लोकसत्ता प्रतिनिधी

कोल्हापूर: कोल्हापुरात दंगल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक, इतर अधिकारी उशिरा पोहोचतात. दंगल होण्याची शक्यता असताना पोलिसांसाठी आवश्यक वाहने नसतात. यामागे शासनाचे काही चुकत आहे. ही परिस्थिती पाहता दंगल घडली कि ती घडवली गेली हे तपासण्याची गरज आहे, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी व्यक्त केली.

आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या पवार यांना पत्रकारांनी कोल्हापूर दंगली बाबत विचारणा केली. त्यावेळी ते म्हणाले, समाज माध्यमांचा आधार घेऊन धार्मिक मुद्द्यावर धर्मांध शक्तींनी कोल्हापुरातील सामाजिक सलोख्याचे वातावरण बिघडवले. दंगलीत सर्वसामान्य नागरिकांचे घर, दुकान जळाल्याने कुटुंब उध्वस्त होत असतात. अशावेळी योग्य बंदोबस्त ठेवला गेला नाही. समाजात वाद निर्माण कसा होत राहील याचा प्रयत्न केला जात असल्याने दंगल घडली की घडवली हे तपासले पाहिले.

हेही वाचा… कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू तो हिंदुस्थानी मुसलमानांचा शत्रूच; आमदार हसन मुश्रीफ

धार्मिक मुद्द्यावर वातावरण तापून भाजपने निवडणुका खिशात घालण्याच्या घटना समोर आहेत. याच मुद्द्यावर कर्नाटकातील दाखवली तशी महाराष्ट्रातील जनताही त्यांना जागा दाखवून देईल. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांचे नेतृत्व बदलण्याच्या दिशेने राज्यात हालचाली सुरू आहे. निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत. यातून स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रशासकांची मनमानी सुरू झाली आहे. लोकप्रतिनिधींची कामे यामुळे थांबली आहेत. या निवडणुका काय घेतल्या जात नाही, अशी विचारणा त्यांनी केली.

हेही वाचा… VIDEO: आधी गोळी घातली मग दुकान मालकाच्या नरड्यावर ठेवला पाय; कोल्हापुरात सिनेस्टाइल दरोडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासन आपल्या दारी हा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम म्हणजे सरकारी इव्हेंट आहे. यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना राबवून घेतले जात आहे. लोक आपल्या सोबत असल्याचे दाखवण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका आमदार पवार यांनी केली.