कोल्हापूर : माघी गणेश जयंतीनिमित्त मंगळवारी जिल्ह्यातील गणपती मंदिरांमध्ये विविध धार्मिक उपक्रम, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दिवसभर मंदिरांत मोरयाचा जागर करीत दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.

हेही वाचा – कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस एकसंघ; जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांचा दावा

हेही वाचा – कोल्हापूर : परराज्यातील सराईत चोरट्याकडून घरफोडीचे ८ गुन्हे उघडकीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओढ्यावरच्या गणपती मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी अभिषेक, पूजा व दुपारी प्रसादवाटप करण्यात आले. स्वयंभू गणेश मंदिर, आर. के. नगर येथील गणेशमंदिर, महालक्ष्मी मंदिरातील सिद्धिविनायक मंदिर, बिनखांबी गणेश मंदिर, जवाहरनगर, प्रतिभानगर येथील गणेश मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी पालखीसोहळा, दुपारी महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. बाप्पांच्या मूर्तीची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. इचलकरंजीतील वरद विनायक, जयसिंगपूर येथील कमळ रूपातील मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती.