ नोटीसच दाखवली, म्हणाल्या…
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा – तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?

काय आहे प्रकरण?

याप्रकरणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रथम आरोप करत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. या याचिकेमध्ये त्यांनी सहकारी साखर कारखाने भ्रष्टाचाराने आजारी, मृतवत करणे, नंतर त्यांची कवडीमोल भावाने खरेदी-विक्री आदींबाबत आरोप केले आहेत. शेकडो कोटी रुपयांचे कारखाने तत्कालीन राज्य शासन आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने अवघ्या ५ कोटी ते ६५ कोटी रुपयांना विकल्याचा आरोप केलेला आहे. या याचिकेतील मुख्य रोख हा तत्कालीन एकत्रित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे आहे. राज्यातील ४६ कारखान्यांच्या या विक्री प्रकरणात सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलेला आहे. २००६ ते २०१४ या आठ वर्षांत कारखाने कशा पद्धतीने विकले गेले याचा तपशील यात दिलेला आहे. राजू शेट्टी यांनीही स्वतंत्रपणे उच्च न्यायालयात याचिका दाखल करून १० हजार कोटींचा गैरव्यवहाराचा आरोप केला होता. अशा नेत्यांमध्ये अजित पवारांशिवाय जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, बबनराव पाचपुते, महादेवराव महाडिक, अभिजित पाटील आदींचा नाम्मोलेख त्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. यातील अजित पवार यांच्याशी संबंधित साताऱ्यातील जरेंडेश्वर कारखान्याचे चौकशी प्रकरण मध्यंतरी गाजले होते.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचारामुळे राज्यातील २०० सहकारी साखर कारखान्यांपैकी १०१ कारखाने मृत्युपंथाला लागल्याचे म्हणणे खरे असले तरी या कृष्णकृत्यात पूर्वी दोन्ही काँग्रेसमध्ये असलेले नेतेच सहभागी होते. मात्र पुढे सत्ताबदलानंतर यातील अनेक नेते आता भाजप- मित्रपक्षात किंवा त्यांच्याशी संबंधित युतीमध्ये सहभागी झाल्याचे दिसत आहे. या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. कारखाने जाणीवपूर्वक आजारी पाडून आडमार्गाने स्वतःच विकत घ्यायचे असे षडयंत्र असून त्याचा शहा यांनीच पर्दाफाश करावा. – राजू शेट्टी, संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

हेही वाचा – Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”

सांगली जिल्ह्यातील १७ पैकी ७ कारखाने याच नेत्यांनी खासगीकरणाद्वारे गिळंकृत केले आहेत. हे उद्योग करणारे पूर्वी काँग्रेस- राष्ट्रवादीत होते. तेच आता भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या तरी त्याची कसलीच दखल घेतली जात नाही. अमित शहा यांनी अशा प्रकारचे केवळ विधान न करता हे कुटील कारस्थान चव्हाट्यावर आणले पाहिजे. अन्यथा काही वर्षांतच त्यावर याच पुढाऱ्यांची खासगी मालकी झाल्याचे दिसेल. – संजय कोले, प्रदेशाध्यक्ष सहकार आघाडी प्रमुख, शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना

Story img Loader