कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत समाजातील सर्वच घटकांसाठी कल्याणकारी काम केले. त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी प्रा. संजय मंडलिक यांना पुन्हा खासदार करूया, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचा प्रमुख म्हणून ही जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडू, असेही ते म्हणाले. कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते.

भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा १,४०० कोटींचा विकास आराखडा, शेंडापार्कमधील १,१०० कोटींचे एक हजार बेडचे सुसज्ज हॉस्पिटल यासह कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. सात मे रोजी मतदान झाल्यानंतर आम्ही केडीसीसी बँकेचे संचालक मंडळ सहलीसाठी स्वखर्चाने परदेश दौऱ्यावर जाणार आहोत. त्यावेळी मध्येच महिलांनी प्रश्न केला की, आमचे अयोध्येला श्रीरामाच्या दर्शनासाठी जायचे काय झाले? त्यावर मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, तुम्ही रेल्वे बुक करा. प्रभू श्री. रामाच्या दर्शनासाठी आयोध्यालाही जाऊया.

jitendra awhad eknath shinde Insult news
“ठाण्यात मुख्यमंत्र्यांचा अपमान, माझ्यासारख्या विरोधकालाही वाईट वाटलं”, जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला!
kolhapur mla prakash awade, claim on hatkanangale lok sabha seat
“मी महायुतीचाच! मोदींना पंतप्रधान करण्यासाठी लढणार”, बंडखोर आमदार प्रकाश आवाडे यांचा पवित्रा
AAP leader Kailash Gahlot
‘आप’ पक्षाला आणखी एक धक्का? मद्य धोरण प्रकरणात आणखी एक मंत्री ईडीसमोर हजर
Blood donation by AAP
केजरीवालांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात आपतर्फे रक्तदान

हेही वाचा – …तरीही नवनीत राणा खासदार, पण रश्मी बर्वे मात्र बाद

महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापुरात विमानतळ, दळणवळण, रेल्वे या महत्त्वाच्या सेवा- सुविधा यांचे आधुनिकीकरण करण्यात यश मिळाले. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे आम्हा सर्वांनाच आणि व्यक्तीशः मलाही आदरणीयच आहेत. माझी लढाई त्यांच्याशी नाही. माझे- त्यांचे वैयक्तिक संबंध फार चांगले आहेत. शेवटपर्यंत आपण निवडणुकीसाठी उभे राहणार नाही, असेच ते मला सांगत होते. परंतु, संधीसाधूंनी मुद्दामहून त्यांना उभं केलयं. कोल्हापूरच्या गादीचा जरूर मान- सन्मान ठेवूया. परंतु, कोल्हापूरकर म्हणून आमचाही आत्मसन्मान आहे.

श्रीकृष्णाची भूमिका

कोल्हापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदिल फरास म्हणाले, मुश्रीफसाहेब, या निवडणुकीत श्रीकृष्णाची भूमिका आता तुम्हालाच पार पाडून निवडणूक जिंकावी लागेल. यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, मी सुदर्शन चक्र कुठून आणू? त्यावर आदिल फरास म्हणाले, ते तर तुमच्या हातातच आहे.

मुश्रीफांना धरून राहा

भाषणात संजय मंडलिक म्हणाले, रात्री उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज सकाळीच करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो. यावेळी महाडिक मला म्हणाले, तुझ्यासोबत पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत, त्यांना धरून रहा. मग काळजीच करू नको, तुझा विजय निश्चित आहे.

हेही वाचा – बडे नेते माझ्यासोबत असल्याने बाजू उजवी; यश निश्चितपणे मिळणार; संजय मंडलिक यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर- केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, कोल्हापूर शहर अध्यक्ष आदिल फरास, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्ष श्रीमती रेखा आवळे, माजी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, राष्ट्रवादीचे शहर युवक अध्यक्ष महेंद्र चव्हाण, महेश सावंत, रमेश पोवार, राजेश लाटकर, प्रकाश गवंडी, संदीप कवाळे, प्रकाश पाटील, प्रकाश कुंभार, सतीश लोळगे, संभाजीराव देवणे, शारदा देवणे, आदी प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा – “नाना पटोलेंनी पैसे घेऊन डॉ. प्रशांत पडोळेंना उमेदवारी दिली,” काँग्रेसच्या माजी आमदाराचा आरोप; म्हणाले, “भाजप उमेदवाराला…”

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, राष्ट्रवादीच्या युवती शहराध्यक्षा पूजा साळोखे, फिरोज सौदागर, रामेश्वर पत्की, प्रसाद उगवे, जहीदा मुजावर यांची भाषणे झाली. आभार महेश सावंत यांनी मानले.